कवटेसार येथील भूमिहीन, शेतमजूर, बेघर लोकांचे महापुराने संसार अक्षरशः उध्वस्त केले आहेत. ज्या ठिकाणी हे लोक राहतात ती जागा बेघर वसाहत म्हणून ओळखली जाते. जवळपास 20/25 वर्षे ते या ठिकाणी वास्तव्य करून आहेत पण त्यांच्या नावावर घर नाही की कोणत्याही प्रकारची शेती नाही. मोलमजुरी व शेतमजूर म्हणून काम करणारे हे लोक आहेत. शासकीय दरबारी कसलीच नोंद नसल्याने महापुराने थैमान घातले असले तरीही या लोकांना शासकीय मदत आजवर मिळालेली नाही.
हे वास्तव बौध्द एकत्रीकरणच्या कोल्हापूर शाखेला समजल्यावर आपण या बांधवांना संस्थेतर्फे मदत करावी असा ठराव करण्यात आला.
बौध्द एकत्रीकरणच्या राज्य कार्यकारिणीशी संवाद साधून मदतीबाबत पावले उचलण्यात आली.
राज्य कार्यकारिणीचे मा. किसन थूल सर, संजय गायकवाड सर, अविनाश पवार सर, अॅड. अस्मिता तिडके मॅडम यांच्याशी चर्चा केली.
श्रावस्ती बहुउद्देशीय सेवा संस्था तसेच युवा बौद्ध धम्म परिषदेच्या सहकार्याने
बौध्द एकत्रीकरण व सक्षमीकरण संस्था व परिवर्तन मंच
दिनांक 3 सप्टेंबर 2021 रोजी कवटेसार , तालुका शिरोळ येथे पूरग्रस्त बांधवांना बौध्द एकत्रीकरण व सक्षमीकरण संस्था व परिवर्तन मंच नागपूर मार्फत प्रापंचिक साहित्य वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या अभिवादनाने झाली.युवा बौद्ध धम्म परिषदेचे संतोष भोसले सर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
भक्ती शिंदे, दिपक कांबळे, भिमराव तांबे, सिध्दार्थ कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले. बौध्द एकत्रीकरण व सक्षमीकरण संस्थेचे जिल्हाध्यक्ष सतीश भारतवासी यांनी बौध्द एकत्रीकरण संस्थेबाबत माहिती दिली तसेच सर्व उपस्थित गरजू व्यक्तींना मार्गदर्शन केले. यावेळी श्रावस्ती बहुउद्देशीय सेवा संस्थेच्या संस्थापिका भक्ती शिंदे मॅडम, युवा बौद्ध धम्म परिषदेचे राज्य संघटक संतोष भोसले सर, बौध्द एकत्रीकरण व सक्षमीकरण संस्थेचे जिल्हाध्यक्ष सतीश भारतवासी, सचिव सिद्धार्थ कांबळे, सदस्य दिपक कांबळे, भिमयान साप्ताहिकाचे संपादक तसेच बौध्द एकत्रीकरणचे सदस्य भिमराव तांबे, सुनिता कांबळे, रणजीत कांबळे, संविधान कांबळे हे उपस्थित होते.
पुरग्रस्त विद्यार्थ्यांना मदतीचा हात; शालेय वस्तूंचे वाटप
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published on SEP 07, 2021 19:00 PM
Web Title – Helping landless, agricultural laborers and homeless people in Kavatesar