महाविकास आघाडीत आता नव्याची नवलाई संपून खरा आहे,आता शिवसेना गृहमंत्र्यांवर नाराज असल्याच्या चर्चा सुरु आहेत. गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील हे आज मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले असल्याची माहिती आहे. राष्ट्रवादीकडे असलेलं गृहखातं सेनेला मिळावं, अशी शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांची भावना आहे. गृहखातं भाजपबद्दल सॉफ्ट असल्यानं शिवसेनेची तीव्र नाराजी असल्याची माहिती मिळत आहे.
मध्यंतरी देवेंद्र फडणवीस यांच्या पेनड्राईव्ह प्रकरणानंतर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी
सभागृहात फडणवीस याना परखडपणे उत्तर दिले नाही, यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गृहखात्याच्या कारभारावर
नाराज असल्याची चर्चा सुरु होती.राष्ट्रवादी भाजपला सॉफ्ट कॉर्नर देत असल्याची चर्चा राज्यात आहे.
या नाराजीच्या चर्चेनंतर पत्रकार परिषदेत दिलीप वळसे-पाटील (Dilip Walse Patil) यांनी मस्पष्टीकरण दिले की
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) माझ्यावर अजिबात नाराज नाहीत.
प्रत्येकाची आपापली स्टाईल, शैली असते. उलट विधानसभेतील माझ्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांनी
फोन करून माझे अभिनंदन केल्याचे दिलीप वळसे-पाटील यांनी त्यावेळी सांगितले होते.
शिवसेनेचे २५ आमदार निधीवाटपाच्या मुद्द्यावरून नाराज
महाविकासआघाडीत अंतर्गत हेवेदावे असल्याचा आरोप सातत्याने भाजपकडून केला जातो. त्यामुळे महाविकासआघाडी सरकार कधीही दगाफटका किंवा अंतर्गत संघर्षामुळे कोसळेल, असे दावेही भाजप नेत्यांनी अनेकदा केले आहेत. अशातच आता शिवसेनेच्या (Shivsena) आमदारांमध्ये मोठी नाराजी असल्याची माहिती समोर आली आहे. शिवसेनेचे २५ आमदार हे निधीवाटपाच्या मुद्द्यावरून नाराज असल्याचे समजते.यापूर्वी शिवसेनेकडूनचअर्थखात्याचा कारभार सांभाळणाऱ्या अजित पवार यांच्या कारभारावर बोट ठेवण्यात आले होते.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आमदार नाराज असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला होता,२५ किंवा त्यापेक्षा जास्त आमदार निधीवाटपाच्या मुद्द्यावरून नाराज आहेत. राज्यातील प्रत्येक आमदाराचा निधीवर हक्क आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले होते.
गृहखातं भाजपबद्दल ‘सॉफ्ट’ असल्यानं शिवसेनेची नाराजी
भाजपच्या नेत्यांवर कारवाई करण्यात गृहखातं कमी पडत असल्याची शिवसेनेची भावना निर्माण झाली आहे. प्रवीण दरेकर आणि किरीट सोमय्या प्रकरणात कारवाई न झाल्यानं शिवसेनेची नाराजी असल्याचं बोललं जात आहे. किरीट सोमय्या, प्रवीण दरेकर यांच्यावर गंभीर आरोप होऊनही कुठलीही कारवाई न झाल्यानं शिवसेनेचे नेते नाराज आहेत.
या पार्श्वभूमीवर गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील आज दुपारी मुख्यमंत्र्यांना भेटणार आहेत. गेले काही दिवस महाविकास आघाडीतले अनेक नेते गृहमंत्र्यांवर नाराज असल्याच्या चर्चा आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ही नाराजी बोलूनही दाखवली आहे. राज्यातील नेत्यांवर होणारी ईडीची कारवाई हे गृहखात्यावरचं आक्रमण आहे असं वक्तव्य संजय राऊतांनी केलंय.या पार्श्वभूमीवर वळसे-पाटील मुख्यमंत्र्यांच्या भेटीला येत आहेत.यावरून महाविकास आघाडीत धुसफूस सुरु असल्याचे चित्र दिसत आहे.
भेटीनंतर दिलीप वळसे पाटील यांचे वक्तव्य
“मुख्यमंत्री गृहमंत्रालयावर नाराज नाहीत. राज्य सरकारमध्ये सर्वाना विश्वासात घेऊन काम केलं जातं आहे. संजय राऊत यांची भावना बरोबर आहे. आमच्या विभागातून काही कमतरता असेल तर त्यामध्ये सुधारणा केली जाईल.” असं वक्तव्य राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसेपाटील यांनी केलं आहे.
इतर वाचनीय लेख/अपडेट्स
Bank frauds in india मागील सात वर्षात सर्वात मोठा घोटाळा
प्रधानमंत्री मोदी यांचे कौतुक केल्यानंतर राष्ट्रवादी च्या नेत्यांचा यु-टर्न
जगातील सर्वात वृद्ध लोकांची यादी; भारतातील एकही व्यक्ती नाही
झुंड सिनेमा:झोपडपट्टी मध्ये जन्मलेले जागतिक दर्जाचे दिग्गज खेळाडू
काश्मीर फाईल्स:तेव्हा कुणीही अश्रू देखील ढाळले नाहीत-उद्धव ठाकरे
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published by Team Jaaglya Bharat on APR 01, 2022 17:23 PM
WebTitle – mahavikas-aghadi-internal-disputes-home-minister-dilip-walse-patil-to-meet-chief-minister-uddhav-thackeray