अदानी ग्रुपवर अनेक गंभीर आरोप लावून खळबळ उडवून देणाऱ्या हिंडनबर्ग रिसर्च ने १५ महिन्यांनंतर नवीन रिपोर्ट जारी केली आहे. या रिपोर्टमध्ये हिंडनबर्गने मार्केट रेगुलेटर सेबीच्या चेअरपर्सनवरच अनेक गंभीर आरोप केले आहेत. रिपोर्टमध्ये धवल बुच, गौतम अदाणी, ब्लॅकस्टोन, Embassy REIT आणि IIFL यांची नाव आहेत. हिंडनबर्गने असा दावा केला आहे की सेबीच्या अध्यक्षांची अदानी शी संबंधित ऑफशोर एंटिटीमध्ये हिस्सेदारी होती. रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे की, “व्हिसलब्लोअर दस्तऐवजांमधून असे समजले आहे की सेबीच्या चेअरपर्सन माधवी पुरी बुच madhabi puri buch आणि त्यांच्या पतीची ‘Adani siphoning scandal’ मध्ये वापरल्या गेलेल्या ऑफशोर एंटिटीमध्ये हिस्सेदारी होती.”
हिंडनबर्ग रिसर्च रिपोर्ट
हिंडनबर्ग रिसर्च च्या रिपोर्ट नुसार, “वर्तमान सेबीच्या चेअरपर्सन माधवी पुरी बुच आणि त्यांचे पती धवल बुच यांनी अज्ञात ऑफशोर बर्म्युडा आणि मॉरिशस फंडमध्ये हिस्सेदारी ठेवली होती, जोच कॉम्प्लेक्स नेस्टेड स्ट्रक्चरमध्ये आढळला होता, ज्याचा वापर विनोद अदानी ने केला होता.”
पुरावे असूनही कारवाई न केल्याचा आरोप
हिंडनबर्गने दावा केला की ४० पेक्षा जास्त स्वतंत्र मीडिया रिपोर्टमध्ये अनेक पुरावे दिले आहेत, पण सेबीने अदानी ग्रुपविरोधात कोणतीही सार्वजनिक कारवाई केली नाही. रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे की, “त्यांना व्हिसलब्लोअर दस्तऐवज प्राप्त झाले आहेत, ज्यातून असे समजले आहे की सेबीच्या चेअरपर्सन आणि त्यांच्या पती धवल बुचने अदाणी मनी साइफनिंग घोटाळ्यात वापरलेल्या अज्ञात बर्म्युडा आणि मॉरिशस फंडमध्ये हिस्सेदारी ठेवली होती.”
गूपचूप आपल्या पतीला शेअर्स ट्रान्सफर
रिपोर्टनुसार, “एप्रिल २०१७ ते मार्च २०२२ दरम्यान बुचच्या अगोरा पार्टनर्स नावाच्या एक ऑफशोर सिंगापूर कन्सल्टिंग फर्ममध्ये १००% हिस्सेदारी होती. रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे की, १६ मार्च २०२२ रोजी, त्यांच्या चेअरपर्सनच्या नियुक्तीच्या दोन आठवड्यांनंतर, त्यांनी गूपचूप आपल्या पतीला शेअर्स ट्रान्सफर केले.”
रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे की, “या ऑफशोर सिंगापूर एंटिटीला फाइनान्शियल स्टेटमेंटचे खुलासे करण्याची मुभा आहे,
त्यामुळे तिच्या कन्सल्टिंग व्यवसायातून किती उत्पन्न मिळते आणि कुणाकडून मिळते हे स्पष्ट नाही.
चेअरपर्सनच्या बाह्य व्यवसायातील हिताची तपासणी करणाऱ्यांसाठी ही महत्त्वाची माहिती आहे.”
धवल बुच आणि ब्लॅकस्टोन
रिपोर्टने असेही दावा केले आहे की २०१९ मध्ये बुचच्या पतीला ब्लॅकस्टोनच्या सीनियर अॅडवायझर म्हणून नियुक्त करण्यात आले.
ब्लॅकस्टोन हे एक ग्लोबल प्रायव्हेट इक्विटी फर्म आहे ज्याचे REITs मध्ये मोठे गुंतवणूकदार आहे. रिपोर्टनुसार, “रिलिव्हंट अनुभव नसताना ब्लॅकस्टोनने बुचच्या पतीला सीनियर अॅडवायझर म्हणून नियुक्त केले. धवल बुचच्या कार्यकाळात, सेबीने प्रमुख REIT रेगुलेटरी बदलांना मंजूरी दिली आणि सुविधा प्रदान केली. या बदलांच्या मदतीने ब्लॅकस्टोनने Embassy REIT मध्ये आपली पूर्ण हिस्सेदारी $८५३ मिलियनमध्ये विकली.”
रिपोर्टमध्ये असेही म्हटले आहे की, “धवल बुचच्या सीनियर अॅडवायझरच्या कार्यकाळात, त्यांच्या पत्नी सेबीच्या अधिकारी असताना,
ब्लॅकस्टोनने ‘माइंडस्पेस आणि नेक्सस सेलेक्ट ट्रस्ट’ला स्पॉन्सर केले, हे भारताचे दुसरे आणि चौथे REIT Real estate investment trusts होते
ज्याला सार्वजनिक IPO साठी सेबीची मंजूरी मिळाली.”
आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on AUG 11,2024 | 13:45 AM
WebTitle – Hindenburg Research Reveals: SEBI Chairperson Madhavi Puri’s Stake in Offshore Entities Linked to Adani Money Siphoning Scandal