देशातील राजकारणाने कमालीची अनैतिक पातळी गाठत लोकांसमोर गंभीर प्रश्न निर्माण केले आहेत.लोकशाहीसाठी सुद्धा ही चिंतेची बाब आहे.आपण ज्याना मतदान करतो ते उद्या काय करतील याची शाश्वती राहिली नाही.लोकांचे जगण्यामरण्याचे मूलभूत प्रश्न आ वासून उभे आहेत,अनेक प्रश्नात जनता होरपळून निघत आहे.अशात राजकीय नेते मात्र सत्तेत जाऊन बसण्यात मग्न आहेत,शिवसेनेच्या नंतर आता राष्ट्रवादी पक्षात फुट पडली,राष्ट्रवादी पक्षात फुट पडल्यामुळे मिडियाला नवा मुद्दा मिळाला.यावर मिडियाने बातम्या अन प्रायोजित कार्यक्रमांचा रतीब लावला.यावर (Vanchit Bahujan Aghadi) वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड.प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांना प्रश्न विचारले त्यांनी दिलेली रोखठोक अन जनतेच्या जिव्हाळ्याची उत्तरे अन प्रश्न नक्की वाचण्यासारखी आहेत.
राष्ट्रवादी पक्षात फुट पडल्याच्या पार्श्वभूमीवर मॅक्स महाराष्ट्रने वंचित बहुजन आघाडीचे नेते अध्यक्ष अॅड.प्रकाश आंबेडकर यांची मुलाखत घेतली.यावेळी या मुलाखातीच्या दरम्यान प्रकाश आंबेडकरांनी देशातील सर्वच मिडियाचा खरपूस समाचार घेत खरडपट्टी काढली.
राष्ट्रवादी पक्षात फुट पडल्याच्या पार्श्वभूमीवर मॅक्समहाराष्ट्रचे पत्रकार किरण सोनवणे यांनी अॅड.प्रकाश आंबेडकर मुलाखत घेतली ती वाचकांसाठी देत आहोत.
पत्रकार किरण सोनवणे – महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ची उलथापालथ होते आहे त्यांना सर्वसामान्य माणूस अत्यंत वेगळ्या पद्धतीने भांबावून गेलेत्याला कळत नाहीये की एकूणच महाराष्ट्राच्या राजकारणात असं कायझाले एक वर्षापूर्वी नेमकं या आजपासून एक वर्षांपूर्वी अशाचपद्धतीने शिवसेना फुटली होती आणि त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसआणि उभी-आडवी फुटून भारतीय जनता पक्षाच्या गोटात जाऊन सत्तेतजाऊन बसली या संदर्भातले एकूण देशातल्या असणारे शेतकऱ्यांचे प्रश्न असतील वंचितांचे प्रश्न असतील या बाबतीत मात्र कुणीही काहीही बोलायला तयार नाहीये फक्त त्यास संदर्भामध्ये असणाऱ्या थोड्याबहुत कुठेतरी बातम्या येतात आणि त्या कुठे घेऊन जातात
पण फक्त राजकीय पटलावर घडणाऱ्या असणाऱ्या राजा आणि प्रधान यांच्या गोष्टीमात्र सगळ्या मोठ्या प्रमाणात सुरू आहे या भारताच्या राजकारणात एकूण पुढे काय होणार आहे यासंदर्भात मॅक्स महाराष्ट्र गेली तीन दिवस वेगवेगळ्या लोकांशी बोलतोय त्यात पत्रकार असतील विचारवंत अभ्यासक आणि वेगवेगळ्या पक्षाचे नेते सुद्धा असतील आता आपल्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर जी आपल्या सोबत आहेत
पत्रकार किरण सोनवणे – साहेब स्वागत आहे तुमचं मॅक्समहाराष्ट्र मध्ये
अॅड.प्रकाश आंबेडकर -आपलेही स्वागत
पत्रकार किरण सोनवणे – साहेब, आता ही हे जे महाराष्ट्राचे सत्ता नाट्य तुम्ही पाहता गेली चार दिवस सत्तेचा जी काही उलथापालथ होते त्यावर ती तुमची पहिली प्रतिक्रिया काय?
अॅड.प्रकाश आंबेडकर – माझी पहिली झाली आहे की तुमचं चॅनेल आणि उरलेले सगळे चॅनल याचा मी पहिल्यांदा निषेध करतोय, याप्रकरणी महाराष्ट्र मधल्या ज्वलंत प्रश्नाकडे आपण दुर्लक्षित केलेलं आहे ट्वेंटी फोर बाय सेव्हन तुम्ही जे काही नाटक टीव्हीवरती दाखवत आहात आणि तुमची मक्तेदारी असल्यामुळे तुम्ही असे दाखवत आहात, त्याचा आम्ही निषेध करतो, जून महिना संपला जुलै सुरुवात होतोय पाऊस नाहीये शेतकऱ्यांना आता दुबार पेरणी करावी लागते आहे,अनेक गावांमध्ये पाण्याची टंचाई त्या ठिकाणी दिसतेय शहरांमधला सुद्धा पाणी आता आटायला लागले अशी परिस्थिती आहे त्याच्यासाठी तुमच्या चैनल वर ती स्पेस नाही बातम्या नाहीत ट्वेंटी फोर बाय सेव्हन नुसता असा एनसीपी बीजेपी आमदार खासदार या ठिकाणी गेला त्या ठिकाणी गेला, लोकांना त्याच्याशी काय घेणे देणे आहे? तुम्हीसुद्धा आता त्या खोक्यासारखे वागायला लागला तशी परिस्थिती आहे.
