मुंबई : वंचित Impact : गायरान जमिन अतिक्रमण नियमित होणार.राज्यातील गायरान जमिनीवरील अतिक्रमणाबाबतीत राज्य सरकार अखेर निर्णय जाहीर करणार आहे.२०११ अगोदरच्या गावठाण तसेच सरकारी जागेतील अतिक्रमण असणाऱ्या अनधिकृत घरांना नियमित करण्याचा निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे.गायरान जमिन प्रश्नाच्या संदर्भात गेल्या आठवड्यात वंचित बहुजन आघाडी या एकमेव राजकीय पक्षाने यासंदर्भात भरपावसात लाखोंच्या संख्येने आंदोलन करत मोर्चा काढला होता,त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी सर्व मागण्या मान्य करत लवकरच निर्णय जाहीर करू असे आश्वासन दिले होते.या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी गावठाण व सरकारी जागेवरील अतिक्रमणाच्या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्वपूर्ण बैठक पार पडली.या बैठकीत निर्णय झाला असून तो लवकरच जाहीर होईल अशी सूत्रांनी माहिती दिली.
सरकारकडून या निर्णयाच्या संदर्भात आदेश काढला जाईल
या बैठकीमध्ये गावठाण तसेच सरकारी जागेतील अतिक्रमण व गायरान जमिनिंच्या संदर्भात चर्चा झाली.
या संबंधित शासन निर्णय लवकरच जाहीर केला जाईल अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांनी दिली आहे.
निर्णय जाहीर झाल्यानंतर गावठाण तसेच सरकारी जागेवर गरजेपोटी बांधकाम करून बांधलेली अनधिकृत घरे नियमित होणार आहेत.
यामुळे लाखो वंचित गोरगरिबांना, झोपडपट्टीधारकांना या निर्णयाचा लाभ होणार आहे.
येत्या काही दिवसातच सरकारकडून या निर्णयाच्या संदर्भात आदेश काढला जाईल अशी माहिती मिळते.
राज्यातील गायरान जमिनींवरील अतिक्रमणाबाबतच्या धोरणासंदर्भात न्यायालयाच्या निर्देशाधीन राहून महिन्याभरातच अंतिम स्वरूप दिले जाईल असं आश्वासन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलं आहे. यासंदर्भातील बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, ग्रामविकासमंत्री, विभागांचे सचिव आदी उपस्थित होते.
गायरान जमिनींवरील अतिक्रमणे पाडली जाणार नाहीत – विखेपटिल
राज्यातील गायरान जमिनींवरील अतिक्रमणासंदर्भातील धोरणाला न्यायालयाच्या निर्देशाधीन राहून
महिन्याभरातच अंतिम स्वरूप दिले जाईल, असं आश्वासन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलं आहे.
तसेच गायरान जमिनींवरील अतिक्रमणे देखील पाडली जाणार नसल्याची महत्त्वाची माहिती महसूल मंत्री विखेपटिल यांनी दिली.
कॉंग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी विधानपरिषदेत ‘लक्षवेधी’द्वारे उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ही माहिती दिली आहे. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी म्हटलं की, गायरान जमिनींवरील झालेलं अतिक्रमण पाडण्याचा सरकारचा कोणताही हेतू नाही. हे अतिक्रमण नियमित करण्याचा आपण प्रयत्न करीत आहोत, असे आश्वासन महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सभागृहासमोर दिले आहे.
घरांची नोंदणी ग्रामपंचायतीमध्ये करण्याची प्रक्रिया चालू आहे. गावठाण हद्द वाढविता येईल असेही त्यांनी म्हटले.गैरसमजुतीमुळे क्षेत्रीय विभागात कारवाई झाली असेल. नोटीस दिली असेल तर शासनाकडे तक्रार करा. सरकारकडून अतिक्रमण काढण्यासाठी कोणत्याही सूचना दिल्या गेल्या नाहीत असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
गायरान जमीन शासन निर्णय 2023
गायरान जमिनीवरील अतिक्रमण धारकांचा मुद्दा गंभीर झाला होता. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्देशाच्या पार्श्वभूमीवर गायरान जमिनींवरील अतिक्रमण काढण्यात येत होते. या कारवाईला मोठा विरोध झाला होता.गेल्या आठवड्यात वंचित बहुजन आघाडी या एकमेव राजकीय पक्षाने यासंदर्भात भरपावसात लाखोंच्या संख्येने आंदोलन करत मोर्चा काढला होता,त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी सर्व मागण्या मान्य करत लवकरच निर्णय जाहीर करू असे आश्वासन दिले होते.मेनस्ट्रीम मिडियाने या लाखोंच्या मोर्चाला दाबण्याचा प्रयत्न केला होता,केवळ जागल्याभारत ने या संदर्भात दखल घेत बातमी केली होती.
सिम्बॉयसिस: हिंदू देवतांचा अपमान केला म्हणून प्रा. अशोक ढोले यांना अटक
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on AUG 04,2023 | 09:50 AM
WebTitle – Gairan gaothan Land encroachment will be regular