बहुचर्चित झुंड मुव्ही प्रदर्शित झाल्यानंतर.सगळ्याच स्तरावर प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतला आहे.सोशल मीडियावर सुद्धा झुंड (Jhund movie) या मुव्ही ची जोरदार चर्चा आहे. या चित्रपटात बॉलिवूडचा महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची प्रमुख भूमिका आहे. नागराज मंजुळे यांनी (Nagraj Manjule) या चित्रपटाचे दिग्दर्शन केलं आहे. चित्रपटाला शुभेच्छा देण्यासाठी अनेक बॉलिवूड कलाकारांनी खास पोस्ट शेअर केल्या आहेत.अभिनेता सुबोध भावे यांनी (Subodh Bhave) एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. त्यांनी या पोस्टमधून नागराज मंजुळें यांचं कौतुक केलंय.त्यानंतर आता बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) यांनीही या मुव्हीचं कौतुक केलं आहे.
झुंड मुव्ही संदर्भात काय म्हणाले रितेश देशमुख ?
रितेश देशमुख आपल्या ट्विटमध्ये म्हणाले “कृपया झुंड मुव्ही मोठ्या पडद्यावरच पहा.नागराज मंजुळे हे देशातील सर्वोत्तम दिग्दर्शक आहेत.तो तुम्हाला रडायला लावतो, आनंद देतो, वेदना उत्साह यांचा अनुभवतो देतो आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तो तुम्हाला भिंतीने विभागलेल्या दोन भारतांचा विचार करायला लावतो.”
अमिताभ यांचा उल्लेख करत रितेश देशमुख म्हणाले,”बच्चन सर, तुम्ही चित्रपटात खूप छान काम केलं आहे.या भूमिकेत तुम्हाला पाहून खूप आनंद झाला.तुमचे (भूमिकेत) मौन राहणे सुद्धा मोठा आवाज करणारे असते.यातील प्रत्येक अभिनेत्याची सुयोग्य निवड झालीय त्याबद्दल कास्टिंग टीमचे आभार!अजय अतुल यांचे संगीत सुद्धा सर्वोत्कृष्ट आहे.”
झुंड चित्रपट कलाकार
झुंड चित्रपटात अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan as Vijay Barse) , आकाश ठोसर (Akash Thosar as Sambhya), रिंकू राजगुरू (Rinku Rajguru), विकी कदीयन (Vicky Kadian as Abhijeet Barse, Vijay’s son) आणि गणेश देशमुख (Ganesh Deshmukh) यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
इतर वाचनीय लेख/अपडेट्स
झुंड चित्रपट:सुबोध भावे ची पोस्ट ,”नागराज तू आमच्या पिढीचा…”
B झुंड सिनेमा : तीनचार परिप्रेक्ष्यांतून पाहायचा चित्रपट
C झुंड सिनेमा : सुपरस्टार धनुष म्हणाला “निःशब्द झालोय”
Jhund film।झुंड चित्रपट,आंबेडकरांचे पोस्टर व्हायरल,पाहा रिलीज डेट
जयभीम चित्रपट थांबायचे नाव घेईना ,चीन मध्ये ठरतोय लोकप्रिय
Pushpa movie box office collection|पुष्पा फिल्म बॉक्स ऑफिस
बाबासाहेब आंबेडकर जेव्हा शिवजयंती च्या मिरवणुकीत सामील होतात
आंबेडकर आणि पेरियार यांचं भगत सिंग यांच्या बलिदानावर मत..
व्हॅलेंटाईन डे – मर्दानी लढवय्यी वीर सूपुत्री भीमाच्या लेकीला समर्पित
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published by Team Jaaglya Bharat on MAR 06, 2022 13: 52 PM
WebTitle – Jhund Movie : Riteish Deshmukh’s post goes viral; Thoughts of two India