पत्रकार किरण सोनवणे – बरोबर आहे ,24×7 आपण दाखवत नाही,साहेब मुख्य गोष्ट अशी आहे की ज्या घटना घडत आहेत,त्याबद्दल….
अॅड.प्रकाश आंबेडकर – 24 तास एवढा पण दाखवत नाहीये में गोष्ट अशी की ज्या घटना घडत आहेत
त्याचा फक्त आपण त्या एवढ्या महत्त्वाच्या नाही आहेत ज्याच्या मध्ये चोराना 24×7 दाखवले जावे.
प्रधानमंत्री म्हणतात 70 हजार कोटीची चोरी झाली,त्या चोरी ला तुमचा एकही जबाबदार पत्रकार एंकर संपादक/एडिटर विचारत नाही
किंवा याची बीजेपी ने इन्क्वायरी केली की नाही केली? या 70000 हजार कोटीच्या चोरीमध्ये कोणा कोणाचा सहभाग आहे
पत्रकार किरण सोनवणे -बरोबर आहे. जूनमध्ये 26-27 जून ला मध्यप्रदेश मध्ये प्रधानमंत्र्यांनी तसे भाषण केले…
अॅड.प्रकाश आंबेडकर -एकाने तरी प्रश्न विचारला का 70 हजार कोटीची चोरी झाली,
तुम्ही भाजपला विचारले का की काही इन्क्वारी चालू केलीय का? की तुम्ही इन्क्वायरी संपलेली आहेत तुम्हाला ते आकडे मिळालेले आहेत?
तुम्ही एफआयआर दाखल करणार आहात का? एक तरी चॅनेल मला दाखवा ज्यांनी हा प्रश्न भाजपच्या प्रवक्त्यांना विचारला आहे?
पत्रकार किरण सोनवणे – बरोबर आहे. आम्ही त्यासंदर्भात बाळासाहेब या प्रश्नावर लावून धरून आहोत.
अॅड.प्रकाश आंबेडकर – भाजपला कुणीही प्रश्न विचारत नाहीये नुसते तोंडदेखले पण सुरू आहे.,आताही आपण इथं जी चर्चा करत आहोत, एनसीपीचे काय होईल? एनसीपीचे काय व्हायचे ते होईल त्यातून जनतेला काय मिळणार आहे? अजित पवारांनी स्वत:चा गट केला,शरद पवारांनी स्वत:चा गट केला,आता कोर्टात जाऊन भांडत बसतील.तुम्ही आता राष्ट्रीय हा शब्द वापरला.. सांगा काय परिणाम होणार आहे?याचा सर्वसामान्य लोकांवर काय परिणाम होणार आहे? राष्ट्रीय परिणाम काय होणार आहे?
पत्रकार किरण सोनवणे – बरोबर आहे. सर्वसामान्य माणसांचे जे प्रश्न आहेत त्याच्याकडे न जाता नुसता राजकीय खेळ होतो आहे आणि ज्या पद्धतीने महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालथ होते त्यामुळे तुम्ही म्हणालातकी पीक पाण्याचा प्रश्न असेल पावसाचा प्रश्न असेल आणि बाकीच्या गोष्टी दुसरे प्रश्न आहेत या प्रश्नांकडे दुर्लक्ष सुरू आहे.मी त्याकडे नंतर येणार आहेच. म्हणून तुमच्याशी संवाद साधायचा…
अॅड.प्रकाश आंबेडकर – मिडिया स्वत:ला लोकशाहीचा चौथा पाचवा सहावा स्तंभ समजतात पण तुम्ही तुमची ड्युटी करत नाही.
सत्तेमध्ये असलेल्या पक्षाला विरोधी पक्षाला आतातरी जागं करावं असं कुठेच होताना दिसत नाही.
सत्ताधारी आणि विरोधक जो खेळ करतात तो खेळ तुम्ही लोकांना करमणूक म्हणून दाखवत आहात
तुमचं चैनल हल्ली हल्ली सगळे लोक करमणूक म्हणूनच बघतात त्याच्या पलीकडे त्याची काही व्हॅल्यु राहिली नाही.
