पाकिस्तान चे माजी राष्ट्राध्यक्ष जनरल परवेझ मुशर्रफ यांचे रविवारी निधन झालं. स्थानिक माध्यमांनी ही माहिती दिली. संयुक्त अरब अमिरातीतील अमेरिकन हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. पाकिस्तानी मीडिया रिपोर्ट्सनुसार, तो अमायलोइडोसिस या आजाराने ग्रस्त होता.
दीर्घकाळ सुरू होतं आजारपण
एमायलोइडोसिसच्या तक्रारीनंतर मुशर्रफ यांना गेल्या वर्षी 10 जून रोजी यूएईच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, उपचारदरम्यान त्यांचे अवयव निकामी झाले (मल्टी ऑर्गन फेल्युअर ) होते. गेल्या वर्षी जूनमध्ये त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. प्रदीर्घ आजाराने आज त्यांचे निधन झाले.
परवेझ मुशर्रफ यांचा जन्म भारतात दिल्ली येथे झाला होता
पाकिस्तान चे माजी राष्ट्राध्यक्ष पद भूषविणारे परवेझ मुशर्रफ यांचा जन्म 11 ऑगस्ट 1943 रोजी नवी दिल्लीतील दर्यागंज येथे झाला. 1947 मध्ये त्यांच्या कुटुंबाने पाकिस्तानला जाण्याचा निर्णय घेतला. फाळणीच्या काही दिवस आधी त्यांचे संपूर्ण कुटुंब पाकिस्तानात पोहोचले होते. त्याचे वडील सईद पाकिस्तानच्या नव्या सरकारसाठी काम करू लागले आणि परराष्ट्र मंत्रालयाशी संबंधित होते.
पाकिस्तानचे लोक जेव्हा इंडिया इंडिया च्या घोषणा देऊ लागले, मुशर्रफ यांनी सांगितला एक रोचक किस्सा
माध्यमाला दिलेल्या एका मुलाखतीत परवेज मुशर्रफ यांनी अनेक रंजक गोष्टी सांगितल्या होत्या. यादरम्यान भारत आणि पाकिस्तानमधील क्रिकेट डिप्लोमसीवर बोलताना परवेझ मुशर्रफ म्हणाले होते की, क्रिकेटचा वापर दोन्ही देशांमधील जवळीक वाढवण्यासाठी केला जात आहे. ते म्हणाले की, ‘आमच्या काळात जेव्हा भारतीय संघ लाहोरमध्ये खेळत होता आणि लाहोरचे लोक भारतीय संघाचा जयजयकार करत होते. पाकिस्तानचे लोक जेव्हा इंडिया इंडिया च्या घोषणा देऊ लागले.असे दृश्य मी प्रथमच पाहिले. ही चांगली गोष्ट आहे. खेळ असाच ठेवला पाहिजे.
मुशर्रफ यांना फाशीची शिक्षा झाली होती
परवेझ मुशर्रफ हे पाकिस्तानात मृत्युदंडाची म्हणजेच फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती.
पाकिस्तानच्या इतिहासात पहिल्यांदाच पेशावर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश
वकार अहमद सेठ यांच्या अध्यक्षतेखालील विशेष न्यायालयाच्या तीन सदस्यीय खंडपीठाने अशी शिक्षा सुनावली होती.
परवेझ मुशर्रफ यांच्यावर डिसेंबर 2013 मध्ये 3 नोव्हेंबर 2007 रोजी पाकिस्तानमध्ये आणीबाणी लागू केल्याबद्दल आणि डिसेंबर 2007 च्या मध्यापर्यंत राज्यघटना निलंबित केल्याबद्दल देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. 31 मार्च 2014 रोजी मुशर्रफ यांना दोषी ठरवण्यात आले होते. 79 वर्षीय मुशर्रफ यांनी 1999 ते 2008 पर्यंत पाकिस्तानवर राज्य केले. मुशर्रफ मार्च 2016 पासून दुबईत राहत होते.
शरजील इमाम अन्य लोकांची देशद्रोह आरोपातून मुक्तता
लंडनच्या एडवर्ड चा औरंगाबादच्या सांची सोबत बौद्ध पद्धतीने विवाह
अदानी यांच्या अडचणीत वाढ NDTV सोडतायत पत्रकार
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on FEB 05,2023 14:40 PM
WebTitle – Former President of Pakistan Pervez Musharraf passed away