आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा हे आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात. यावेळी त्यांनी भाज्यांच्या वाढत्या किमतींबाबत वक्तव्य केले आहे. हिमंत बिस्वा सरमा म्हणाले की, आसाममध्ये विशेषतः गुवाहाटीमध्ये भाज्यांचे भाव वाढत आहेत. याला ‘मियां मुस्लिम’ व्यापारी जबाबदार आहेत. दुसरीकडे एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी हिमंत सरमा यांच्या वक्तव्यावर प्रत्युत्तर दिले आहे. Miya Muslim traders responsible for vegetable inflation – Assam Chief Minister Himanta Biswa Sharma
मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा Himanta Biswa Sharma म्हणाले की, मियां मुस्लिम व्यापारी गुवाहाटीमध्ये आसामी लोकांकडून भाज्यांची जास्त किंमत घेत आहेत, तर गावात भाज्यांची किंमत कमी आहे. जर आज आसामी व्यापारी भाजी विकत असते तर त्यांनी कधीच आपल्या आसामी लोकांकडून जास्त भावाने भाजी विकली नसती. इतकंच नाही तर हिमंत बिस्वा सरमा म्हणाले की, ईदच्या काळात गुवाहाटी शहरात बसेसची वर्दळ कमी असते हे आपण सर्वांनी पाहिले आहे. बहुतेक बस आणि कॅब चालक मियां समाजातील असल्याने रस्त्यावर गर्दी कमी दिसते.
बहुपत्नीत्व रोखण्यासाठी कायदा
याआधी हिमंता बिस्वा सरमा म्हणाले होते की, सरकार बहुपत्नीत्व रोखण्यासाठी विधानसभेच्या पुढील अधिवेशनात विधेयक आणणार आहे.
कोणत्याही कारणास्तव पुढील अधिवेशनात विधेयक मंजूर झाले नाही, तर जानेवारीत विधेयक आणू, असेही ते म्हणाले.
सीएम सरमा यांनी दावा केला आहे की, पैगंबरही बहुपत्नीत्वाचे समर्थन करत नाहीत.कारण मुस्लीम पुरुषाला एकच पत्नी असावी, असे त्यांचे मत होते.
कोंबडी अंडी देत नसेल तर मियां मुस्लिम दोषी
आसामच्या मुख्यमंत्र्यांच्या विधानावर पलटवार करत ओवेसी म्हणाले की, देशात असा एक गट आहे,
ज्यांच्या घरात म्हैस दूध देत नसेल किंवा कोंबडी अंडी देत नसेल तर ते मियांजींनाही दोषी ठरवतील.
काय आहे संपूर्ण प्रकरण
हिमंता सरमा यांनी गुरुवारी (१३ जुलै) असं म्हटलं होतं की,
पूर्व बंगाल वंशाचे मुस्लिम आसाममधील लोकांपेक्षा जास्त किंमत वसूल करत आहेत. बिस्वा म्हणाले की, मिया लोकांनी गुवाहाटीमधील स्थानिक भाजी मार्केटचा ताबा घेतला आहे. जर एखादा आसामी तरुण भाजीपाला विकत असेल तर तो इतर आसामी नागरिकांकडून भाव वाढवून विकत नाही.
इतकेच नाही तर सीएम हिमंत बिस्वा पुढे म्हणाले,
‘मी आसामी तरुणांना आश्वासन देतो की मी शहरातील सर्व मिया मुस्लिम भाजी विक्रेत्यांना हाकलून देईन.’
कोण आहे मियां मुस्लिम?
मिया मुस्लिम हे स्थलांतरित बंगाली मुस्लिमांचे वंशज असल्याचे बोलले जाते.जे की 20 व्या शतकात आसामच्या ब्रिटिश वसाहतीच्या काळात ब्रह्मपुत्रा खोऱ्यात राहायला आले.मिया मुस्लिम स्थलांतरित सध्याच्या बांगलादेशातील मैमनसिंग, रंगपूर आणि राजशाही विभागातून आल्याचे बोलले जाते. सीएम हिमंत बिस्वा सरमा म्हणाले, ‘आम्ही अलीकडेच ईदच्या दिवशी पाहिलं की, गुवाहाटीतील बहुतेक रस्ते रिकामे होते कारण *ते सण साजरे करत होते.’
हेही वाचा.. मुस्लिम बस कंडक्टर हिरवी टोपी घालून होता;महिला प्रवाशाने उतरवली
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on JULY 15,2023 | 12:40 PM
WebTitle – Miya Muslim traders responsible for vegetable inflation – Assam Chief Minister Himanta Biswa Sharma