कोल्हापूर:भारतीय उपखंडात आणि इतरत्र सुद्धा बुद्धकालीन संस्कृतीचे अनेक अवशेष जुन्या खुणा आणि लेणी शहरे मॉनेस्ट्री उत्तखननात सापडत असतात.अनेक ठिकाणी उभारलेले बौद्ध स्तूप कालौघात हिंदुत्वकरणाचे बळी पडून ते शंकराची पिंड म्हणून पुजले गेले.काही ठिकाणी पुरातत्व विभागाने हस्तक्षेप करून असे विकृतीकरण आणि विद्रूपी करण रोखले आहे.मात्र अनेक ठिकाणी अशा गोष्टी घडलेल्या दिसतात.अशीच एक घटना कोल्हापूर जिल्ह्यातिल गगनबावडा घाटातील ऐनारा बौद्ध लेणी संदर्भात घडलेली आहे.दैनिक लोकमतने त्यासंदर्भात कोणतीही शहानिशा न करता ०८ फेब्रुवारी २०२२ रोजीच्या अंकात “बौद्ध लेणी” ही “बकासुराचा वाडा” असल्याचा उल्लेख करत चुकीची बातमी प्रकाशित केली होती.सदर बातमी वाचल्यानंतर महाराष्ट्रभरात संतापाची लाट उसळली.पुरातत्व विभागाशी लगाव असणारे,आणि ऐतिहासिक अवशेष, दस्तावेज,स्मारके यांच्या संवर्धन आणि संरक्षणासाठी आग्रही असणाऱ्या तसेच विविध बौद्ध संघटना आणि नागरिकांनी यावर तातडीने पाऊले उचलत कोल्हापुरात आंदोलन केल्याने.अखेर लोकमतने दुसऱ्या दिवशी योग्य माहिती देणारी बातमी देऊन वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
गगनबावडा:बकासुराचा वाडा नसून बौद्ध लेणी
कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमेवर असणाऱ्या गगनबावडा घाटातील ऐनारी गावाजवळील
डोंगरात असणाऱ्या गुहा या बकासुराचा वाडा नसून बौद्ध लेणी आहेत.
याबाबत कोकण इतिहास परिषदेचे अध्यक्ष अंजय धनावडे (महाड) यांनी मूलभूत संशोधन केले असून
ते २०१४ च्या “जर्नल ऑफ एशियाटिक सोसायटी मुंबई” मधून प्रकाशित झालेले आहे.
पांडवकालीन लेणी आणि सम्राट अशोककालीन लेणी यात फरक आहे. सम्राट अशोकाच्या काळात देशभरात अनेक व्यापाराचे मार्ग होते तसेच संपूर्ण भारतभर फिरुन धम्म प्रसार करण्यासाठी प्रत्येक 30 किलोमीटरवर लेणी असायची. भिक्खूंना प्रवासात आराम करता यावा यासाठी प्रत्येक 30 किलोमीटरवर अशी लेणी भारतभर होती. कोल्हापूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी अश्या लेणी आहेत. पळसंबे, पन्हाळा (मसाई), पोहाळे, ऐनारी (वैभववाडी) गगनगीरी, ब्रम्हपुरी याठिकाणी अश्या लेणी आहेत. या लेण्यांचा उपयोग त्याकाळी भिक्खूंना आराम करण्यासाठी, ध्यानधारणा करण्यासाठी आणि तत्कालीन व्यापार चालण्यासाठी होत असे. या लेण्यांच्या ठिकाणी अंघोळीच्या पाण्यासाठी वेगळी व्यवस्था व पिण्याच्या पाण्यासाठी वेगळी व्यवस्था असायची. तसेच भिक्खूंना राहण्यासाठी खोलीवजा व्यवस्था लेण्यांमध्ये केलेली असते. लेण्यांमध्ये एक सभागृह असते ज्याद्वारे आजूबाजूच्या परिसरातील लोकांना धम्म सांगण्यासाठी एकत्र करता येईल अशी मोकळी जागा असते. भारतभर अशा पध्दतीची लेणी सर्वत्र दिसून येतात.
तथाकथित बकासुराचा अर्थाअर्थी काही संबंध नाही
कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सिमेवर ऐनारी नावाचे गाव आहे. भुईबावडा घाटात अशा प्रकारच्या लेण्यांचा शोध लागला आहे. याच प्रकारच्या लेणी पन्हाळा,गगनबावडा तालुक्यातही आहेत. प्रत्येक लेण्यांवर स्थानिक लोकांनी अतिक्रमण करून त्या लेण्यांचा इतिहास माहिती नसल्याने काल्पनिक हिंदू देव आणि राक्षसांची नावे दिली आहेत. काही ठिकाणी पिंडीची स्थापना केली आहे. पोहाळे लेणी त्याचे एक उदाहरण देता येईल. गगनबावडा ऐनारी लेण्यांचे नाव पांडवकालीन “बकासूर गुहा” किंवा “बकासुराचा वाडा” असे ठेवले आहे. लेण्यांचा आणि तथाकथित बकासुराचा अर्थाअर्थी काही संबंध नाही. ऐतिहासिक व पुरातन तथ्यांचे, वास्तूंचे, संदर्भांचे विकृतीकरण करणे व त्याचा संबंध हिंदू धर्मातील देव-दानवांशी जोडून अतिक्रमण करणे हे आजतागायत कायम होत आले आहे.
