मध्य प्रदेश: मध्य प्रदेशातील सिधी जिल्ह्यात १५ हून अधिक महाविद्यालयीन आदिवासी मुलींवर बलात्कार केल्याप्रकरणी मुख्य आरोपीसह तिघांना अटक करण्यात आली आहे. आरोपी पीडित मुलींशी बोलून आवाज बदलून त्यांना आपल्या जाळ्यात अडकवत असे.या प्रकरणी रीवा रेंजचे आयजी महेंद्रसिंग सिकरवार यांनी सांगितले की, तपास जसजसा पुढे जाईल तसतसे पीडितांची संख्या वाढू शकते. पोलिसांनी मुख्य आरोपी ब्रजेश प्रजापतीसह तिघांना अटक केली आहे.
अशा प्रकारे तो महिलांना टार्गेट करत असे
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा आपला आवाज बदलून महाविद्यालयात शिकणाऱ्या आदिवासी पीडित विद्यार्थिनींशी बोलत असे.
जेव्हा मुली त्याच्या जाळ्यात अडकायच्या तेव्हा तो त्यांना त्यांच्या समस्या विचारायचा आणि त्या सोडवण्यासाठी कागदपत्रांसह बोलावायचा
आणि नंतर त्यांच्यावर बलात्कार करायचा.त्यानंतर पीडित महिलेला याबद्दल वाच्यता करू नकोस म्हणून धमकी देत असे.
अटकेच्या भीतीने आरोपी त्याचा मोबाईलही फोडायचा. हा सिलसिला जवळपास 6 महिने चालू होता.
या प्रकरणी आतापर्यंत ४ पीडितांनी तक्रार दाखल केली आहे. त्यांची संख्या 15 पेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे. पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
चार आरोपींना अटक
सिधी येथील आदिवासी विद्यार्थिनींवर झालेल्या बलात्काराच्या घटनेप्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. ज्यामध्ये ब्रिजेश प्रजापती हा मुख्य आरोपी असून तीन सहआरोपी आहेत. ब्रिजेश प्रजापती, वय ३० वर्षे, रा. अमरवाह पोलीस ठाणे, तर अन्य तीन आरोपी संदीप गोपाल प्रजापती वय २१ वर्षे, राहुल गोपाल प्रजापती वय २४ वर्षे, लवकुश मंगल प्रजापती वय २३ वर्षे रा. मडवास. सिधी जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थिनींवर झालेल्या बलात्काराच्या घटनेनंतर रीवा झोनचे आयजी महेंद्र सिंह सिकरवार सिधी येथे पोहोचले असून त्यांनी तपासाची सूत्रे हाती घेतली आहेत.
काय म्हणाले मुख्यमंत्री?
या घटनेबाबत मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री डॉ.मोहन यादव यांनी सांगितले की, आदिवासी विद्यार्थिनींना शिष्यवृत्तीचे आमिष दाखवून गैरकृत्य केल्याची घटना सिधी जिल्ह्यातील माझौली पोलीस ठाण्यात माझ्या निदर्शनास आली आहे. आरोपी तरुणांना अटक करण्यात आली आहे.असे निंदनीय कृत्य करणारे हे समाजाचे शत्रू आहेत, आरोपींवर कडक कारवाई केली जाईल. कोणत्याही किंमतीत सोडले जाणार नाही. या प्रकरणातील सर्व पैलूंचा बारकाईने तपास करण्यासाठी आणि ठोस पुरावे संकलित करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आले आहे. जे सर्व वस्तुस्थितीची निःपक्षपातीपणे चौकशी करून अहवाल सादर करतील.
काँग्रेस प्रमुखांनी गंभीर आरोप केले
मध्य प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष जितू पटवारी यांनी लिहिले आहे की, सिधीमध्ये आवाज बदलणाऱ्या मॅजिक व्हॉईस ॲपच्या माध्यमातून 7 हून अधिक आदिवासी महाविद्यालयीन विद्यार्थिनींवर झालेल्या बलात्काराच्या घटनेने पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाच्या सरकारच्या महिला सुरक्षेवर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत . तसेच आदिवासी आणि महिलांवरील अत्याचारात मध्य प्रदेश पहिल्या क्रमांकावर असून हाच सिधी जिल्हा आहे, जिथे एका भाजप नेत्याने आदिवासी तरुणाच्या डोक्यावर लघवी केली होती.
मध्य प्रदेशात आदिवासींना सर्वाधिक अत्याचार का भोगावे लागतात, असा प्रश्नही उपस्थित होत आहे.
आदिवासींवरील गुन्हे रोखण्यात तुमचे सरकार वारंवार का अपयशी ठरत आहे?
नुकतेच मी तुम्हाला महिलांवरील अत्याचाराबाबत सविस्तर पत्र लिहून तुम्ही मध्य प्रदेशला देशाची गुन्हेगारी राजधानी बनवल्याचे सांगितले होते.
या कलंकातून राज्याला कधी मुक्ती मिळणार? असा सवाल जितू पटवारी यांनी विचारला आहे.
आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on MAY 31,2024 | 18:10 PM
WebTitle – Many tribal girls were raped in Sidhi on the pretext of scholarship, SIT formed