मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड.प्रकाश आंबेडकर यांच्या संदर्भात अतिशय निंदनीय शब्दांची भाषा वापरणाऱ्या जगदीश गायकवाड ला चेंबूर येथे मारहाण झाल्याची माहिती समोर आली आहे.
यासंदर्भात वंचित बहुजन आघाडीचे मुंबई उपाध्यक्ष संदीप पानपाटील यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं की, 23 तारखेला शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीची युती जाहीर झाली,सगळीकडे आनंदाचे वातावरण असताना,त्यांनंतर रात्री साडेबारा वाजता, 24 तारखेला, जगदीश गायकवाड चेंबूर येथील लाल डोंगर परिसरातील तारा पंजाब बार मध्ये दारू पित बसल्याचे काही कार्यकर्त्यांना समजले.हा लोकांना सांगतो मी दारू पित नाही परंतु त्याला आम्ही तारा पंजाब बारमध्ये दारू पिताना रंगेहात पकडले आहे.बाळासाहेबांच्या बद्दल जो कुणी अपशब्द वापरेल.त्याची गैर केली जाणार नाही.त्याला धडा शिकवला जाईल.
जगदीश गायकवाड ने कार्यकर्त्यावर दारू पिऊन हल्ला करत मारहाण केली
आदरणीय बाळासाहेबांची आम्हाला शिकवण आहे की कुणाला अपशब्द बोलू नका,आम्ही संविधानाप्रमाणे चालतो आहोत,परंतु आमच्यावर तुम्ही बोट उचलणार असाल. तर आम्ही त्याला धडा शिकवू,त्याने (जगदीश गायकवाड) ने कितीही माफी मागितली तरी आम्ही त्याला माफ करणार नाही.त्याने आमच्या पवईच्या रणशुर नामक कार्यकर्त्यावर दारू पिऊन हल्ला करत मारहाण केली.
इतकेच नाहीतर बंदुकीचा धाक दाखवून त्याला धमकावले आणि मी बाळासाहेबांना अपशब्द वापरणार असे म्हणत शिवीगाळ केली.
असे प्रकार कोणताही कार्यकर्ता कदापि सहन करणार नाही.याचा जवाब त्याला मिळणारच.
आम्ही पोलिसांना फोन करून कळवले,पोलिसांनी त्याला अटक केली आहे,
आम्ही बघत आहोत पोलिस त्याच्यावर काय कारवाई करत आहेत,
जर त्याच्यावर कारवाई झाली नाही आणि सामान्य कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल केले तर आम्ही उग्र आंदोलन छेडणार आहोत.
दरम्यान,जगदीश गायकवाड ला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून पोलिस आता त्याची चौकशी करत आहेत.
या प्रकरणी आता पुढे काय घडामोडी होणार, हे पाहणं महत्वाचं आहे.
मागासवर्गीय युवा व्यावसायिकांना मरणाच्या दारात उभा करणारं महाराष्ट्र शासन आणि सामाजिक न्याय विभाग!
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा

First Published by Team Jaaglya Bharat on JAN 24,2023 14:08 PM
WebTitle – Jagdish Gaikwad beaten up in Mumbai