दान पारमिता फाउंडेशन तर्फे विश्व धम्मलिपि दिवस साजरा
नाशिक प्रतिनिधी –
लुम्बिनी येथील बुद्धांचे जन्म स्थळ शोधून तेथील स्तंभावर असलेल्या शिलालेखाचे लिप्यांतर केल्यामुळे बुद्धांचे जन्मस्थळ निश्चित झाले- असे प्रतिपादन प्रा. देवेंद्र इंगळे यांनी केले.सर जेम्स प्रिन्सेप यांच्या जंयतीनिमित्त विश्व धम्मलिपी गौरव दिवस आज औरंगाबादकर सभागृह, नाशिक येथे दान पारमिता फाऊंडेशन नाशिक , यांच्यावतीने साजरा करण्यात आला. प्रमुख वक्ते म्हणून प्रा. देवेंद्र इंगळे सर व आयु. अतुल भोसेकर सर उपस्थित होते,
अलेक्झांडर कनिंघम यांची जयंती उत्साहात साजरी करायला हवी – अतुल भोसेकर
कार्यक्रमाच्या सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते प्रतिमांचे पूजन करण्यात आले व दीप प्रज्वलन प्रमुख वक्ते अतुल भोसेकर ,देवेंद्र इंगळे व सुनील खरे यांच्या हस्ते करण्यात आले,बौद्ध संस्कृतीला पुनरुज्जीवन देणारे जेन्स प्रिन्सेप , अलेक्झांडर कनिंघम आहेत त्यांची जयंती उत्साहात साजरी करायला हवी असे प्रतिपादन अतुल भोसेकर सर यांनी यावेळी केले,लुम्बिनी येथील बुद्धांचे जन्म स्थळ शोधून तेथील स्तंभावर असलेल्या शिलालेखाचे लिप्यांतर केल्यामुळे बुद्धांचे जन्मस्थळ निश्चित झाले,बौद्ध संस्कृतीचा इतिहास व त्याला मिळालेले पुनर्जीविन हे जेम्स प्रिन्सेप व अलेक्झांडर कनिघम यांची देण असल्याचे डॉ इंगळे यांनी प्रतिपादन केले.
२ वर्षात २३ बॅच मध्ये 6 ६ ते ७ हजार विद्यार्थ्यांनी धम्मलिपीचे प्रशिक्षण निशुल्क रित्या घेतले. त्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले.जे शिक्षक धम्मलिपि शिकवतात त्यापैकी निर्झरा रामटेके, करुणा मुन, छाया पाटील, नेहा राऊत यादव, स्वाती गायकवाड, पांडुरंग सरकटे, वंदना ओरके, कल्पना कांबळे, मनीषा डोळस, उज्वला भारसाकळे ह्या शिक्षकांना धम्मलिपि स्टार प्रचारक गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
१०० विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मान
यानंतर धम्मलिपि अवगत केलेल्या १०० विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमासाठी नागपुर, कोल्हापुर, पुणे, रत्नागिरी, मुंबई, औरंगाबाद, जालना, परभणी, धुळे, जळगाव येथून विद्यार्थी उपस्थित होते , सुनिल खरे, प्रविण जाधव, संतोष आंभोरे, विजय कापडणे, राहुल खरे, सुजाता मोरे, प्रज्ञा कांबळे, नूतन खरे , संजय पगारे, सोनाली निसर्गन, नितीन पिंपळीसकर , अंकित दोंदे, रविंद्र आढाव, आणि धम्मलिपि विद्यार्थी यांच्या प्रयत्नाने कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.धम्मलिपि विश्व गौरव दिवस सोहळ्यात मोठ्या प्रमाणावर अभ्यासक उपस्थित होते.
गुगल जाहिरातीसाठी क्षमस्व! साईट मेंटेनन्ससाठी त्या गरजेच्या आहेत,आशा आहे आपण समजून घ्याल.सहकार्य कराल.
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
तर वाचनीय लेख/अपडेट्स
मनसर विश्व विद्यापीठ येथे MBCPR टीम तर्फे कार्यशाळा संपन्न
नेताजी सुभाष चंद्र बोस यांची जेव्हा हिटलरने माफी मागितली
Thich nhat hanh:थिच न्यात हन्ह बौद्ध दृष्टिकोणास मूर्तरूप देणारे भिक्खू
श्रीलंका : आशियातील सर्वात प्रसिद्ध हत्ती नंदुगमुवा राजा चं निधन
भगवान बुद्धांचा मृत्यू कोणता पदार्थ सेवन केल्याने झाला? जाणून घ्या..
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published by Team Jaaglya Bharat on AUG 22, 2022 15:57 PM
WebTitle – Finding the birth place of Buddha in Lumbini and transliterating the inscription on the pillar there confirmed the birth place of Buddha – Prof. Devendra Ingle