संविधानाचा मसुदा तयार करण्याचे उत्तरदायित्व एकट्या डॉ. आंबेडकरांवर आले.असा उल्लेख संविधान सभेतच करण्यात आलेला आहे.राज्यघटनेच्या आत्म्याचे घटक पूर्णपणे भारतीयकृत आहेत.26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेने राज्यघटनेतील काही तरतुदी तत्काळ लागू केल्या. भारतीय राज्यघटनेची मूळ प्रत हिंदी आणि इंग्रजी दोन्ही भाषेत हस्तलिखित आहे. यामध्ये कोणतेही टायपिंग किंवा प्रिंट वापरलेले नाही.भारतीय राज्यघटना ही जगातील सर्वात मोठी लिखित राज्यघटना आहे तसेच तिचा आत्मा भारतीय संस्कृती, सभ्यता आणि लोकांच्या मनाला अनुसरून आहे. 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेने राज्यघटना स्वीकारली,स्वातंत्र्य मिळताच देश चालवण्यासाठी संविधान बनवण्याचे काम सुरू झाले.अलिकडे प्रेमबिहारी नारायण रायजादा हे नाव समोर येऊ लागलं आहे त्याविषयी आपण या लेखात जाणून घेणार आहोत.
संविधान सभेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद होते, 29 ऑगस्ट 1947 रोजी भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीसाठी एक मसुदा समिती स्थापन करण्यात आली होती. त्याचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते. जगाच्या संविधानांचा अभ्यास करून मसुदा समितीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय राज्यघटनेचा मसुदा तयार केला. संपूर्ण संविधान निर्मिती प्रक्रियेमध्ये तब्बल 2 वर्ष 11 महिने 18 दिवस लागले.ते 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय संविधान सभेसमोर ठेवण्यात आले होते. त्याच दिवशी संविधान सभेने ते स्वीकारले. या कारणास्तव 2015 पासून दरवर्षी 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो.
ON RECORD: डॉ.आंबेडकरांच्या संविधान निर्मिती योगदानाबद्दल
चित्रकार आचार्य नंदलाल बोस यांनी भारतीय संस्कृतीची चित्रे रेखटली
प्रसिद्ध चित्रकार आचार्य नंदलाल बोस यांनी भारतीय राज्यघटनेचे प्रत्येक पान चित्रांनी सजवले होते. मूळ संविधानात नंदलाल बोस यांनी रेखाटलेली २२ चित्रे आहेत. घटनात्मक तरतुदी आणि चित्राच्या निरीक्षणाच्या आधारे आपण असे म्हणू शकतो की आपल्या राज्यघटनेचा ढाचा भारतीय आहे. प्रस्तावना पान सजवण्याचे काम राममनोहर सिन्हा यांनी केले. ते नंदलाल बोस यांचे शिष्य होते. या चित्रांची सुरुवात सम्राट अशोकापासून होते ज्यात मुंडकोपनिषद सत्यमेव जयते हे वाक्य लिहिलेले आहे. जर आपण या चित्रांचे विश्लेषण केले तर आपल्याला खूप मनोरंजक माहिती मिळते.
भारतीय परंपरेतील महत्त्वाचे घटक गौतम बुद्ध यांनाही संविधानाच्या मूळ प्रतमध्ये महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे.
भाग पाचमध्ये बुद्धांना स्थान दिले आहे. या भागाच्या सुरुवातीला बुद्धांकडून ज्ञान घेणारे माणसे, प्राणी व पक्षी कोरले आहेत.
प्राचीन नालंदा विद्यापीठात उपस्थित विद्यार्थी. छत्रपति शिवाजी महाराज , गुरु गोविंद सिंग, झाशीची राणी लक्ष्मीबाई,
मिठाच्या कायद्याच्या विरोधात दांडीकडे निघालेले गांधी, ध्वजाला वंदन करताना नेताजी सुभाषचंद्र बोस आझाद हिंद फौज,
जगातील सर्वात मोठी हिमालयाची उंच शिखरे, थारचे वाळवंट ओलांडणारे सजवलेले उंट
आणि उंच समुद्रात शौर्य गाजवणारे भारतीय महासागर हे नयनरम्य चित्र आहेत.
पानाच्या एका भागावर भरत राजाचे सिंहासह एक मनमोहक चित्र आहे ज्याच्या नावावरून आपल्या देशाचे नाव भारत ठेवले गेले आहे.
राज्यघटनेच्या कलम 1 मधील कलम अ मध्ये त्याचा उल्लेख करण्यात आला आहे.
संविधानाच्या मुख्य पानावर सोनेरी रंगात अतिशय सुंदर चित्रण करण्यात आले आहे.
त्याचप्रमाणे शेवटच्या पानावरही स्वातंत्र्य चळवळीतील हुतात्म्यांना समर्पित सोनेरी रंगाचा फुलांचा हार आहे.
आपल्या संविधान सभेत भारतीय जनमत, संस्कृती आणि सभ्यतेच्या अनुषंगाने
संविधानातील प्रत्येक तरतुदीवर पुरेशा चर्चेनंतर 2 वर्ष, 11 महिने आणि 18 दिवसांत हे संविधान तयार करण्यात आले.
राज्यघटनेची आवड असणाऱ्यांसाठी आणखी एक रंजक वस्तुस्थिती आहे.
