पद्मश्री नामदेव ढसाळ हे मराठी व भारतीय साहित्यातील एक अपरिहार्य पात्र. साहित्य अकादमी या प्रतिष्ठित संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त साहित्यिकांना जीवनगौरव सन्मान देण्याचा उपक्रम सुरू झाला त्याच्या पहिल्याच वर्षी अकादमीने सर्वप्रथम नामदेव ढसाळांचा गौरव केला. अशा प्रकारे ढसाळांनी मराठी भाषेला देशपातळीवर मोठा सन्मान मिळवून दिला.ढसाळ हे निव्वळ साहित्यिक कधीच नव्हते,नाहीत.
दलित पँथर या युवक संघटनेचे ते प्रमुख नेते
सत्तरीच्या दशकात जोरदारपणे पुढे आलेल्या दलित चळवळीतील ‘दलित पँथर’ या युवक संघटनेचे ते प्रमुख नेते आहेत.याच काळात उदयाला आलेल्या अनियतकालिकांच्या चळवळीतही ते अग्रस्थानी होते.ढसाळांच्या ‘गोलपिठा’ या पहिल्याच कवितासंग्रहाने मराठी सारस्वतांना उपेक्षितांच्या जगाचं,जाणिवांचं, तीव्र संतापाचं आणि त्यामधून आलेल्या बेधडक अभिव्यक्तीचं जालीम दर्शन घडवलं.
गोलपिठा ही मराठी साहित्यातील अजोड व अभिजात निर्मिती ठरली आहे.दलित साहित्यानं प्रातिनिधिक म्हणून जे उभं केलं त्याला काळानुसार मर्यादा येणारच.प्रत्येक नव्या संप्रदायाला अशा मर्यादा असतातच.जशी समाजातील उत्पादनाची साधनं बदलतात,त्या अनुषंगाने सांस्कृतिक व्यवहार व अभिव्यक्तीही बदलतात.
महत्त्वाचे लेखक
उदाहरणार्थ,आता जागतिकीकरणानंतर कॉर्पोटरायझेशन होऊ लागलंय.यातून श्रमजीवी वर्गाचा उत्पादनाशी असलेला संबंध तुटतो आहे. कल्याणकारी राज्याची संकल्पना राज्यकर्ते धाब्यावर बसवू लागलेत.परिणामी,श्रमजीवी वर्ग विस्थापित होतोय.याचंही प्रतिबिंब नव्या कवितांमध्ये उमटू लागलंय.उदाहरणार्थ, नाशिकच्या अरुण काळेचा अलिकडील कवितासंग्रह..अरुण काळे हा आमच्या खूप नंतरचा.पण कुठल्या दिशेने पुढे जायचं याचं जे दिशादिग्दर्शन दलित साहित्यानं केलं होतं,त्या ट्रॅकनेच लोक पुढे जाताहेत.
शोषणाच्या सर्व प्रक्रियांविरोधतात जाणं, बंड करणं ही दलित साहित्याची प्रेरणा आहे.ढसाळ यांचा जन्म १५ फेब्रुवारी १९४९ रोजी पुणे जिल्ह्यातील एका खेडेगावात झाला. त्यांच्या घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची होती.त्यामुळे लहाणपणीच ते वडिलांसोबत मुंबईला आले. पुढे मुंबईतील गोलपीठा या रेड लाइट भागात त्यांचं बालपण गेलं.महानगरीय जीवनावर लिहिणारे आणि बोली भाषेत लेखन करणारे ते मराठीतले एक महत्त्वाचे लेखक होते.दलित समाजात आपल्या कविताच्या माध्यमातून जनजागृती केली.
‘दलित पँथर’ या आक्रमक संघटनेचे ते संस्थापक अध्यक्ष
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांवर नितांत श्रद्धा असलेले पद्मश्री नामदेव ढसाळ ऐन तारुण्यातच दलित चळवळीकडे आकर्षित झाले. काव्य असो, गद्य असो की वृत्तपत्रांतील स्तंभलेखन असो, आपल्या साहित्यातून आंबेडकरांचे क्रांतिकारी विचार तितक्याच प्रखरपणे मांडण्याचे काम ढसाळ यांनी केले.अनियतकालिकांच्या चळवळीतही ते अग्रभागी होते.
