मार्च महिना सुरू आहे,उन्हाने आता धरती तापवणे सुरू केले आहे.पशू पक्षी मनुष्य अशा उष्णतेत पाणी शोधतात,पाण्यासाठी मैल मैल पायपीट करतात.याच मार्च महिन्यात एक इतिहास घडला होता.20 मार्च 1927 रोजी पाण्यासाठी चवदार तळ्यावर क्रांती संगर घडला होता, पाण्याला आग लागली होती.आपल्याच धर्मातील काही जातवर्गांना पाणी नाकारले जात होते.जिथे गुरे ढोरे अंघोळ करीत पाणी पीत ते मनुष्याला पिण्यास स्पर्श करण्यास मनाई होती.कारण अजब त्यांची तथाकथित जात,जी त्यांना जन्माच्या अपघाताने चिकटली.आम्हीही मनुष्य आहोत तुमच्याप्रमाणेच आम्हालाही पाणी पिण्याचा अधिकार आहे हे तत्कालीन तथाकथित स्पृश्य हिंदूंना सांगावे लागले.मंदिरात पाणी प्यायला गेला,जबर माराहण झालेल्या लहान मुलाची चूक एवढीच की तो तहानेने व्याकूळ होता.
मुलगा मार खाताना पुन्हा म्हणतो काका मी फक्त पाणी प्यायला आलो होतो
मात्र 94 वर्षानंतरही ही पाणी नाकारण्याची संस्कृती काही बदलली नाही.आजही काही गावखेड्यात पाण्यावरून तंटे आणि मारहाण झाल्याच्या बातम्या पाहायला मिळतात.नुकतीच एक घटना सोशल मिडियात व्हायरल होत आहे.एक अल्पवयीन मुलगा तहानेने व्याकूळ झाला.तो मंदिरात पाणी पिण्यासाठी गेला.तिथं उपस्थित श्रुंगी नंदन यादव या विकृत नराधमाने या लहान मुलास पकडले,त्याला अगोदर त्याचे नाव विचारले,त्यानंतर वडिलांचे नाव विचारले आणि तो मंदिरात कशासाठी गेला हे विचारले गेले.
हे प्रश्न श्रुंगी नंदन यादव ने हेतुपूरस्सर विचारले.त्याचा एक मित्र यावेळी या सर्व घटनेचा व्हिडिओ बनवत होता,
मुलाने त्याला प्रामाणिकपणे उत्तरे दिली,त्याचे नाव आसिफ असे सांगितले.
मंदिरात पाणी प्यायला गेला,जबर माराहण झालेल्या लहान मुलाची चूक एवढीच की तो तहानेने व्याकूळ होता.
वडिलांचे नाव हबिब असे मुलगा निरागसपणे सांगतो,त्याला माहीत नसतं पुढे काय घडणार आहे.श्रुंगी नंदन यादव त्याला विचारतो मंदिरात कशासाठी आला होता? मुलगा म्हणतो पाणी प्यायला काका.. हे ऐकताच श्रुंगी नंदन यादव त्याला मारहाण करण्यास सुरुवात करतो,लहान मुलाच्या जननेंद्रियावर हेतुपूर्वक लाथ मारून जखमी करण्याचा प्रयत्न श्रुंगी नंदन यादव करतो.श्रुंगी नंदन यादव चा दूसरा साथीदार व्हिडिओ बनवत आहे.मुलगा मार खाताना पुन्हा म्हणतो काका मी फक्त पाणी प्यायला आलो होतो…
सोशल मिडियात पोस्ट करून लोकांकडे पैशांची मागणी
ही घटना फक्त धार्मिक अनुषंगाने झालेली नाही,सोशल मिडियात दहशत निर्माण करणे
आणि त्यातून पैसे कमावणे हाही एक उद्देश यामागे आहे असे समोर आले आहे.
धक्कादायक म्हणजे घटनेचा व्हिडिओ स्वत:श्रुंगी नंदन यादव ने सोशल मिडियात पोस्ट करून लोकांकडे पैशांची मागणी केली आहे.
आर्थिक मदत केली तर आपण असेच मुस्लिमांना मारून त्यांचे व्हिडिओ टाकत जाऊ असंही म्हटलंय.
हिंदू एकता संघ नावाच्या इन्स्टाग्रामवरील पेजवर त्याने हा व्हिडिओ शेअर केलाय.
हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी टीका केल्यावर गाझियाबाद पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे काही माध्यमांच्या वृत्तानुसार आरोपी हा हिंदू एकता संघ नावाच्या संस्थेचा सदस्य आहे.
मातंग समाज अन तरुणांच्या अधोगतीला जबाबदार कोण?
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published on March 13, 2021 15:15 PM
WebTitle – muslim-child-thrashed-for-drinking-water-inside-temple-ghaziabad