भारतीय संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 64 व्या महापरिनिर्वाण दिनी , (6 December 2020 ) (mahaparinirvan din) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लाखों करोडो भीम अनुयायांनी घरूनच अभिवादन केले. चैत्यभूमी येथून मुंबई महानगरपालिकेने ऑनलाईन अभिवादनाची व्यवस्था केल्याने देशभरातून चैत्यभूमी,दादर येथे येणाऱ्या भीम अनुयायांना ऑनलाईन अभिवादन करता आले.त्यामुळे या महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमी दादर येथे नेहमीप्रमाणे जनसागर उसळला नाही.गर्दी झाली नाही.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,मुंबई महानगरपालिका,मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर,महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी देशभरातील भीम अनुयायांना यावर्षी चैत्यभूमी दादर ला भेट न देता ऑनलाईन अभिवादन करण्याचे आवाहन केले होते.त्यांच्या विनंतीवजा आवाहनाला भीम सैनिकांनी आदर करत प्रतिसाद एक आदर्श समाजाचे उदाहरण उर्वरित समाजासमोर प्रस्थापित केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कायम देश, आणि सर्व समाज घटकांच्या हिताचा विचार करून त्यांना .सर्वोच्च प्राथमिकता दिली.त्यांची ही विचारसणी तंतोतंत पाळत असल्याचे अनुयायांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले.आणि शासनाला व बृहन्मुंबई महानगरपालिकेला संपूर्ण सहकार्य केले.कोरोना संसर्ग (corona virus ) अर्थात कोविड-19 (covid-19) च्या प्रादुर्भावाने सर्वच सरकारी यंत्रणेवर ताण आहे,जगभरातील महासत्ता असणारे देश जेरीस आलेले असताना व्यवस्थेवर कोणत्याही प्रकारे ताण येवू नये याची दक्षता विविध जात-धर्मीय आंबेडकरवादी अनुयायांनी घेऊन आपलं राष्ट्रप्रेम आणि एक सुजाण नागरिक म्हणून असणारी जबाबदारी पार पाडली आहे. त्यांच्या या
त्यांच्या या विवेकी कृतीचे कौतुक सरकारी यंत्रणेकडून होणे उचित होते.भीम अनुयायांच्या या सहकार्याबद्दल
मुंबईच्या महापौर श्रीमती.किशोरी पेडणेकर,महानगर पालिका आयुक्त श्री. इकबाल सिंह चहल,
अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) श्री. संजीव जयस्वाल,उपायुक्त परीमंडळ – 2 विजय बालमवार,जी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त श्री. किरण दिघावकर यांनी महानगरपालिकेतर्फे आभार मानले आहेत.
हेही वाचा.. भक्ती नाकारलेला विवेकी आंबेडकरी समाज
हे ही वाचा.. धुवांधार वॉटर फॉल : त्यांच्या जीवाची किंमत फक्त ५० रूपये
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..@jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)