खरे तर धर्मनिरपेक्ष, समाजवादी आणि अखंडता हे शब्द मूळ संविधानाचा भाग नव्हते.
धर्मनिरपेक्ष, समाजवादी आणि अखंडता हे शब्द 1976 मध्ये आणीबाणीच्या काळात 42 व्या घटनादुरुस्तीद्वारे प्रस्तावनेमध्ये जोडले गेले
आणि कलम 51अ च्या स्वरूपात नवीन भाग 4-अ हा मूलभूत कर्तव्ये म्हणून संविधानात जोडला गेला आहे .
प्रेमबिहारी नारायण रायजादा कोण आहेत?
26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेने राज्यघटनेतील काही तरतुदी तत्काळ लागू केल्या. भारतीय राज्यघटनेची मूळ प्रत हिंदी आणि इंग्रजी दोन्ही भाषेत हस्तलिखित आहे. यामध्ये कोणतेही टायपिंग किंवा प्रिंट वापरलेले नाही. संविधान निर्मिती होऊन ते स्विकारले गेले त्यांनंतर प्रेमबिहारी नारायण रायजादा यांच्यावर संविधानाची मूळ प्रत हिंदी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये लिहिण्याचं काम देण्यात आलं. प्रेमबिहारी नारायण रायजादा यांचा कौटुंबिक व्यवसाय कॅलिग्राफीचा होता.त्यामुळे त्यांच्यावर ही जबाबदारी देण्यात आली.त्यांनी २२ भाग, ३९५ कलमे आणि ८ परिशिष्टे यांचे कॅलिग्राफीचे काम केले.251 पानांची राज्यघटना कॅलिग्राफी पद्धतीने लिहिण्यासाठी त्यांना सहा महिने लागले.
भारताचे संविधान, (राज्यघटना) प्रेमबिहारी नारायण रायजादा यांनी लिहिली?
नाही,अलिकडे अशाप्रकारे वस्तुस्थितीचा विपर्यास करणारी नविन खोडसाळ माहिती काही विशिष्ट लोक समोर आणत आहेत, भारताचे संविधान,अर्थात राज्यघटना ही प्रेमबिहारी नारायण रायजादा यांनी हातानी लिहिली,असं चुकीचं जोरात सांगितलं जात आहे.”हातानी लिहिलं”, “हाथो से लिखा” असा उल्लेख टिनपाट जातीयवादी लोक आवर्जून करत असतात.अलिकडे गुगल मध्ये अशा काही पोस्ट,आणि वर्तमान पत्रांमध्ये तसेच उल्लेख केले जात आहेत.जेणेकरून ही माहिती इलेक्ट्रॉनिक मिडियात,इंटरनेटवर उपलब्ध होत राहील साठत राहील आणि हे असं सतत करत राहिल्याने आणखी पन्नास वर्षांनी लोकांना तेच खरं वाटू लागेल,असे अजेंडे मनुवादी पुराणकाळापासून राबवत आले आहेत.
जागल्याभारत ची निर्मिती अशाच गोष्टींची पोलखोल करण्यासाठी झालीय.आणि सत्य समोर आणण्यासाठी व त्याचे डॉक्युमेंटेशन करण्यासाठी झाली आहे.त्यामुळे आम्ही आमच्या वाचकांसाठी ही महत्वाची माहिती समोर आणली आहे.वाचकांसाठी आम्ही संविधानातील मुळ प्रत जी भारत सरकार कलकत्ता च्या वेबसाइटवर आहे ती उपलब्ध करून देत आहोत,सोबतच प्रेम बिहारी नारायण रायजादा यांच्या संविधान हाताने लिहिण्याच्या कामासाठी काय उल्लेख करण्यात आला आहे ते स्पष्टच होते.यात असा स्पष्ट उल्लेख आहे की प्रेमबिहारी नारायण रायजादा यांनी कॅलिग्राफी केली आहे. ना की संविधान निर्मिती.
भारताचे संविधान मुळ प्रत पीडीएफ कॉपी मराठीत मिळविण्यासाठी इथे क्लिक करा.
हे आणखी सोप्या पद्धतीने समजून घेण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे उदाहरण घेता येईल,उद्या कुणी छत्रपतींचा इतिहास लिहिला आणि त्यानंतर असा इतिहास लिहिणाऱ्या व्यक्तीलाच त्याने इतिहास घडवला असं श्रेय देण्यासारखं होईल. तसे राजांच्या इतिहासाला गालबोट लावत त्यांचे श्रेय लाटण्याचे त्यांचे गुरु अमुक तमुक करण्याचे अनेक उद्योग याचप्रकारची मंडळी गेली अनेक वर्षे करत आहेत.परंतु आताची पिढी सुशिक्षित असल्याने असे अजेंडे आजकाल चालले जात नाहीत फेल होतात.
आपल्याशी संबंधित इतिहास,माहिती आणि तिचे जतन करण्याचे काम प्रत्येकाने केले पाहिजे.
नाहीतर काही लोक त्याला चुकीच्या पद्धतीने लोकांमध्ये पसरवून आपले अजेंडे राबवतात.
माहिती आवडल्यास तुमच्या ग्रुपमध्ये नक्की शेअर करा.
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on NOV 27,2022, 11:48 AM
WebTitle – Indian Constitution: Who is Prembihari Narayan Raizada?