प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांच्या मालकीच्या कंपनीचे शेअर्स बाजरात चांगलेच भुईसपाट झालेले असताना आणि लाखों करोडो रुपयांचं नुकसान झालेलं असताना अदानी यांनी नुकतेच शिरकाव करत शेअर्स घेत अधिग्रहीत केलेली NDTV सुद्धा अडचणीत आल्याचे चित्र समोर आले आहे. ntdv मधून ज्येष्ठ पत्रकार श्रीनिवासन जैन यांच्या राजीनाम्यानंतर आता एनडीटीव्हीवरून वृत्त आहे की, ज्येष्ठ टीव्ही पत्रकार निधी राजदान यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्या ndtv येथे कार्यकारी संपादक म्हणून कार्यरत होत्या.
निधी राजदान यांनी स्वतः ट्विट करून याची माहिती दिलीय. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलंय की, 22 वर्षांनंतर एनडीटीव्हीतून पुढे जाण्याची वेळ आली आहे. ही एक आश्चर्यकारक, रोलर कोस्टर राइड आहे, परंतु तुम्हाला कधी उतरायचं हे माहित असणं आवश्यक आहे. पुढील काही आठवडे माझे शेवटचे आहेत. या सर्व वर्षांच्या प्रेम आणि समर्थनाबद्दल धन्यवाद.
निधी राझदान यांच्या राजीनाम्याची बातमी या पार्श्वभूमीवर आलीय जेव्हा अदानी समूहाने NDTV अधिग्रहण केल्यापासून NDTV मधून वरिष्ठ पातळीवरून अनेक मोठे पत्रकार बाहेर पडले यामध्ये नोव्हेंबरमध्ये रवीश कुमार यांनी NDTV इंडियाच्या वरिष्ठ कार्यकारी संपादकपदाचाही राजीनामा दिला होता.शिवाय अदानी समूहाच्या कंपनिंचे शेअर्स सुद्धा मोठ्याप्रमाणावर आपटी खात आहेत.
निधी राझदान ईमेलद्वारे सायबर फिशिंग अटॅक ची शिकार झाल्यानंतर फेब्रुवारी २०२२ मध्ये NDTV वर परत आली होती. (ऑनलाइन फसवणूक, जिथे सर्व माहिती ईमेलद्वारे फसवणूक करून घेतली जाते). निधी राझदान यांनी 1999 मध्ये एनडीटीव्हीमध्ये प्रवेश केला होता. NDTV 24X7 च्या न्यूज डिबेट शो ‘लेफ्ट, राइट अँड सेंटर’ आणि साप्ताहिक डिबेट शो ‘द बिग फाईट’ची प्राथमिक अँकर होत्या.
जम्मू-काश्मीर आणि ईशान्य भारतातील पत्रकारितेतील उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना रामनाथ गोएंका पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. याशिवाय कठुआ बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा खुलासा केल्याबद्दल पत्रकारितेतील अतुलनीय योगदानाबद्दल इंटरनॅशनल प्रेस इन्स्टिट्यूटनेही त्यांचा गौरव केला होता.
औरंगाबाद चं नामांतर संभाजी नगर करणं बेकायदेशीर?
आसाराम बापू ला अखेर शिक्षा ;चायवाला ते बाबा जाणून घ्या संपूर्ण प्रवास
गांधी यांचा खून पाकिस्तानला ५५ कोटी दिले म्हणून झाला होता का?
अमेरिकेतील सिएटल सिटी येथे जातिभेदावर बंदी करणारा कायदा
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा

First Published by Team Jaaglya Bharat on FEB 03,2023 13:55 PM
WebTitle – journalists leave Adani’s NDTV