नागपूर: (प्रतिनिधी) – नागपूर येथील मनसर येथील प्राचीन बुद्ध विश्व विद्यापीठ याठिकाणी MBCPR टीम तर्फे कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती,ह्या कार्यशाळेत नागपूर मधील 40 अभ्यासक उपस्थित होते,कार्यशाळेस आलेल्या अभ्यासकानी ह्या प्राचीन स्तूपाची माहिती घेऊन बुद्ध कालीन स्थापत्य कलेचा सर्व इतिहास जाणून घेतला,हे सर्व अभ्यासक अगोदर धंम लिपि शिकले व त्यानंतर येथे कार्यशाळेचे आयोजन करून ह्या कार्यशाळेस उपस्थित झाले.
महिलांची पहिली बॅच
फक्त धम्म भगिनी ह्या धम्म लिपि बॅच मधून परिचय झालेल्या असल्याने त्यांचे फोन, मेसेज अनेक दिवसांपासून येत होते,सकाळी नागपूर वरून 11 वाजता मनसर विद्यापीठ लेणींकडे जाण्यासाठी तयार झालो एकूण 40 महिला भगिनी कार्यशाळेत सहभागी झाल्या होत्या,कधीही एकमेकांना न भेटलेल्या नागपूर मधील अनेक धम्म भगिनी आज एकत्रितपणे अभ्यासदौऱ्यात सहभागी झाल्या होत्या.
मनसर विद्यापीठ मध्ये उत्तखणन करन्यासाठी पाठपुरावा करणारे भन्ते सूरइ ससाई यांनी स्थापन केलेल्या विहारात गेल्यावर सर्वानी सामूहिक
त्रिसरण पंचशील घेतले,व मनसर विद्यापीठाला गेलो तिथं गेल्यावर खरोखरच खूप अविस्मरणीय असा प्राचीन दैदिप्यमान आपला वारसा बघून , प्राचीन स्तूप बघून खूप बुद्ध काळात हरवून गेलो,सम्राट अशोक कालीन स्तूप बघून तेथे विटा, शून्यागार, विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी असलेल्या वर्ग खोल्या , ह्या सर्वांचा अभ्यास केला,हे नालंदाच्या विश्व विद्यापीठाच्या समकालीन विद्यापीठ होते असे अनेक संशोधकांनी मत मांडले आहे.
उत्खनन केल्यास इतिहास अधिक विस्तृतपणे जनते समोर येऊ शकेल
मनसर विद्यापीठाच्या बाजूचा हा स्तूप मनसर विद्यापीठ स्तुपाला लागुनच आहे परंतु दुर्लक्षित झालेला आहे किंवा जाणून दुर्लक्षित ठेवला गेला आहे सुरइ सुसाई बुद्ध विहाराच्या मागूनही वर जाण्याचा मार्ग आहे ज्यावर सुंदर गुबंद कोरलेले आहेत मुख्य म्हणजे यात स्तूपाच्या आत जाण्यासाठी गुप्त मार्ग आहेत जे बंद करुन त्यावर तिनपत्रे झाकल्या गेली आहेत नेमका तो मार्ग कुठे जातो आणि आत काय असेल हे याचा उलगडा होऊ शकेल किंवा पुरातत्व विभागाने याचे आणखी उत्खनन केल्यास इतिहास अधिक विस्तृतपणे जनते समोर येऊ शकेल.
सर्व परिसर बघून अभ्यासून झाल्यावर विहारात जेवनाची व्यवस्था MBCPR टीमच्या वतीने करण्यात आली होती,
आर्थिक खर्च हा सर्वांच्या आलेल्या प्रवास खर्चातून देण्यात आला होता,
अतिशय स्वादिष्ट जेवण उरकून नागार्जुन बुद्ध विहारात जाऊन भेट दिली.
यावेळी नागपूर टीम तर्फे कार्यशाळेस मार्गदर्शन करणारे लेणी अभ्यासक सुनील खरे यांचा ह्यावेळी पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी नागपूर मधील उपसिका निर्झरा रामटेके,करुणा मून, मीना पाटील, उज्वला गणविर, अलका गवई, सिंधू बोदेले, मीना बागडे, दिपाली चहांदे, करुणा गोडबोले दिप्ती मलके, शितल वाघमारे, संगीता गजभीये, शालू सोमकवर, नंदा घोडके, मीनाक्षी शहारे, प्रतिक्षा वासनिक, श्रुती मेश्राम, शीला वाळके, अनामिका हाडके सुलोचना रामटेके , श्रेष्ठी मेश्राम, जोत्स्ना गादेकर , नेहा राऊत , योगेश फुलझेले , शालू सहारे, प्रज्ञा फुलझेले शुभांगी डोंगरे, सुरभी ढेंगरे , दिक्षा मून , अपेक्षा घुटके,डॉ.सुनिता मेश्राम,इत्यादी कार्यशाळेस उपस्थित होत्या,
परतीच्या प्रवासाला निघताना मन भरून आले,खरच धंम लिपि मुळे महाराष्ट्रभर गोतावळा तयार झाला आहे.खूप बरे वाटत आहे.
IMDb वर्षातील सर्वाधिक लोकप्रिय 10 चित्रपटांमध्ये जयभीम ला स्थान
जयभीम चित्रपट:नोंदवला आणखी एक विक्रम आंतरराष्ट्रीय सन्मान
बाबासाहेब चित्रपटात कुठेही नाहीत,तरीही ‘सबकुछ’ जयभीम चित्रपटाच्या निमित्ताने
जय भीम सिनेमा :व्यवस्थेने दिलेल्या यातनांचा वास्तवदर्शी थरारक अनुभव
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published by Team Jaaglya Bharat on DEC 14, 2021 21: 37 PM
WebTitle – Workshop conducted by MBCPR team at Mansar University