आग्रा : कधी कधी अनेकदा डॉक्टर घाई घाईने रुग्णाला मृत घोषित करतात.आणि नंतर रुग्ण कधी मृत्यूशय्येवर तर कधी तिरडी नेत असताना उठून बसल्याचे डोळे उघडल्याचे संबंधितांच्या लक्षात येते.काही केसेस मध्येतर चितेवर जळत असताना काही व्यक्ती जिवंत उठून बसल्या आहेत. मात्र यामागे कोणताही चमत्कार नसून हा वैद्यकीय निष्काळजीपणा असं म्हणता येईल,किंवा शरीरातील गुंतागुंतीची प्रक्रिया,ज्यामुळे कधी कधी अशी चूक घडत असते,पण हे सर्वात जास्त आनंददायी असतं तेव्हा आपण शोक करत असलेली व्यक्ती पुन्हा जिवंत असलेली दिसते.तिच्यात जीव आलेला असतो.त्यावेळी जवळच्या लोकांची अवस्था आपण शब्दात मांडू शकत नाही.हेच खरे, अशीच एक घटना घडलीय.भाजप चे माजी जिल्हाध्यक्ष महेश बघेल यांची प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं,रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना तपासणी करून मृत घोषित केलं. त्यानंतर शोकाकूल कुटुंबीयांनी त्यांना घरी आणले, मात्र अर्ध्या तासानंतर त्यांच्या शरीरात हालचाल सुरू झाल्याने त्यांना पुन्हा रुग्णालयात नेले. नंतर घरी आणलं आता मात्र त्यांना खूप स्वस्थ वाटत आहे.
भाजप नेते महेश बघेल मृत्यूनंतर पुन्हा जिवंत झाले
डॉक्टरांनी मृत घोषित केल्यानंतर महेश बघेल यांना सराई ख्वाजा येथील निवासस्थानी आणण्यात आले होते, असे कुटुंबीयांनी सांगितले. त्यांनंतर त्यांचे सर्व ठिकाणचे नातेवाईक जमले. सगळे दु:खात शोक करत बसले होते, तेवढ्यात महेश बघेल यांनी डोळे उघडले आणि त्यांच्या अंगात काहीशी हालचाल जाणवू लागली. हे पाहून रडणाऱ्या नातेवाईकांनी त्यांना ताबडतोब न्यू आग्रा येथील रुग्णालयात नेले, जिथे त्यांच्यावर उपचार सुरू होते.
महेश बघेल यांचा धाकटा भाऊ लखन सिंग बघेल ने सांगितलं की,
“सध्या मोठ्या भावावर दवाखान्यात उपचार सुरू असून भावाचा रक्तदाब 114/70 असा आहे.
उपचाराचा फायदा होत असून तो आता बरा असल्याचे त्यांनी सांगितले.“
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on AUG 07,2023 | 15:50 PM
WebTitle – Former Agra BJP district president Mahesh Baghel alive after half an hour of death!