अकोला: राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पोट निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. काल झेडपीच्या 85 जागांसाठी आणि पंचायत समितीच्या 144 जागांसाठी पोटनिवडणुकीसाठी काल मतदान पार पडले.एकूण ४२ जागांसाठी १८७ उमेदवार रिंगणात आहेत. यात जिल्हा परिषद १४ आणि पंचायत समितीच्या २८ जागांचा समावेश आहे.सत्ताधारी वंचित बहुजन आघाडी, भाजप, काँग्रेस व प्रहार जनशक्तीपक्ष स्वबळावर लढत असून महाविकास आघाडीतील शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढले.मात्र वंचित बहुजन आघाडी ने तेल्हारा पंचायत समितीवर एकहाती सत्ता कायम राखण्यात सहज यश मिळवले आहे.
तेल्हारा – हिवरखेड पंचायत समितीमधून वंचितचे अब्दुल मादाफनजमीन आदिल विजयी झाले आहेत तर वाडी अदमपुर अरविंद तिव्हाणे आणि भांबेरी येथे अरविंद उमाळे हे तीन उमेदवार विजयी झाले आहेत.वाशिम जिल्ह्यात भांबेरी जिल्हा परिषद सदस्य म्हणून प्रमोद लडे पाटील आणि पंचायत समिती मध्ये किशोर धाकुलकर विजयी झाले आहेत.
यानिमित्ताने पुन्हा एकदा अॅड. प्रकाश आंबेडकर यांचा सोशल इंजिनीअरिंगचा प्रयोग अकोल्यातील पंचायत समिती निवडणुकीत तंतोतंत लागू ठरल्याचे दिसून आले आहे.
जसे निकाल येतील ही बातमी अपडेट होत राहील…
जोगेंद्रनाथ मंडल :बाबासाहेबाना घटनासमितीत पाठवणारा विश्वासू सहकारी
हे ही वाचा.. डॉ.आंबेडकरांचा जगातील पहिला पुतळा स्थापन करणारा मराठा
दुर्गाबाई भागवत यांच्या वेश्यासंबंधीत मतावर समाचार घेणारे राजा ढाले
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published by Team Jaaglya Bharat on OCT 06, 2021 11 :51 AM
WebTitle – maharashtra zilla parishad elections 2021 results live updates vanchit bahujn aghadi won telhara