सर अलेक्झांडर कनिंघम
MBCPR टीम नाशिक तर्फे
सर अलेक्झांडर कनिंघम यांची २०८ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी.
(२३ जाने. १८१४ – २८ नोव्हे.१८९३)
आज सर अलेक्झांडर कनिंघम यांचा जन्मदिवस …
२३ जानेवारी १८१४ रोजी लंडन मध्ये झाला.
आपण ब्रिटिशांना नेहमीच वाईट ठरवत असतो, पण ब्रिटिशांचा भारतातील कामांचा आढावा घेतला तर लक्षात येते की ब्रिटिशांनी अशी अनेक कामे केली आहेत की ज्यामुळे त्यांना नमन करावे वाटते.
ब्रिटीश भारतात आले त्यापैकी एक नाव इतिहासात सुवर्ण अक्षरात कोरले गेले असे जे होते ते म्हणजे सर अलेक्झांडर कन्नीन्घम..
वयाच्या १९व्या वर्षी ते बेंगाल इंजिनियर्स मध्ये रुजू झाले आणि २८ वर्षे ब्रिटिश सैन्यात काम करत मेजर जनरल म्हणून निवृत्त झाले.
ज्या वयात मुलं मौज मजा करतात त्या वयात कनिघम सरांनी भारतातील मातीखाली दडलेली बौद्ध संस्कृती वर काढण्याचे अनमोल कार्य केले.
बौद्ध संस्कृतीला पुनरुज्जीवन देण्याचे काम जर कुणी केले असेल तर ते म्हणजे सर अलेक्झांडर कन्नीन्घम यांनी…
तक्षशिला, नालंदा विद्यापीठ तसेच सारनाथ येथील धम्मेक स्तूप ज्याठिकाणी तथागत बुद्धांनी प्रथम धमोपदेश दिला ते ठिकाण देखील यांनी उत्खणन करून शोधून काढले.
ज्यावेळी त्यांना सारनाथ येथे उत्खणन करावयाचे होते त्यावेळी त्यांनी ब्रिटीश सरकारकडे त्यासंदर्भात मागणी केली होती की मला उत्खणन करण्यासाठी परवानगी द्यावी व त्यासाठी निधी द्यावा परंतु ब्रिटिश सरकारने परवानगी दिली मात्र निधी दिला नाही,
अलेक्झांडर कन्नीन्घम सर हे जराही विचलित न होता, निराश न होता त्यांनी आपला संपूर्ण वेतन उत्खणन करण्यासाठी वापरला.
त्यामुळे आज आपण सारनाथ येथे जाऊन तेथील बौद्ध संस्कृतीचे अतिशय पूज्य मानले जाणारे धम्मेक स्तूप जे १४५ फूट उंच आहे त्यास आपण बघू शकतो वंदन करू शकतो.
१८३४ मध्ये भारतात आल्यानंतर त्यांची भेट जेम्स प्रिन्सेप बरोबर झाली जिचे रूपांतर जिवलग मैत्रीत झाले. प्रिन्सेप त्यावेळेस अनेक शिलालेखांवर काम करत होते व लिपीचा शोध घेत होते.
कन्नीन्घमला देखील भारतीय इतिहासाची आवड निर्माण झाली. ब्रिटिश सैन्यातील त्यांची कामगिरी जरी वाखण्याजोगी होती तरी इतिहासात त्यांचे नाव कोरले गेले ते त्यांच्या उत्खननातील अनेक शोधांमुळे.
त्यांनी कुशीनारा येथील बुद्धांचे महापरिनिर्वाण स्थळ शोधून काढले व तेथील १५०० वर्षे जुनी भ.बुद्धांची महापरिनिर्वाण मुद्रेतील मूर्ती उत्खननातून शोधून काढली. १८४६ मध्ये कन्नीन्घमने त्यावेळेसच्या गव्हर्नर जनरल लॉर्ड कँनिंग यांना प्रस्ताव पाठवून भारतात पुरातत्त्व सर्वेक्षण सुरु करण्याचा आग्रह धरला.
त्यांच्या प्रयत्नांना यश आले आणि १८६१ साली Archaeological Survey of India ची स्थापना करण्यात आली आणि त्याचे पहिले डायरेक्टर जनरल म्हणून सर अलेक्सझांडर कन्नीन्घम यांची नियुक्ती करण्यात आली.
