नगर : नगरमध्ये कॉपीचा सुळसुळाट,शिक्षिकेला धमकी ; कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा – 12 वि फेल चित्रपट नुकताच गाजला,त्यामध्ये एक अशी शाळा होती,जिथं दहावीच्या विद्यार्थ्यांना शाळा,शिक्षकच कॉपी पुरवून पास करून देत होते,अशाप्रकारे खेळखंडोबा करून खरतर अशा विद्यार्थ्यांना पुढील कोणत्याही परीक्षेसाठी निकामी करण्याचा हा एक उद्योग असतो. असे विद्यार्थी मग मेहनत घेण्याची कष्ट करण्याची तयारी सोडून देतात.खरतर कुणीही विद्यार्थी जन्मत:च हुशार नसतो,खूप सारे लोक मेहनत करून अभ्यासात गती मिळवतात प्राविण्य मिळवतात.अभ्यास हा सरावानेच करायची गोष्ट असते,मात्र काही लोक याला फाटा देतात.आपल्या राज्यातही दहावीच्या परीक्षा सुरू आहेत.मात्र त्याअगोदर पासूनच तलाठी परीक्षेच्या पेपर फुटीच्या घटना राज्यात घडल्या हे कमी म्हणून की काय आता दहावीच्या विद्यार्थ्यांना थेट युपी-बिहार स्टाइल कॉप्या पुरवल्या जात असल्याचे धक्कादायक चित्र समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे.सदर घटनेचा व्हिडिओ आता सोशल मिडियात व्हायरल होत आहे.
नगरमध्ये कॉपीचा सुळसुळाट
अनेक विद्यार्थी परीक्षेसाठी जीवतोड मेहनत करत असतात.यासाठी रात्रीचा दिवसही केला जातो.असे तहान भूक हरपून अभ्यासाचे कष्ट घेणाऱ्या विद्यार्थ्यांवर अशाप्रकारे अन्याय होत असल्याची भावना निर्माण होत आहे.तर दुसरीकडे शिक्षकांना सुद्धा धमकावले जात असल्याने कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचे चित्र दिसून येत आहे.मिळालेल्या माहितीनुसार, बीड जिल्ह्यातील धानोरा बीड कोपरा येथील एका शाळेतील हा व्हिडिओ असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
सदर व्हिडिओ मध्ये शिक्षिका या कॉपी पुरवणाऱ्या गुंडांचा धाडस करून व्हिडिओ करत असताना
हे गुंड बेधडक वर्गांमध्ये फिरून कॉपी वाटत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
यातील काही तरुण तर कमी वयाचे देखील दिसत आहेत,पण त्यांचा एटीट्यूड सराईत गुंडांना लाजवणारा असल्याचे दिसून येते,
यातल्या काहींनी तर या व्हीडिओ बनविणाऱ्या शिक्षिकेला वाईट भाषेचा उल्लेख करत धमकी दिल्याचेही या व्हीडिओत दिसून येत आहे.
मात्र हा व्हिडीओ व्हायरल होऊनही अद्याप या प्रकारावर कोणतीही कारवाई झाल्याचे समजलेले नाही.
यात आणखी एक गंभीर बाब म्हणजे दहावीची परीक्षा सुरू असते त्या परीक्षा केंद्रावर पोलिसांचा बंदोबस्त असतो,मात्र या शाळेच्या आवारात असे काही आढळून आल्याचे दिसत नाही,किंवा असेल तर मग हे पोलिस नक्की काय करत होते असा प्रश्नही उपस्थित होतो आहे.एकूणच हा प्रकार महाराष्ट्राच्या शैक्षणिक नाव लौकिकाला काळिमा फासणारा असल्याची चर्चा मात्र सोशल मिडीयावर रंगली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी परीक्षेत सुद्धा मास कॉपी चा प्रकार उघडकीस आला होता
आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on MAR 27,2024 | 15:40 PM
WebTitle – Nagar Plagued by Copycat Crime: Teacher Threatened – Addressing Law and Order Concerns