नवी दिल्ली, 20 मे : 2019 मध्ये हैदराबादमधील दिशा बलात्कार प्रकरणाने संपूर्ण देश हादरला होता. यानंतर देशभरात उग्र निदर्शने झाली. या घटनेनंतर काही दिवसांनी हैदराबाद पोलिसांनी चार आरोपींना चकमकीत एन्काऊंटर करून ठार केल्याचा दावा केला होता, मात्र त्यावेळी अनेक संघटनांनी त्यावर प्रश्न उपस्थित केले होते. ज्यावर सिरपूरकर आयोगाला चौकशीचे काम देण्यात आले होते. हा अहवाल आता सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आला असून, ही चकमक बनावट असल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.
या आयोगात सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश न्यायमूर्ती व्हीएस सिरपूरकर, मुंबई उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती रेखा बलदोटा आणि सीबीआयचे माजी संचालक कार्तिकेयन यांचा समावेश होता. त्यांनी आपल्या अहवालात म्हटले आहे की, तपासाअंती आम्हाला असे आढळून आले की पोलिसांनी तथाकथित आरोपींनी जाणूनबुजून गोळ्या झाडल्या आहेत जेणेकरून त्यांचा मृत्यू होईल. अशा स्थितीत ही चकमक बनावट असून त्यात सहभागी असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे.
दुसरीकडे, हैदराबाद एन्काऊंटर प्रकरणी तेलंगणा सरकारने मात्र ही चकमक योग्य असल्याचे म्हणत आपल्या पोलिस अधिकाऱ्यांचा बचाव करताना दिसले. सर्वोच्च न्यायालयात सुनावणीदरम्यान तेलंगणा सरकारचे वकील श्याम दिवान यांनी सरन्यायाधीशांच्या खंडपीठाला चौकशी अहवाल पाहण्याची आणि पपुन्हा ते सीलबंद करण्याची विनंती केली. तसेच ते सार्वजनिक करू नये अशी विनंती केली.त्यावर सरन्यायाधीश म्हणाले की, जर तपास अहवाल गोपनीय ठेवायचा असेल तर तपास करून काय उपयोग. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने तेलंगणा सरकार आणि उच्च न्यायालयाला आयोगाच्या अहवालाच्या आधारे आरोपी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले.
पीडितेचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळून आला होता
ही घटना नोव्हेंबर 2019 ची आहे. त्यादरम्यान एका पशुवैद्यकीय डॉक्टरवर सामूहिक बलात्कार झाला.
त्यानंतर आरोपींनी तिची हत्या करून मृतदेह शादनगर येथील पुलाखाली जाळला.या घटनेनंतर पोलिसांनी चार आरोपींना अटक केली.
त्यानंतर त्यांची चकमक झाली. हैदराबाद पोलिसांनी दावा केला की ते गुन्हेगारी दृश्य (सीन रिक्रीएट) पुन्हा तयार करण्यासाठी गेले होते,
तेव्हा आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्याला शूट करावे लागले.
या एन्काऊंटर मध्ये बळी गेलेल्यांची नावे ट्रक चालक मोहम्मद आरिफ, ट्रक चालक चिंताकुंता चेन्नाकेशावुलू, क्लीनर जोलु शिवा आणि जोलु नवीन
भाजपचा तेलंगणा सरकारवर हल्लाबोल
हैदराबादमधील ‘दिशा बलात्कार प्रकरणात’ भारतीय जनता पक्षाने तेलंगणा सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. भाजपने याला पोलिसांचा ‘निर्लज्ज गुन्हा’ म्हटले आहे आणि म्हटले आहे की आरोपींच्या बनावट चकमकीच्या सिरपूरकर अहवालाने तेलंगणातील केसीआर सरकारचा पर्दाफाश केला आहे. प्रकरण कितीही भयंकर असो,राज्य सरकारने राजकीय फायद्यासाठी पोलिसांच्या बेकायदेशीर पद्धतींचे समर्थन करू नये, असे भारतीय जनता पक्षाने म्हटले आहे. सरकारच्या संरक्षणात पोलिसांचा हा निर्लज्ज गुन्हा असल्याचा आरोप भाजपने केला.
जागेवर ठोका,खटला चालवू नका, एन्काऊंटर करा -लोकांची मागणी
हैदराबादच्या शादनगर शहरातील एका पोलिस ठाण्यासमोर लोकांनी निदर्शने केली होती आणि आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली होती. या पोलीस ठाण्यात या चार तथाकथित आरोपींना ठेवण्यात आले होते. हैदराबादपासून 50 किमी अंतरावर असलेल्या या शहरातील पोलीस ठाण्यासमोर महिला आणि विद्यार्थ्यांसह स्थानिक नागरिकांनी ‘आम्हाला न्याय हवा’ अशा घोषणा देत ठिय्या आंदोलन केले. चौकशी न करता आणि खटला न चालवता आरोपींना लवकरात लवकर फाशी द्यावी, अशी त्यांची मागणी होती.
अशीच मागणी सोशल मिडियातून शेकडो हजारो लोक करत होते.संताप राग हे सगळं मान्य असतं ती प्रतिक्रिया स्वाभाविक आहे.पण यामुळे हकनाक निर्दोष लोकांनी आपल्या जगण्याचा हक्क गमावला,याला जबाबदार केवळ पोलिस आहेत? सरकार आहे की समाज म्हणून आपणही आहोत ही गोष्ट गांभीर्याने विचार करण्याची आहे.याचसाठी आपल्याकडे एक व्यवस्था बनवली गेली आहे,संविधान त्यामुळे किती महत्वाचे आहे याचे महत्व पुन्हा एकदा पटून जाते,अन्यथा अशा वेळी लोकांच्या रेट्यात असे अनेक निष्पाप बळी जात राहतील,उद्या कदाचित त्यात तुमचाच भाऊबंद नातेवाईक असेल मित्र असेल,त्यामुळे भावनेवर नियंत्रण ठेवून लोकानी विवेकी वर्तन ठेवणे निरोगी सुरक्षित समाजासाठी गरजेचं आहे,नितांत गरजेचं आहे.
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
इतर वाचनीय लेख/अपडेट्स सुद्धा पहा
डॉ. बाबासाहेब आंबेडकर नाव द्यायला विरोध;मनुवादी जमावाची जाळपोळ
‘हे घर विक्रीसाठी आहे’ आंबेडकरी समाजाने घरांबाहेर लावले बॅनर
ज्ञानवापी प्रकरणी फेसबुक पोस्ट ; डॉ. रतन लाल यांना अटक
MP:दलित वराच्या वरातीवर दगडफेक,सरकारने पाडली बुलडोझरने घरे
विधवा प्रथा : समाज मनाचा दृष्टिकोन अन् मानसिकता बदलली पाहिजे..
ज्ञानवापी मशिद मुद्यावर विरोधी पक्ष गप्प का आहे?
भगवान बुद्ध आणि माझा खास संबंध – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
First Published by Team Jaaglya Bharat on MAY 28, 2022 11:55 AM
WebTitle – Hyderabad encounter case: encounter is fake , murder case against police says Court