मुंबई : बॉलिवूड किंग शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान २८ दिवसांनी शनिवारी आर्थर रोड कारागृहाबाहेर आला.महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून ड्रग्स प्रकरणावरुन बराच गदारोळ सुरु असल्याचे दिसते. राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत.राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांनीही यात उडी घेऊन दररोज नवनवे खुलासे केलेले आहेत. सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणापासून महाराष्ट्रात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) एंट्री केल्यापासून वेगवेगळी ड्रग्स प्रकरणं समोर येत आहेत. मात्र, असं असताना आता निशांत वर्मा या राजकीय विश्लेषकाने अमृता फडणवीस आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचे काही फोटो शेअर करुन भाजपवर गंभीर आरोप केले आहेत.ड्रग्ज पेडलर चं फडणवीस,भाजप सोबत काय कनेक्शन आहे? असा सवाल करत या प्रकरणी चौकशी करावी अशी मागणी केली आहे.
ड्रग्ज पेडलर चं फडणवीस,भाजप सोबत काय कनेक्शन आहे?
निशांत वर्मा यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरुन दोन फोटो शेअर करुन भाजपचं ड्रग्स नेक्सस असं म्हटलं आहे. एक फोटो अमृता फडणवीस यांचा असून यामध्ये ‘जयदीप चंदूलाल राणा’ असल्याचा दावा निशांत वर्मा यांनी केली आहे. त्यांच्या मते, जयदीप राणा हा एक ड्रग्स पेडलर असून त्याला जून 2021 मध्येच अटक करण्यात आली होती.
दुसऱ्या फोटोत ‘जयदीप चंदूलाल राणा’ विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत दिसत आहे.हा फोटो गणेशोत्सव दरम्यान घेतला असण्याची शक्यता आहे.मागे गणेश मूर्ती दिसत आहे.
निशांत वर्मा यांचा नेमका काय आरोप?
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचा फोटो शेअर केला असून त्यांच्यासोबत जयदीप चंदूलाल राणा असल्याचा आरोप करण्यात आला आहे.निशांत वर्मा यांच्या मते, ‘जयदीप राणा हा एक ड्रग्स पेडलर असून त्याला जून किंवा मे 2021 मध्ये एनसीबीने अटक केली आहे. जो अद्यापही तुरुंगातच आहे. अशावेळी भाजपचं त्याच्या नेमकं कनेक्शन काय?’ असा सवाल विचारत निशांत वर्मा यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत.
फोटोत असणारी महिला तीचे अशा पद्धतीने मैत्रीपूर्ण संबंध एखाद्या ड्रग्ज पेडलर सोबत कसे असू शकतात? त्यामुळे मी अपेक्षा करतो की श्री उद्धव ठाकरे ,महाराष्ट्र सरकार डिजीपी महाराष्ट्र आणि एनसीबी या सर्वांनीच या प्रकरणाची खोलवर चौकशी केली पाहिजे.
या खळबळजनक आरोपा नंतर राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनीही जयदीप राणाचा फोटो ट्विट करत “ये कौन है भाई?” असा सवाल उपस्थित केला आहे.या नव्या प्रकणामुळे ड्रग्जची पाळेमुळे राजकीय क्षेत्रात सुद्धा रूजली आहेत का? अशी शंका यायला लागली असून राजकीय वातावरण तापायला लागले आहे.
राम मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या दलित कुटुंबावर प्राणघातक हल्ला
समीर वानखेडे ला बॉलिवूडवर हल्ला करायला आवडतं – अनुराग कश्यप
किरण गोसावी चा अटक होण्यापूर्वी आला नवा व्हिडिओ
पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त; जामिनावर नवाब मलिकांची प्रतिक्रिया
आर्यन खान प्रकरण; वानखेडेंवर आरोप;पंच चा धक्कादायक गौप्यस्फोट!
फॅक्ट चेक : शाहरुख खानचे वडील स्वातंत्र्यसैनिक नव्हते का?
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published by Team Jaaglya Bharat on NOV 01, 2021 09:25 AM
WebTitle – What is the connection of ‘this’ drug peddler with Fadnavis, BJP?