नवी दिल्ली : जात ग्रस्त आजारी माथेफिरू समाजापासून रक्षण करण्यासाठी आडनाव बदल करू शकता.दिल्ली हायकोर्टाने जातीचा उल्लेख असणारं नाव किंवा आडनाव संदर्भात अतिशय महत्त्वाची टिप्पणी केली आहे. सन्मानाने जगण्याच्या अधिकारात ‘जातीच्या ओळखीने बांधील नसणे’ देखील समाविष्ट असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. यासह अनुसूचित जातीतील दोन भावांच्या विनंतीची अंमलबजावणी करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने सीबीएसईला CBSE caste surname change दिले आहेत.

जातीचा उल्लेख,ओळख पुसून टाकण्यासाठी जातीवाचक नाव,आडनाव बदलू शकता
प्रकरण नवी दिल्लीतील असून दोन विद्यार्थ्यांना जे की नात्याने भाऊ आहेत.त्यांच्या 10वी आणि 12वीच्या प्रमाणपत्रांमध्ये वडिलांचे आडनाव अपडेट करायचे आहे. दोन्ही भावांनी ‘सामाजिक कलंकामुळे’ वडिलांचे आडनाव बदलण्याची विनंती केली होती. न्यायमूर्ती मिनी पुष्कर्णा म्हणाले की, सीबीएसईने प्रमाणपत्रात आवश्यक ते बदल करण्यास नकार देणे पूर्णपणे चुकीचे आहे. जर एखाद्या व्यक्तीला पूर्वग्रह टाळण्यासाठी विशिष्ट जातीची ओळख द्यायची नसेल, तर त्याला तसे करण्याचा पूर्ण अधिकार आहे.थोडक्यात तुम्ही जातीचा उल्लेख,ओळख पुसून टाकण्यासाठी जातीवाचक नाव,आडनाव बदलू शकता.
न्यायालयाने म्हटले की याचिकाकर्त्यांना अशा ओळखीसह जगण्याचा पूर्ण अधिकार आहे, ज्यामुळे त्यांना समाजात सन्मान मिळेल. न्यायालयाने म्हटले की ओळखीचा अधिकार हा भारतीय राज्यघटनेच्या कलम 21 अंतर्गत जगण्याच्या अधिकाराचा एक अंगभूत भाग आहे. याचिकेला उत्तर देताना सीबीएसईने म्हटले होते की, आडनाव बदलल्याने याचिकाकर्त्यांची जात बदलली जाईल, त्याचा गैरवापर होऊ शकतो.
आडनाव बदलेल, जात नाही
वडिलांच्या आडनावात बदल केल्याने याचिकाकर्त्यांच्या जातीत कोणताही बदल होणार नाही, असे न्यायालयाने स्पष्टपणे नमूद केले.
याचिकाकर्त्या भावांनी न्यायालयाला सांगितले की, त्यांच्या वडिलांनी दिवसेंदिवस होणाऱ्या जातीय अत्याचारामुळे आपले आडनाव बदलण्याचा निर्णय घेतला.
न्यायालयाने असे निरीक्षण नोंदवले की याचिकाकर्त्या बंधूंना समाजात प्रतिष्ठा आणि सन्मानजनक ओळख मिळवण्याचा पूर्ण अधिकार आहे.
आणि जर त्यांना त्यांच्या आडनावामुळे काही नुकसान होत असेल, तर त्यांना त्यांची ओळख अशा प्रकारे बदलण्याचा पूर्ण अधिकार आहे.
ज्यामुळे याचिकाकर्त्यांना सामाजिक संरचनेत त्यांना आदर मिळेल.
सीबीएसई आडनाव दुरुस्त करण्यासाठी आवश्यक ती कागदपत्रे मागण्यास स्वतंत्र आहे, असेही न्यायालयाने म्हटले आहे.
हॉटेल मध्ये जेवायला गेलेल्या दलित रिक्षा चालकाची हत्या
दलित व्यक्तीने ने मंदिर प्रवेश केल्याने मंदिराला ठोकले टाळे
क्रिकेट बॉल ला स्पर्श केला म्हणून दलित व्यक्तीचा अंगठा कापला, दोघांना अटक
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा..
First Published by Team Jaaglya Bharat on 13, JUN 2023, 10:38 AM
WebTitle – If you don’t want to reveal the caste, you can change the surname