दिवाळीपूर्वी सर्व सामान्यांवर महागाईचा बॉम्ब फुटला. एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात आज २६५ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. ही वाढ केवळ व्यावसायिक गॅस सिलेंडर मध्येच झाली आहे, ही दिलासादायक बाब असली तरी घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमती अगोदर पासूनच वाढलेल्या असून त्या आवाक्याबाहेर गेलेल्या आहेत.मात्र यावेळी त्यात कोणताही बदल झाला नाही.हीच काय ती एक दिलासादायक गोष्ट आहे.
या व्यावसायिक सिलिंडर दरवाढीनंतर आता दिल्लीत व्यावसायिक सिलेंडर 2000 रुपयांच्या पुढे गेला आहे. पूर्वी तो 1733 रुपये होता. मुंबईत 1683 रुपयांना मिळणारा 19 किलोचा सिलेंडर आता 1950 रुपयांना मिळणार आहे. त्याच वेळी, आता कोलकातामध्ये 19 किलोचा इंडेन गॅस सिलेंडर 2073.50 रुपये झाला आहे. चेन्नईमध्ये आता 19 किलोच्या सिलेंडरची किंमत 2133 रुपये आहे.
दुसरीकडे दिल्लीत 14.2 किलोचा विनाअनुदानित गॅस सिलेंडर केवळ 899.50 रुपयांना उपलब्ध आहे. 6 ऑक्टोबर रोजी त्याची किंमत वाढवण्यात आली होती. त्याचवेळी 1 ऑक्टोबर रोजी केवळ 19 किलोच्या व्यावसायिक सिलिंडरच्या दरात वाढ करण्यात आली होती. कोलकात्यात 926 आणि चेन्नईमध्ये 14.2 किलोचा एलपीजी सिलेंडर अजूनही 915.50 रुपयांना उपलब्ध आहे. कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती पाहता यावेळी एलपीजी सिलेंडरची किंमत 1000 रुपयांच्या पुढे जाण्याची भीती व्यक्त केली जात होती.
जानेवारी २०२१ पासून आतापर्यंत एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमती वाढल्या आहेत
1 जानेवारी रोजी दिल्लीत 14.2 किलो गॅस सिलेंडरची किंमत 694 रुपये होती. जे 4 फेब्रुवारी 2021 रोजी वाढून 719 रुपये झाले.
10 दिवसांनंतर पुन्हा एकदा भावात वाढ दिसून आली.
नंतर भावात 50 रुपयांनी वाढ करण्यात आली.त्यानंतर गॅस सिलेंडरची किंमत ७६९ रुपये झाली होती.
25 फेब्रुवारीला कंपन्यांनी गॅस सिलेंडर च्या किमती वाढवल्या.त्यानंतर भावात 25 रुपयांनी वाढ करण्यात आली.
त्यानंतर 1 मार्च रोजी 20 रुपयांनी भाव वाढल्याने सर्वसामान्यांना पुन्हा एकदा धक्का बसला.
नंतर किंमत ७९४ रुपयांवरून ८१९ रुपये झाली.
1 एप्रिल रोजी गॅसच्या दरात 10 रुपयांची कपात केल्याने नागरिकांना दिलासा मिळाला होता.
एका वर्षात पहिल्यांदाच गॅस सिलिंडरच्या किमती कमी झाल्या होत्या.
1 एप्रिल रोजी दिल्लीत 14.2 किलो गॅस सिलेंडरची किंमत 809 रुपये होती. जो 30 जूनपर्यंत चालला होता.
मात्र पुन्हा एकदा1 जुलै रोजी दरात वाढ झाली होती. त्यानंतर गॅस सिलेंडर च्या दरात 25.5 रुपयांची वाढ झाली होती. 1 ऑगस्ट रोजी 14.2 किलोच्या गॅस सिलेंडर मध्ये पुन्हा 25 रुपयांनी वाढ करण्यात आली आणि किंमती थेट 859.50 रुपयांवर पोहोचल्या.
गेल्या वर्षी 1 सप्टेंबर रोजी घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात 25 रुपयांनी वाढ झाली होती.त्यानंतर कंपन्यांनी 25 रुपयांनी वाढ केली होती. 1 ऑक्टोबर रोजी 14.2 किलो गॅस सिलेंडरच्या किमतीत कोणतीही वाढ झालेली नाही. त्यामुळे भाव 884.50 रुपयांवर स्थिर आहेत.
‘या’ ड्रग्ज पेडलर चं फडणवीस,भाजप सोबत काय कनेक्शन आहे?
राम मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या दलित कुटुंबावर प्राणघातक हल्ला
समीर वानखेडे ला बॉलिवूडवर हल्ला करायला आवडतं – अनुराग कश्यप
किरण गोसावी चा अटक होण्यापूर्वी आला नवा व्हिडिओ
पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त; जामिनावर नवाब मलिकांची प्रतिक्रिया
आर्यन खान प्रकरण; वानखेडेंवर आरोप;पंच चा धक्कादायक गौप्यस्फोट!
फॅक्ट चेक : शाहरुख खानचे वडील स्वातंत्र्यसैनिक नव्हते का?
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published by Team Jaaglya Bharat on NOV 01, 2021 19:40 PM
WebTitle – LPG Gas cylinders cost Rs 265, inflation bomb explodes before Diwali