नवी दिल्ली, 11 मे: थायलंड वरून कॉलगर्ल (Thailand Call Girl Death Case) बोलवण्यात आल्याचं आणि इथेच तिचा मृत्यू झाल्याचं प्रकरण गेले काही दिवस लखनऊमध्ये (Lucknow) मोठ्या प्रमाणात गाजतं आहे. दरम्यान या प्रकरणी काही नवीन धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले आहेत. याप्रकणी काही बड्या नेत्यांवर आरोप केले जात असून पोलीस आतापर्यत 50 मोबाइल क्रमांकांची तपासणी करत आहेत.
याप्रकरणी भाजपचे राज्यसभा खासदार संजय सेठ (Sanjay Seth) यांच्या मुलावर देखील आरोप केले जात आहेत. समाजवादी पार्टीचे प्रवक्ते आयपी सिंह यांनी ती थायलंड वरून कॉलगर्ल सेठ यांच्या मुलाने बोलावली असल्याचा आरोप केला आहे. केवळ भाजप नेता म्हणूनच नाही तर बांधकाम क्षेत्रातही संजय सेठ एक मोठं नाव आहे. त्यामुळे आयपी सिंह यांनी केलेल्या आरोपानंतर तणावाचं वातावरण आहे.
मात्र, आता आय पी सिंह यांच्यावरच गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भाजपचे राज्यसभा खासदार संजय सेठ यांनी याप्रकरणी पोलिसांनी तपास करावा असे पत्र दिले असून माझ्या आणि कुटुंबियांच्या विरोधात बदनामी करणाऱ्या लोकांवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.
तपास पथकाचे नेतृत्व करणारे डीसीपी पूर्व संजीव सुमन यांच्या मते, थायलंडमधील एक 40 वर्षीय महिला 2019 मध्ये कामाच्या शोधात लखनौला आली होती. काही महिने इकडे तिकडे काम केल्यावर तिचा सलमान नावाच्या माणसाशी संपर्क झाला. रायगड, छत्तीसगडमध्ये राहणारा राकेश शर्माच्या स्पा सेंटरमध्ये सलमान मॅनेजर आहे. हे स्पा सेंटर गोमतीनगरमधील सिनेपॉलिस मॉलच्या शेजारी शहरातील सर्वात मोठे स्पा सेंटर आहे. ही महिला हुसैनगंजमधील हॉटेल गोल्डन ट्यूलिपजवळ भाड्याच्या खोलीत राहत होती अशी माहिती मिळत आहे.
या प्रश्नांची उत्तरे सध्या पोलिसांकडे नाही
हजरतगंजमधील एका हॉटेलमध्ये थायलंडच्या महिलेच्या मुक्कामाबद्दल माहिती समोर आली आहे.
सध्या पोलिस यासंदर्भात कोणतीही माहिती द्यायला तयार नाहीत,परंतु ज्या हॉटेलचे नाव समोर येत आहे त्या हॉटेलच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये हे स्पष्ट होईल की ती बाई कधी आली केव्हा हॉटेल मध्ये थांबली किंवा आलीच नाही ?
सलमानने स्वत: ला मार्गदर्शक असल्याचे सांगितले आणि महिलेचे शेवटचे संस्कार केले.
पोलिस चौकशीत सलमानने सांगितले की तो महिलेचा मॅनेजर आहे.अखेर यामागील सत्य काय आहे, सलमान वेगवेगळे विधान का करीत आहे?
थायलंडच्या महिलेने बर्याच काळापासून लखनौमध्ये येणे-जाणे होते तसेच तीने स्पा मध्ये नोकरी सुरू ठेवली होती.
तीच्या मोबाईल नंबरवर कोण बोलत होते तीच्या संपर्कात कोण कोण होते?
पोलिस त्याबद्दल काही माहिती गोळा करू शकत नाहीत का?
की राजकीय दबाव आहे अशी आता चर्चा सुरू झाली आहे.
पोलिस कारवाई करत आहेत असे स्पष्टीकरण पोलिसानी दिले आहे.
कामगार (युनियन ) संघर्षाशिवाय पर्याय नाही
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचक हो.. @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,आपल्या मित्रांना सांगा)
First Published on MAY 11 , 2021 18: 27 PM
WebTitle – New twist in the Call Girl case called from Thailand, the possibility of big political leaders getting involved 2021-05-11