मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मागील वर्षभरापासून चाललेल्या आंदोलनाची पार्श्वभूमीवर, मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला एक अंतिम अल्टिमेटम (इशारा) दिला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, जरांगे पाटील यांनी सरकारला २९ सप्टेंबरपर्यंत मराठा समाजाच्या सर्व मागण्या पूर्ण करण्याची ताकीद दिली आहे. त्यांनी स्पष्ट केले की, २९ सप्टेंबरनंतर मराठा समाजाचे संयम संपेल आणि त्यानंतर आंदोलक थांबणार नाहीत.
यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवली सराटी येथे बोलताना, मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर पुन्हा हल्ला चढवत, मराठा समाजावर झालेल्या लाठीचार्जची तीव्र शब्दांत निंदा केली. “फडणवीस यांनी मराठा समाजावर अन्याय केला असून, २०२४ च्या निवडणुकीत याचा दणका समजेल,” असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला. याचवेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही टीका करत, त्यांनी घेतलेल्या शपथांची पूर्तता न केल्याचा आरोप केला आणि मराठा समाजाची फसवणूक झाल्याचे सांगितले.
मनोज जरांगे पाटील यांनी उपोष्णाची घोषणा केल्यानंतर काहीकाळ गोंधळ निर्माण झाला होता,यावेळी माध्यमांशी बोलताना म्हटले की,
त्यांच्या आंदोलनाला एक वर्ष पूर्ण झाले आहे, तरीही त्यांच्या मागण्या पूर्ण झालेल्या नाहीत.
त्यामुळे मराठा समाज आता मागे हटणार नाही.जर मराठा समाजाने एकजूट कायम ठेवली तर हा प्रश्न सुटेल, असे त्यांनी नमूद केले आहे.
२९ सप्टेंबर रोजी होणारे उपोषण राज्यभर असेल, आणि ते शेवटचे व निर्णायक असेल, असे जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, उपोषणाच्या पार्श्वभूमीवर सोलापुरातील मराठा बांधवांनी मनोज जरांगे पाटील यांना विनंती केली की,
“लाख मेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा सुरक्षित राहिला पाहिजे.” मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाची महाराष्ट्राला गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.
आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on AUG 29,2024 | 21:14 PM
WebTitle – Manoj Jarange Patil Issues Warning Decisive Action Looms if Demands Not Met by September 29