रेशन कार्ड वर मिळणारा मोफत तांदूळ बंद; आता मिळणार मसाल्यासह 9 नव्या वस्तू, सरकारच्या योजनेत बदल : केंद्र सरकारने देशातील नागरिकांसाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत, ज्यापैकी बहुतांश योजना गरीब आणि गरजू लोकांसाठी आहेत. या योजनांच्या अंतर्गत सर्व रेशन कार्डधारकांना मोफत रेशन पुरवले जाते. मात्र, आता या योजनेत मोठा बदल करण्यात आला आहे.
पूर्वी, रेशन कार्ड धारकांना सरकारकडून मोफत तांदूळ दिला जात होता.
मात्र, सरकारच्या नव्या निर्णयानुसार आता मोफत तांदूळ देणे बंद करण्यात आले आहे.
याऐवजी, सरकार आता 9 जीवनावश्यक वस्तू मोफत देणार आहे.
रेशन कार्ड वर आता मिळणाऱ्या वस्तू
केंद्र सरकारच्या मोफत रेशन योजनेच्या अंतर्गत देशातील सुमारे 90 कोटी लोक मोफत रेशन घेत आहेत.या नव्या योजनेनुसार, गहू, डाळी, हरभरा, साखर, मीठ, मोहरीचं तेल, मैदा, सोयाबीन आणि मसाले या वस्तूंचा समावेश करण्यात आला आहे. लोकांचं आरोग्य सुधारण्यासाठी आणि त्यांच्या आहारातील पोषण पातळी वाढवण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. यामुळे लोकांचं जीवनमानही सुधारेल, अशी सरकारची अपेक्षा आहे.
रेशन कार्ड कसे मिळवायचे?
जर तुम्ही रेशन कार्ड साठी पात्र असाल आणि अजूनही ते काढलं नसेल, तर त्यासाठी तुम्हाला अर्ज करावा लागेल.
सर्वप्रथम, तुमच्या जवळच्या अन्न व पुरवठा विभागाच्या कार्यालयात जाऊन किंवा अन्न विभागाच्या अधिकृत वेबसाइटवरून अर्ज डाउनलोड करून अर्जाची प्रक्रिया सुरू करू शकता.
अर्जामध्ये आवश्यक ती सर्व माहिती योग्य प्रकारे भरावी लागेल. यासोबतच, संबंधित कागदपत्रे जोडावी लागतील.
नंतर, अर्ज आणि कागदपत्रे तुमच्या जवळच्या रेशनिंग कार्यालयात जमा करावी लागतील.
संबंधित अधिकारी तुमच्या अर्जाची आणि माहितीची पडताळणी करून पुढील प्रक्रिया पूर्ण करेल.
एकदा पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, तुमचे रेशन कार्ड तयार होईल आणि त्यावर तुम्हाला मोफत रेशन मिळू शकेल.
आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on AUG 31,2024 | 08:40 AM
WebTitle – Free Rice on Ration Card Stopped: government scheme 9 New Items Including Spices Now Offered