सम्राट अशोकाच्या काळात संपूर्ण भारत देशात बौध्द धम्माचा बोलबाला होता. सम्राट अशोक यांनी भारताताची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी आणि व्यापार वाढवण्यासाठी silk route (व्यापार मार्ग) तयार केले होते. या मार्गावर दुतर्फा झाडे लावली होती तसेच या मार्गांचा उपयोग तत्कालीन बौध्द भिक्खू देशभरात धम्म प्रसारासाठी करत असत. बौध्द धम्मात चारिकेस अनन्यसाधारण महत्त्व आहे. चारिका करणे म्हणजे एका ठिकाणी न थांबता फिरुन बौध्द धम्माचा प्रचार आणि प्रसार करणे हे आहे. सम्राट अशोक यांनी बौध्द भिक्खूंच्या भारत भ्रमणासाठी या व्यापारी मार्गावरती जवळपास 84 हजार लेणी बांधली. सर्वसामान्य व्यक्ती दिवसभरात साधारण तीस किलोमीटर चालू शकतो या गोष्टीचा विचार करून अशोकाने संपूर्ण भारतभर या silk route वर सम्राट अशोक यांनी जवळपास 84 हजार लेण्यांची निर्मिती केली.
अशोकाच्या काळातील व्यापारी मार्ग
कोल्हापूर जिल्ह्याचा जर विचार करायचा झाल्यास कोल्हापूर जिल्हा हा पण बौध्द धम्माचे प्रमुख ठिकाण होते हे लक्षात घेतले पाहिजे.
कोल्हापूर जिल्ह्यात गगनबावडा येथील गगनगीरी येथे, पळसंबे, जवळचे ऐनारी,
पन्हाळा किल्ला येथे मसाई पठारावरील लेणी, पोहाळे लेणी तसेच ब्रम्हपुरी येथे बौध्द धम्माचे अवशेष सापडले आहेत.
ब्रम्हपुरी येथे तर भगवान बुद्धांच्या अस्थी सापडल्या आहेत तसेच लक्ष्मीपुरी येथे जयंती नाल्यामध्ये बौध्दकालीन स्तूप सापडले होते.
कोल्हापूर हे बौध्द धम्माचे महत्त्वाचे ठिकाण होते. सम्राट अशोकाच्या काळातील व्यापाराचे प्रमुख ठिकाण होते.
कोल्हापूरच्या घाटमाथ्यावरुन कोकणात जाण्यासाठी व्यापारी मार्ग होता हे सिद्ध झाले आहे.
कोल्हापूरवरून कोकण, गोवा, उत्तर-पश्चिम कर्नाटक याठिकाणी जाण्यासाठी
या व्यापारी मार्गाचा अवलंब अशोकाच्या काळात बौध्द भिक्खू आणि व्यापारी करत असत.
लोकमतने सांगली आवृत्तीतही अशी बातमी छापल्याचे लक्षात आल्यांनतर प्रविण बनसोडे,पवन वाघमारे ,रितेश कांबळे आणि राहुल कांबळे यांनी लोकमत सांगली कार्यालयात जाऊन आवृत्ती प्रमुखांना निवेदन दिले.
सांगली लोकमतने याबाबत बातमी दुरुस्ती करून बौध्द लेणी असल्याची बातमी देण्याची घोषणा केली आहे. त्यानुसार त्यांनी आजच्या लोकमत दैनिकात ही बातमी प्रसिद्ध केली आहे. तुमच्या शहरातील लोकमत दैनिकात दिनांक 8 फेब्रुवारी नंतर जर बकासुराचा वाडा अशा माहीतीची जर बातमी छापली असेल तर लोकमत आॅफिसला भेटून ती बातमी चुकीची असल्याचे सांगून बौध्द लेण्यांचा उल्लेख असल्याची बातमी छापायला सांगा. इंटरनेटवर म्हणजे लोकमतच्या ई-आवृत्तीत लोकमतने सदर बातमी प्रकाशित केली नसल्याचे दिसत आहे.
इतर वाचनीय लेख
पहिल्या स्कूटरपासून ‘हमारा बजाज’ पर्यंतचा प्रवास
कोटा मध्ये 82 हजार किलोची घंटा बांधली जात आहे,काय आहे खास?
Bhima Koregaon Commission:रश्मी शुक्ला यांचे प्रतिज्ञापत्र सादर
कर्नाटक हिजाब विवाद सुरु असतानाच दुसरीकडे केरळ सरकारची हिजाब वर बंदी
Monginis controversial ad:कुत्र्याला फुलनदेवी नाव दिल्याने संताप
व्हॅलेंटाईन डे – मर्दानी लढवय्यी वीर सूपुत्री भीमाच्या लेकीला समर्पित
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published by Team Jaaglya Bharat on FEB 14, 2022 13 : 20 PM
WebTitle – Gaganbawda:”Not the palace of Bakasura cave , it is a Buddhist caves”; Explanation of Lokmat