बीड : एसटी संप सुरू असताना आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी शरद पवार यांच्या घरावर मोर्चा काढला यावेळी घरावर हल्ला करण्यत आला.या हल्ल्याप्रकरणी वकील गुणरत्न सदावर्ते हे अटकेत आहेत. त्यांचा पाय आता आणखी खोलात गेला आहे. सदावर्ते यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे ही तक्रार भाजप कडूनच म्हणजे भाजप तालुका अध्यक्षांनी केलीय. त्यानंतर गुन्हा दाखल केला गेलाय. सदावर्ते यांच्याविरोधात बीडमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (filed a case against gunaratna sadavarte in beed)
प्रकरण काय आहे?
“गुणरत्न सदावर्ते यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरले. तसेच मराठा समाजाला अत्याचारी समाज असे संबोधित केलं. मराठा आरक्षण संदर्भात वेळोवेळी त्यांनी मराठा समाजाचा अपमान केला. त्याचबरोबर चर्चेत राहण्यासाठी सदावर्ते यांनी माध्यमांसमोर जाऊन मराठा समाजाच्या भावना वारंवार दुखावल्या”, अशी तक्रार काही दिवसांपूर्वी भाजप तालुका अध्यक्ष स्वप्नील गलधर यांनी बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली होती.
सदावर्ते यांच्यावर अशाप्रकारे संपूर्ण राज्यात ठिकठिकाणी गुन्हे दाखल करण्यात येत आहेत.
दरम्यान,एसटी कामगारांच्यावतीने ८ एप्रिल रोजी शरद पवार यांच्या घरावर मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्च्यात सामील असणाऱ्या काही लोकांनी शरद पवार यांच्या घरावर दगडफेक आणि चप्पल फेकल्याचा आरोप आहे. या प्रकरणी एड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून ते सध्या पोलिसांच्या अटकेत आहेत.७ एप्रिल रात्री ११ ते ८ एप्रिल सकाळी २ वाजून ५० मिनिटे या कालावधीत गुणरत्न सदावर्ते, अभिषेक पाटील , जयश्री पाटील आणि कोअर कमिटीमध्ये असणाऱ्या इतर सदस्यांची गुणरत्न सदावर्ते राहत असलेल्या क्रीस्टील टॉवरच्या टेरेसवर मीटिंग झाल्याची माहिती समोर आलीय. याच मीटिंगमध्ये जयश्री पाटील यांनी पवारांच्या घरावर आंदोलन करण्यास सांगितले, असे पोलीस तपासात आढळून आले आहे. एसटी कामगारांची बाजू कोर्टात मांडणारे वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या अटकेनंतर अनेक महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले आहेत. त्यातून या प्रकरणाला वेगळंच वळण लागताना दिसत आहे.
इतर वाचनीय लेख/अपडेट्स सुद्धा पहा
Amy Wax या युएस प्राध्यापिकेचं ब्राह्मण स्त्री विषयी वादग्रस्त वक्तव्य
राज ठाकरे यांना आता नीलेश कराळे मास्तर यांचे प्रत्युत्तर..म्हणाले
मशीद भोंगा प्रकरण : सुजात आंबेडकर याना मनसे चं प्रत्युत्तर
अमित ठाकरे याना हनुमान चालीसा म्हणायला सांगा – सुजात आंबेडकर
द काश्मिर फाईल्स:भाजप देशाचे वातावरण बिघडवत आहे:शरद पवार
Bank frauds in india मागील सात वर्षात सर्वात मोठा घोटाळा
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published by Team Jaaglya Bharat on APR 17, 2022 :40 PM
WebTitle – Gunaratna Sadavarte’s troubles increase; now BJP has filed a case