भारतीय खेळाडूंची पहिली ८८ सदस्यांची तुकडी रविवारी, १८ जुलै रोजी टोकियो ऑलिम्पिक 2021 मध्ये भाग घेण्यासाठी जपानच्या राजधानीत दाखल झाली. त्यांच्या आगमनानंतर एक दिवसानंतर, भारतीय एथलिट नी ऑलिम्पिक मध्ये पदक जिंकण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे.आर्चर दीपिका कुमारी, अतानू दास, टेबल टेनिसपटू सथियान ज्ञानसेकरन, शरथ कमल,बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू साई प्रणीत, जिम्नॅस्ट प्रणती नायक यांनी सोमवारी जोरदार तयारी सुरू केलीय.
तीरंदाज दीपिका कुमारी आणि अतनु दास यांनी आज सकाळी युमेनोशिमा पार्क येथे आपले कौशल्य दाखविले. त्याचवेळी सॅथियान आणि शरथ कमल यांनी ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्याच्या उद्देशाने जोरदार तयारी सुरू केली आहे दुसरीकडे, जिम्नॅस्ट प्रणती नायक यांनी प्रशिक्षक लक्ष्मण मनोहर शर्मा यांच्या नेतृत्वात सराव केला.
Destination Tokyo🗼
Take a look at Gymnast Pranati Nayak at the training arena in #Tokyo2020 Games village.
Don't forget to support Team India with #Cheer4India pic.twitter.com/hmCrVa1yGo
— SAI Media (@Media_SAI) July 19, 2021
यावेळी बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू आणि प्रणीथ यांनी प्रशिक्षक पार्क ताइ सँग यांच्या देखरेखीखाली सराव केला. प्रशिक्षक मॅथियस बॉय यांच्यासह प्रशिक्षण सत्रात डबल्स मध्ये भाग घेणारी जोडी चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज रंकीरेड्डी यांनी सरावात भाग घेतला. तत्पूर्वी, सेलिंग टीमचे सदस्य व्ही. सरवनन हे टोकियो मध्ये दाखल झाले होते.आणि त्यांनी प्रशिक्षण सुरू केले. सरवनन व्यतिरिक्त नेथरा कुमानन, केसी गणपती आणि वरुण ठक्कर गेल्या आठवड्यात यापूर्वीच टोकियो येथे दाखल झाले होते. हे सर्व सहभागी एथलिट टोकियो ऑलिम्पिकमधील सेंलिंग स्पर्धेत भारताला पदक मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहेत.
त्यांच्याशिवाय रोइंग टीमचे सदस्य अर्जुनलाल जाट आणि अरविंद सिंग पुरुषांच्या लाइटवेट दुहेरीत स्पर्धेत आपली कामगिरी दाखवतील.
शनिवारी हे भारतीय खेळाडू टोकियो येथे पोहोचले.या सर्वांनी रविवारी प्रशिक्षक इस्मलाईल बेग यांच्या देखरेखीखाली सराव केला.
सोमवारी भारतीय नेमबाजांची एक 15 सदस्यीय ताफा सराव करणार आहे.
टोकियो ऑलिम्पिक 2021 चे थेट प्रक्षेपण डीडी स्पोर्ट्स वरून दररोज करण्यात येणार आहे.
तर दूरदर्शन आणि ऑल इंडिया रेडिओ (AIR) च्या अन्य वाहिन्या मेगा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेवर विशेष कार्यक्रम प्रसारित करतील.
मागीलवर्षी म्हणजे 2020 मध्ये ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक स्पर्धा कोव्हिड-19 च्या साथीमुळं रद्द कराव्या लागल्या होत्या.
ऑलिम्पिक स्पर्धांच्या 124 वर्षांच्या इतिहासात प्रथमच या स्पर्धांना विलंब झाला आहे.
8 ऑगस्ट रोजी ऑलिम्पिक स्पर्धा संपणार आहेत, तर पॅरालिम्पिक स्पर्धांची तारीख 24 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर असेल.
ऑलिम्पिक आयोजित केलेल्या टोकियो शहरात सध्या कोरोना संसर्गाची प्रकरणं झपाट्यानं वाढत असल्याचं चित्र समोर आलं आहे.
जर आकडेवारी वाढली तर त्यावर चर्चा करून निर्णय घेतला जाईल असं
या स्पर्धांचे आयोजक प्रमुख तोशिरो मुटो यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
महेंद्रसिंग धोनी : भारतीय क्रिकेट ची परिभाषा बदलवणारा कर्णधार
हरलीन देओल ची कॅच कायदेशीर का ठरली नसती ; पण आता आहे
फॅक्टचेक: धोनी बौद्ध भिक्खू बनला? कारण जाणून घ्या..
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published by Team Jaaglya Bharat on JULY 21, 2021 20: 50 PM
WebTitle – Indian Athletes Reached Tokyo for Olympics 2021-07-21