त्यांच्या क्रांतिकारी साहित्याची दखल जागतिक पातळीवरही घेतली गेली.साहित्याच्या माध्यमातून दलितांच्या व्यथा, वेदनांना वाचा फोडणारे नामदेव ढसाळ दलित चळवळीचे एक बिनीचे शिलेदार होते.महाराष्ट्राबरोबरच देशाच्या राजकारणाला हादरा देणाऱ्या ‘दलित पँथर’ या आक्रमक संघटनेचे ते संस्थापक अध्यक्ष होते.
व्यवस्थेवर आसूड ओढणाऱ्या कविता
दलित चळवळीतील समवयस्क सहकाऱ्यांच्या व साहित्यिकांच्या साथीने त्यांनी १९७२ मध्ये पँथरची स्थापना केली. अमेरिकेतील ‘ब्लॅक पँथर’ चळवळीपासून प्रेरणा घेऊन जन्मलेल्या या संघटनेने दलित चळवळीला एक आक्रमक चेहरा दिला.दलितांच्या अनेक प्रश्नांवर उग्र आंदोलने केली. तत्कालीन सरकारांना दलित हिताच्या भूमिका घ्यायला भाग पाडले.त्यावेळच्या प्रत्येक आंदोलनात ढसाळ यांनी हिरीरीने भाग घेतला. कालांतराने या चळवळीत फूट पडली.अनेक नेत्यांनी आपापले पक्ष स्थापन केले.मात्र,‘दलित पँथर’शी ढसाळ यांचं नातं अखेरपर्यंत कायम होतं.
काव्यलेखनासाठी पारंपरिक रंजनवादी शैली टाळून कल्पनारम्यतेला नकार देऊन आशयाला थेट भिडणारी वास्तववादी कविता हे विद्रोही कवितांचे वैशिष्ट्य.तसेच प्रवाहा विरुद्ध तसेच निसर्ग कविता, ललित कविता वगळून प्रचलित व्यवस्थेवर आसूड ओढणाऱ्या कविता म्हणून ओळखल्या जातात.
साहित्य आणि पुरस्कार
गोलपीठा ,तुझे बोट धरून चाललो आहे मी,तुही इयत्ता कंची ,मी मारले सूर्याच्या रथाचे सात घोडे,आमच्या इतिहासातील एक अपरिहार्य पात्र :प्रियदर्शनी,खेळ,मूर्ख म्हाताऱ्याने डोंगर हलवले,या सत्तेत जीव रमत नाही,मी भयंकराच्या दरवाजात उभा आहे (निवडक कवितांचा संग्रह),गांडू बगीचा,निर्वाणा अगोदरची पीडा,सर्व काही समष्टीसाठी,बुद्ध धर्म:काही शेष प्रश्न आंधळे शतक,ही त्यांची ग्रंथसंपदा,
त्यांना महाराष्ट्र राज्य पुरस्कार -(गोलपीठा),सोव्हिएत लॅंड नेहरू पुरस्कार,महाराष्ट्र राज्य कवी केशवसुत पुरस्कार,पद्मश्री पुरस्कार,बहिणाबाई चौधरी पुरस्कार,पद्मश्री सहकार महर्षी विखे पाटिल साहित्य पुरस्कार,साहित्य अकादमी स्वर्णजयंती:जीवनगौरव पुरस्कार,गंगाधर गाडगीळ साहित्य पुरस्कार,डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मृती पुरस्कार,बुद्ध रोहिदास विचार गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आले. .
अमेरिकेतील ब्लॅक पॅंथर चळवळीचा प्रभाव
ढसाळ यांनी साहित्याच्या माध्यमातून दलितांच्या व्यथा, वेदनांना प्रसिद्धी दिली.
महाराष्ट्र आणि भारताला प्रभावित करणाऱ्या ‘दलित पॅंथर’ या आक्रमक संघटनेचे ते संस्थापक अध्यक्ष होते.
या संस्थेची स्थापना त्यांनी इ.स.१९७२ मध्ये दलित चळवळीतील समवयस्क सहकार्यांच्या व साहित्यिकांसह केली.
या संघटनेवर अमेरिकेतील ब्लॅक पॅंथर चळवळीचा प्रभाव होता.
