बिहार मध्ये नितीश कुमारांनी भाजपचा एकनाथ शिंदे पॅटर्न चा प्लॅन उद्ध्वस्त केला,रातोरात सूत्रे फिरली अन नितीश कुमारांनी भाजपची साथ सोडत युतीतून बाहेर पडत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.त्यांनंतर लालूप्रसाद यादवांच्या राष्ट्रीय जनता दल सोबत युती करून त्यांनी पुन्हा बिहारची सत्ता आपल्या ताब्यात ठेवलीय,पण असं एका रात्री काय झालं नेमकं? ज्यामुळे हा निर्णय घ्यावा लागला? तर बिहार मध्येही भाजपा महाराष्ट्रात जे घडलं ते म्हणजे एकनाथ शिंदे पॅटर्न घडवू पाहत होती.याची कुणकुण नितीश कुमारांना लागताच त्यांनी वेळ न दवडता निर्णय घेऊन टाकला.कसं घडलं सगळं पडद्यामागे कोण होतं? कशी सूत्रे हलली? जाणून घेऊया.
नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर दोन तासांनंतर जेडीयूचे राष्ट्रीय अध्यक्ष लालन सिंह यांनी आरसीपी सिंह आणि भाजपच्या षडयंत्राचा खुलासा केला. त्यांनी त्या एका व्यक्तिचं नाव घेतलं जी आरसीपी सिंह यांच्या सावलीसारखे वावरत होती आणि पक्षाविरोधातील त्यांची प्रत्येक कृती जेडीयूला सांगत होती. त्यांनी त्या व्यक्तीचे नाव मोनी असे सांगितले आणि आम्ही त्यांना लवकरच मीडियासमोर सादर करणार आहोत असंही म्हटलंय.
भाजपमध्ये दाखल झालेले आरसीपी सिंग एक्सपोज झाले
मोनी आरसीपी सिंग यांच्या खूप जवळची व्यक्ती असल्याचे बोलले जाते.मोनी आरसीपी सिंग यांचा जवळचा कर्मचारी म्हणून काम करत होता. अगदी घरातील सदस्या असल्यासारखा त्याचा वावर होता.आरसीपी सिंह यांच्या बंगल्यावर भेटायला येणाऱ्या भाजप नेत्यांचे प्रत्येक संभाषण चर्चा ही जेडीयूच्या शीर्ष नेतृत्वापर्यंत पोहोचवली जायची. आणि याच इनपुटवर जेडीयूमध्ये असणारे आणि नंतर भाजपमध्ये दाखल झालेले आरसीपी सिंग एक्सपोज झाले आणि रातोरात बिहारची सत्ता बदलली.
लक्षात घ्या, सरकार बदलण्याच्या दोन दिवस आधीच लालन सिंह यांनी पत्रकार परिषद घेतली होती.
तेव्हा ते म्हणाले होते, आरसीपी सिंग यांच्या घरातून कट रचला जात होता. आम्ही तो योग्य वेळी उघड करू.
त्यावेळी त्यांनी इशाऱ्या इशाऱ्यातच कटाबद्दल माहिती उघड केली होती, मात्र संपूर्ण माहिती उघड केली नाही.
भाजपचे संपूर्ण षडयंत्र समजल्यावर तो पळून आमच्याकडे आला
नितीश कुमार यांनी महाआघाडी सरकारमध्ये मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली त्यादिवशी लालन सिंह यांनी माध्यमांशी संवाद साधला.ते म्हणाले, तो माणूस (मोनी सिंग) २४ तास आरसीपी सिंगसोबत राहत होता. दिवसा, अन अगदी रात्रीही. नितीश कुमार जेव्हा बरहमधून लोकसभा निवडणूक लढवत असायचे तेव्हा त्याचे वडील जेडीयूचे कार्यकर्ते होते.भाजपचे संपूर्ण षडयंत्र समजल्यावर तो पळून आमच्याकडे आला. येथे येऊन त्यानं सांगितलं की,तिकडे मोठं षडयंत्र सुरू आहे. एक दिवसाआड भाजपचे बिहार प्रभारी रात्री 10.30 वाजता आरसीपी सिंह यांच्याकडे यायचे. काही लोकांची यादी देऊन त्यांना तिकिटे मिळवून देण्यासाठी आरसीपी सिंगला यादी देत असायचे.हे लोक जिंकले तर तुमचे खास माणसं म्हणून राहतील आणि हरले तर नितीशकुमार दुबळे होतील.असा हा प्लॅन तयार झाला होता.यावर लालन सिंह यांना तो माणूस आता कुठे आहे असे विचारले असता ते म्हणाले की त्याला लवकरच सादर करणार आहे.
मोनी सिंग जेडीयूशी दीर्घकाळापासून संबंध
मोनी हे दीर्घकाळापासून जेडीयूशी संबंधित आहेत. आरसीपी सिंग यांचा पर्सनल स्टाफ असल्याचे सांगण्यात येत आहे. अगदी जवळ असल्याने घरात थेट प्रवेश होता. आरसीपी सिंग यांच्यासोबत ते सावलीसारखे वावरत होते.
जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली
फतुहा येथील क्षेत्र क्रमांक-34 मधून जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली आहे. मात्र, तो जिंकू शकला नाही.
आरपीसी सिंगचा पर्दाफाश करण्याच्या लालन सिंगच्या दाव्याबाबत श्याम सुंदर उर्फ मोनी यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला गेला,
परंतु मोनीचा फोन बंद असल्याचे सांगत होता.कदाचित आता त्यांच्या सुरक्षेचा मुद्दाही उपस्थित होऊ शकतो.
सत्तेसाठी खोटे बोलत आहेत – भाजपाचा आरोप
भाजपचे प्रदेश प्रवक्ते अरविंद कुमार सिंह म्हणाले की, हे सर्व लोक खुर्चीसाठी खोटे बोलत आहेत. खोटे बोलणे आणि राज्य करणे हा त्यांचा स्वभाव आहे. सत्तेसाठी कोणीही कोणत्याही थराला जाऊ शकतो. असेच एक पात्र म्हणजे नितीश कुमार. जेडीयू अगोदर होती. पण आता जनतेवर जुलूम, अत्याचार करून मुख्यमंत्री म्हणून राहणे एवढाच अर्थ आहे. नितीश कुमार दारू आणि वाळूमध्ये राज्याला गुंतवून ठेवत आहेत. ते खुर्ची कुमार आहेत.
मनुस्मृती सारखे ग्रंथ महिलांना खूप सन्माननीय स्थान देतात: न्या.प्रतिभा सिंह
हिंदू तरुणाला दाढी पाहून मारहाण; धर्म जाणून घेण्यासाठी अंतर्वस्त्रे काढली
28 तास लटकलेल्या अवस्थेत साधू चा मृतदेह; भाजप आमदारासह तिघांवर गुन्हा दाखल
पा रंजित यांच्या धम्मम चित्रपटात दाखवलेला बुद्ध वादाचा विषय का ठरू लागलाय?
गुगल जाहिरातीसाठी क्षमस्व! साईट मेंटेनन्ससाठी त्या गरजेच्या आहेत,आशा आहे आपण समजून घ्याल.सहकार्य कराल.
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published by Team Jaaglya Bharat on AUG 12,2022,12:05 PM
WebTitle – find out How did the BJP’s Eknath Shinde patterns failed in Bihar?