पत्रकार किरण सोनवणे – तुम्ही त्याच्याकडे कसे बघता म्हणून तुमच्या चर्चा करत आहे..
अॅड.प्रकाश आंबेडकर – मीही फक्त करमणूक म्हणूनच बघतो.त्याच्या पलीकडे मी काही बघत नाही
पत्रकार किरण सोनवणे – तुम्हाला असं वाटतं का की राष्ट्रवादी मध्ये फुट पडून दोन पक्ष निर्माण झाले.. त्याचा राजकारण,सामान्य लोकांवर परिणाम. होईल..
अॅड.प्रकाश आंबेडकर – त्याचा माझ्या पक्षावर ,महाराष्ट्राच्या जनते वरती काहीही परिणाम होणार नाही,
मी त्याच्याकडे एंटरटेनमेंट म्हणूनच बघतो त्याच्या पलीकडे त्याला काहीही व्हॅल्यू नाही
पत्रकार किरण सोनवणे -आत्ता आत्ता जे काही समजा नाट्य झालेले आहे त्याच्यानंतर आता महाविकास आघाडीच्या संदर्भातली
जी काही भूमिका म्हणजे भाजपच्याविरोधात जी आरएसएस च्या विरोधात जी काही आघाडी निर्माण होते
त्याच्या संदर्भात तुमची काय भूमिका असणार आहे?
अॅड.प्रकाश आंबेडकर – या नाटकात कोण पडणार आहे? आम्ही अगोदरच बीजेपच्या विरोधात आहोत.यांचे सरकार 2024 मध्ये येणार नाही पडणार आहे,त्यामुळे बीजेपी धार्जिणे कोण आहे हे लोकांच्या लक्षात आलं आहे.तुम्ही सांगून काही उपयोग नाही त्याच्यामध्ये लोक असं वाटतं लोकांना माहिती आहे काय होणार काही होणार नाही.
पत्रकार किरण सोनवणे – तुम्हाला असं वाटतं त्या बंडामागे म्हणजे शरद पवारांचा हात आहे?
अॅड.प्रकाश आंबेडकर – असला काय अन नसला काय,काय फरक पडतो? आम्ही त्याला इंटरनमेंट म्हणूनच बघतोय त्याच्यामध्ये
पत्रकार किरण सोनवणे – पण आत्ता महाराष्ट्रमध्ये सत्तेचे जी काही उलथापालथ झालीय त्याकडे आपण कसे बघता..
अॅड.प्रकाश आंबेडकर – काहीही झालेलं नाही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत महाराष्ट्राचे गव्हर्न आहेत उपमुख्यमंत्री देवेंद्रफडणवीस फडणवीस काही बदल झालेला नाही
पत्रकार किरण सोनवणे – पण या सगळ्यागोष्टींसाठी सुप्रीम कोर्टा किती जबाबदार आहे? याच्यामध्ये अशा घटना घडतात त्याला त्यांची काय संबंध सुप्रीम कोर्टाने ज्या पद्धतीने अगोदरची निर्णय दिले शिंदे प्रकरणांमध्ये आता त्याच पद्धतीने चाल खेळली जातेय, आणि नवा प्रयोग होतो आहे
अॅड.प्रकाश आंबेडकर – नवाप्रयोग कसला ? ज्याला सत्य मध्ये जायचे तो सत्तेमध्ये जाणार तुम्ही का त्याला थांबवू शकता का त्याच्या दोऱ्या तुमच्या हातामध्ये आहेत का? व्यक्तिस्वातंत्र्य स्वीकारले पाहिजे. अजित पवार गेले बीजेपी बरोबर ते एक्सेप्ट करा अन मोकळं व्हा..
पत्रकार किरण सोनवणे – तुम्हाला बीआरएस कडून फोन आल्याचे बोलले जातेय त्यात कितपत तथ्य आहे?
अॅड.प्रकाश आंबेडकर – त्यातच्यात एवढं काय आहे कळत नाही,आम्ही राजकीय लोक आहोत,एकमेकांना भेटणार,बोलणार,काही असेल लोकांना सांगणार,त्यात नविन काय? आता असं वाटतं की राज्ये जहागीर झाले आहेत.हा पक्ष कशाला तो पक्ष कशाला आहे? भारत हा एक देश आहे,त्यात राजकीय पक्ष आहेत,ते राजकीय पक्ष आपले हातपाय पसरवणारच लोकांनी ठरवायचं आहे की त्यांना स्वीकारायचं की नाही.
अशा अनेक प्रश्नावर अॅड.प्रकाश आंबेडकर यांनी भाष्य करत भारतीय मिडियाचे चारित्र्य उघड केले.
फ्रान्स का जळत आहे? 17 वर्षीय Nahel M नाहेल ला पोलिसांनी का मारलं?
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा....
First Published by Team Jaaglya Bharat on 06 JULY 2023, 15:00 PM
WebTitle – NCP split : Prakash Ambedkar criticizes media