त्यानंतर त्यांनी भारतात उत्खननास खूप चालना दिली.
कन्नीन्घम यांनी अनेक ग्रंथ लिहिले मात्र त्यांनी सुरु केलेल्या Corpus inscriptionum indicarum ही ग्रंथ मालिका भारतीय इतिहास आणि पुरातत्त्वाचे मानदंड समजले जाते.
आज सर अलेक्सझांडर कन्नीन्घम यांची २०८वी जयंती आहे मात्र पुरातत्व विभागास याचा विसर पडलेला दिसून येत आहे,
कारण ज्या पुरातत्व विभागाचा पाया सर अलेक्झांडर कन्नीन्घम
यांनी रचला त्यांची जयंती साजरी करण्यासाठी इतकी उदासीनता का असावी,
पुरातत्व विभाग स्थापन करण्यासाठी केलेल्या पाठपुराव्यात सर अलेक्झांडर यांचे मोठे योगदान आहे, पुरातत्व
विभागात अनेक लोकांना रोजगार मिळतोय त्यांच्या प्रति निदान कृतज्ञता तरी व्यक्त करायला हवी मात्र तसे होताना दिसत नाहीये…
जेथे जेथे प्राचीन लेणी आहे, प्राचीन वास्तू
आहे अशा सर्व ठिकाणी जेम्स प्रिन्सेप व सर अलेक्झांडर कनिघम यांची जयंती साजरी करायला हवी ..
आज MBCPR टीमच्या वतीने त्रिरश्मी बुद्ध लेणींच्या पायथ्याशी सर अलेक्झांडर कन्नीन्घम
यांची २०८ वी जयंती साजरी करण्यात आली,
तसेच त्यांच्या कार्याची उजळणी घेऊन त्यांचे दैदिप्यमान काम उपस्थित कर्मचारी यांना सांगण्यात आले,
ह्यावेळी MBCPR टीमच्या वतीने सुनील खरे, दस्तुरखुद्द संतोष आंभोरे यांनी सर अलेक्सझांडर कन्नीन्घम यांच्या जीवनपटावर व त्यांनी केलेल्या कामांविषयी उपस्थितांना माहिती देण्यात आली व इथून पुढे सर अलेक्सझांडर कन्नीन्घम यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्याचे आवाहन उपस्थितांना करण्यात आले.
आज प्रसंगी प्रभाकर लोखंडे, अनिकेत चव्हाण, अनिकेत पानपाटील, पुरातत्व विभागाचे कर्मचारी विजय टाक, करणकाळ, व पुरातत्व विभाग इतर कर्मचारी उपस्थित होते.
ह्या महानायकास मनापासून त्रिवार वंदन…
मनसर विश्व विद्यापीठ येथे MBCPR टीम तर्फे कार्यशाळा संपन्न
नेताजी सुभाष चंद्र बोस यांची जेव्हा हिटलरने माफी मागितली
Thich nhat hanh:थिच न्यात हन्ह बौद्ध दृष्टिकोणास मूर्तरूप देणारे भिक्खू
तस्नीम मीर: Tasnim Mir अशी बनली जागतिक क्रमवारीत अव्वल
टेलीप्रॉम्प्टर म्हणजे काय? कसे काम करते? नरेंद्र मोदी यांचे भाषण चर्चेत
जय भीम पिक्चर आणखी एक विक्रम,ऑस्कर अकादमी कडून सन्मान
जयभीम चित्रपट थांबायचे नाव घेईना ,चीन मध्ये ठरतोय लोकप्रिय
जयभीम चित्रपट:नोंदवला आणखी एक विक्रम आंतरराष्ट्रीय सन्मान
बाबासाहेब चित्रपटात कुठेही नाहीत,तरीही ‘सबकुछ’ जयभीम चित्रपटाच्या निमित्ताने
जय भीम सिनेमा :व्यवस्थेने दिलेल्या यातनांचा वास्तवदर्शी थरारक अनुभव
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published by Team Jaaglya Bharat on JAN 25, 2022 11: 34 AM
WebTitle – MBCPR Team Nashik Celebrates Sir Alexander Cunningham’s Birthday