मुंबई : 28 जुलै 2023|एनआयएने ISIS या दहशतवादी संघटनेशी संबंधित आरोपी डॉ.अदनान अली सरकार यांना पुणे येथून अटक केली आहे. केंद्रीय तपास यंत्रणेने गुरुवारी पुण्यातील कोंढवा येथे छापा टाकून डॉ.सरकार ना तेथून ताब्यात घेतलं. त्यांच्याकडून ISIS शी संबंधित अनेक कागदपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त करण्यात आली आहेत.या प्रकरणी एनआयएने 3 जुलै रोजी मुंबई, ठाणे आणि पुणे येथून तबिश नासिर सिद्दीकी, जुबेर नूर मोहम्मद शेख, शरजील शेख आणि जुल्फिकार अली या चार आरोपींना अटक केलीय.एनआयए ने या मोहिमेला महाराष्ट्र ISIS मॉडेल पुणे असं दिलं आहे.
महाराष्ट्र ISIS मॉडेल पुणे
अटक करण्यात आलेल्या आरोपींनी आयएसआयएसच्या दहशतवादी कारवाया पुढे नेण्याचा कट रचला होता, असे तपास यंत्रणेचे मत आहे. त्यांनी स्लीपर सेल तयार करून अनेक तरुणांची भरती केली होती.असा दावा तपास यंत्रणेने केला आहे.आरोपींनी परदेशात असलेल्या त्यांच्या हँडलरच्या सूचनेनुसार ISIS चा दहशतवादी आणि हिंसाचाराचा अजेंडा पुढे नेण्यासाठी प्रक्षोभक मीडिया सामग्री देखील लिहिली होती. ‘व्हॉईस ऑफ हिंद’ मासिकात ते प्रसिद्ध झाले होते. अटक करण्यात आलेल्या पाच आरोपींच्या गटाला एनआयएने ‘इसिसचे महाराष्ट्र मॉड्यूल’ असे नाव दिले आहे.
पुणे प्रकरणाची तार नागपूर, औरंगाबाद पर्यंत
गेल्या काही दिवसांत वेगवेगळ्या तपास यंत्रणांनी महाराष्ट्रात बसून रचल्या जात असलेल्या अनेक कटांचा पर्दाफाश केला आहे.
पुणे एटीएसने गेल्या आठवड्यात मोहम्मद इम्रान खान आणि मोहम्मद युनूस सैकी या दोन आरोपींना अटक केली होती.
या दोघांनी आपला आणखी एक साथीदार मोहम्मद शाहनवाज याच्यासोबत बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षण घेतले होते
आणि चाचणी म्हणून पुणे, सातारा आणि कोल्हापूरच्या जंगलात बॉम्बस्फोट घडवून आणले होते.
असं तपास यंत्रणांनी सांगितलं.तिघेही रतलामचे असून, गेल्या दीड वर्षांपासून तिघेही पुण्यातील कोंढवा येथे भाड्याच्या घरात राहत होते.
या प्रकरणाच्या पुढील तपासासाठी महाराष्ट्र एटीएसची वेगवेगळी पथके नागपूर आणि औरंगाबाद येथेही गेली आहेत.
गेल्या दीड वर्षांत या आरोपींनी ज्यांच्याशी संपर्क साधला त्या सर्वांचा तपशील आता एटीएस काढत आहे.
विशेष बाब म्हणजे महाराष्ट्र एटीएसने अटक केलेले आरोपी मोहम्मद इम्रान खान आणि मोहम्मद युनूस सैकी
हे गेल्या वर्षी चित्तौडगड येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा कट रचलेल्या एनआयए प्रकरणात वॉन्टेड आहेत.
एनआयएने यांची माहिती देणाऱ्यांना बक्षीसही जाहीर केले होते.
मुंबईत बसून यूपीत हल्ल्याचा कट
यूपी एटीएसने महाराष्ट्र एटीएससह गेल्या पंधरवड्यात जोगेश्वरी येथून इम्रान सय्यद आणि सलमान नावाच्या दोन आरोपींना अटक केली.हे लोक पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयसाठी काम करत होते आणि गोंडा येथील त्यांच्या एका साथीदार मोहम्मद रईससह उत्तर-भारतातील लष्करी तळांवर हल्ला करण्याचा कट रचत होते. या तिन्ही आरोपींचा पाकिस्तानमधील हँडलर मुन्ना झिंगाडा होता, ज्याने 2000 मध्ये बँकॉकमध्ये छोटा राजनवर हल्ला केला होता.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on JULY 28,2023 | 10:56 AM
WebTitle – Maharashtra ISIS model Pune, fifth arrest of doctor, claim of finding controversial material