जौनपूर हत्या प्रकरण: Jaunpur Murder उत्तर प्रदेशातील जौनपूर येथून बुधवारी एक अत्यंत हृदयद्रावक प्रकरण समोर आले असून, त्यानंतर स्थानिक प्रशासनात खळबळ उडाली आहे. दिवाळीच्या एक दिवस आधी म्हणजे 30 ऑक्टोबर रोजी दोन पक्षांमधील चार दशकांचा जुना जमिनीचा वाद एका निष्पाप मुलाच्या निर्घृण हत्येचे कारण ठरला.उत्तर प्रदेशच्या जौनपूर येथे ४० वर्षांपासून चालत आलेल्या जमिनीच्या वादात १७ वर्षीय मुलाची निर्घृण हत्या करण्यात आली. बुधवारी एका गटातील लोकांनी दुसऱ्या गटातील १७ वर्षीय मुलाचे तलवारीने शिर कापले. या घटनेनंतर त्या मुलाची आई तासनतास त्याच्या कटलेल्या शिराला मांडीवर घेऊन धाय मोकलून रडत बसली. तिच्या विलापाने स्थानिक गावकऱ्यांचे ह्रदयही पिळवटून निघाले.
दशकांपासूनचा जमिनीचा वाद
पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना गौराबादशाहपूर पोलीस ठाण्याच्या कबीरुद्दीन गावातील असून दोन गटांमध्ये दशकांपासून जमिनीवरून वाद सुरू आहे.या वादातून बुधवारी दोन्ही बाजूंमध्ये वाद वाढल्याने परिस्थिती हिंसक बनली.
झटापटीदरम्यान, रामजीत यादव यांचा १७ वर्षीय मुलगा अनुरागला काही लोकांनी पकडण्याचा प्रयत्न केला, त्यातील एकाच्या हातात तलवार होती.
त्याने अनुरागवर हल्ला केला आणि त्याचे शिर धडापासून वेगळे केले. सध्या पोलिसांनी या प्रकरणात दोन लोकांना ताब्यात घेतले आहे,
तर हत्येचा मुख्य आरोपी तलवार चालवणारा घटनास्थळावरून पळून गेला आहे.
घटनास्थळी पोलीस पथक दाखल
पोलिसांनी सांगितले की आरोपीचा शोध सुरू आहे. गावात कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये म्हणून पोलिसांच्या अनेक तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.
गावातील लोकांनी सांगितले की त्या मुलाची आई तासनतास कापलेले शिर मांडीवर ठेवून रडत होती.
पोलिस अधीक्षक अजय पाल शर्मा यांनी सांगितले, “जमिनीचा वाद मागील ४०-४५ वर्षांपासून सुरू आहे. एका गटातील रमेश यादव और लालता प्रसाद यादव या दोघांनी दुसऱ्या गटावर हल्ला केला आणि एका मुलाची हत्या केली. मी आणि जिल्हाधिकारी घटनास्थळी उपस्थित आहोत. काही आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची चौकशी सुरू आहे. पुढील तपास चालू आहे.”
जिल्हाधिकाऱ्यांचे वक्तव्य
जौनपूरचे जिल्हाधिकारी दिनेश चंद्र यांनी सांगितले की, या प्रकरणातील गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा दिली जाईल. यावर बोलताना ते म्हणाले की, “हा दोन्ही बाजूंचा जुना जमिनीचा वाद असून आणि तो दिवाणी न्यायालयात प्रलंबित आहे. मी तीन दिवसांत वादावर अहवाल मागितला आहे.”
Support Jaaglyabharat.com
At Jaaglyabharat.com, we’re committed to bringing you accurate, insightful news that you can trust. By making a small contribution, you help us continue delivering high-quality content, expanding our reach, and staying independent. Every bit of support keeps the news accessible and empowers us to do more.
Thank you for standing with us!
आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on OCT 31,2024 | 22:26 PM
WebTitle – jaunpur-murder-land-dispute-mother-holds-sons-head