सदर संघटनेद्वारा ढसाळ यांनी दलितांच्या अनेक प्रश्नांवर उग्र आंदोलने केली,
व तत्कालीन सरकारांना दलित हिताच्या भूमिका घेण्यास भाग पाडले.
कालांतराने या चळवळीत फूट पडल्यावरही ढसाळ हे दलित पॅंथरमध्येच राहिले
मराठवाडा विद्यापीठ नाम विस्तारमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे.दलित चळवळीला त्याचे महत्त्वाचे योगदान आहे.
दलितांना आत्मभान देणारे आक्रमक नेते
नामदेव ढसाळ हे इ.स. १९६० नंतरच्या मराठी कवींमधील प्रमुख कवी समजले जातात.
त्यांनी विशिष्ट शैलीने मराठी कवितेत मोलाची भर घातली.त्यांनी भाषिकदृष्टया प्रमाण मराठी भाषेपेक्षा वेगळी भाषा वापरली.
त्यांच्या कृतींमध्ये वेदना,विद्रोह आणि नकार हा स्थायीभाव आहे
प्रस्थापित पांढरपेशे लेखक आणि रसिक यांना आपल्या अनोख्या शैलीने हादरा देणारे ज्येष्ठ दलित साहित्यिक
आणि ‘दलित पँथर’चे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्या निधनाने
साहित्याच्या व चळवळीच्या माध्यमातून दलितांना आत्मभान देणारा आक्रमक नेते होते.
नामदेव ढसाळ यांचे दलित चळवळीत मोठे योगदान होते.
मराठी कवितेचे नायक ठरले
दलित व दुर्बल घटकांवर होणाऱ्या अन्यायाबद्दल त्यांना तीव्र चीड होती.दलितांवरील वाढत्या अत्याचाराचा मुकाबला करण्यासाठी त्यांनी दलित पँथरची स्थापना करून अनेक तरुणांना संघटित केले व त्या माध्यमातून अन्यायाविरुद्ध लढा दिला.हा कवी धगधगत होता.त्याची कविता ज्वालामुखीसारखी वाचकांच्या मनात पसरत होती.कवितेविषयीच्या पारंपरिक श्रद्धा आणि भक्तिभाव पेटवित होती.
नामदेव ढसाळांना हे सहज शक्य झाले याचे कारण जन्माला आल्यापासूनच त्यांना दुःखांनी घेरले होते.जातवास्तवाच्या जहराने त्यांना मोकळा श्वास घेऊ दिला नाही. आणि वर्गवास्तवाने त्यांना मानसिक स्वस्थता लाभू दिली नाही.ढसाळांचे आयुष्य असे जंगलासारखे पेटत होते आणि हे आयुष्य मराठी कवितेत आपले उग्र रूप घेऊनच प्रवेशले. आणि नामदेव ढसाळ दलित,आंबेडकरवादी कवितेचे नायक झाले.एकूणच मराठी कवितेचे नायक ठरले.
एकूणच भारतीय कविता त्यांनी संपूर्ण बदलून टाकली
भारतीय कविता मानव केंद्रीत केली यांनी भारतीय मानसिकतेची भेदनिती तंतोतंत ओळखली होती.आणि ते त्यावर तुटून पडले.
चंद्र-ताऱ्यात अडकलेली मराठी कविता आणि एकूणच भारतीय कविता त्यांनी संपूर्ण बदलून टाकली,मानव केंद्रीत केली.
जागतिक वाङमयापर्यंत पोहोचली.कवितेतील त्यांचे योगदान शब्दातीत आहे.
नामदेव ढसाळ आयुष्याची शेवटची अनेक वर्षे मायस्थेनिया ग्रॅव्हीज या दुर्धर आजाराने ग्रस्त होते.
याशिवाय त्यांना कॅन्सरचा आजारही जडला होता.
जानेवारी १३, इ.स.२०१४ रोजी त्यांना मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.
बुधवार,१५ जानेवारी इ.स. २०१४ रोजी पहाटे चारच्या सुमारास त्यांचे निधन झाले.ते ६४ वर्षांचे होते.
हेही वाचा.. इंडिया दॅट इज कास्ट
एका नामांतर शहिदाची अस्वस्थ कहाणी..!
हेही वाचा..हसण्यावारी नेऊ नका
ऑलिम्पिक स्टार वंदना कटारिया च्या घराबाहेर जातीयवादी गुंडांचा नाच
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..@jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)