अमृतसर येथून माता वैष्णोदेवी ला जाणारी बसचा दरीत कोसळून भीषण अपघात झाला असून या अपघातात 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.ही बस अमृतसर येथून वैष्णोदेवी कडे (कट्रा) जात होती.या भीषण अपघातात अनेक लोक जखमी झाल्याची माहितीही समोर आली आहे. जखमींना उपचारासाठी जवळच्या दवाखान्यात दाखल करण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त बस ही अमृतसर येथून कट्रा येथे जात होती. बस नॅशनल हायवे क्रमांक 44 वर झज्जर कोटलीला पोहोचल्यावरचालकाचे नियंत्रण सुटले अन बस दरीत कोसळली. या बसमध्ये जवळपास 75 प्रवासी प्रवास करत असल्याची माहिती समोर आली असून यांपैकी 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समजतेय,जखमींना जम्मू येथे उपचारासाठी हलवण्यात आले आहे.
वैष्णोदेवी दर्शनाला जाणाऱ्या बस चा भीषण अपघात , 10 जणांचा मृत्यू
एएनआय वृत्तसंस्थेच्या बातमीनुसार, CRPF अधिकारी अशोक चौधरी यांनी यासंदर्भात अधिक माहिती देताना सांगितलं की, मंगळवारी सकाळी या अपघाताची माहिती मिळताच आमची टीम येथे पोहोचली व त्यांनी रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलं. बस मधिल मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू असून जखमींना रुग्णालयात पोहोचवण्यात आल्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
यापैकी 4 गंभीर जखमींना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात हलविण्यात आले.
आणि इतर 12 जखमींवर स्थानिक पीएचसीमध्ये उपचार सुरू करण्यात आले आहेत.
पोलिसांची एक टीम सोबत रेस्क्यू ऑपरेशन करत आहे.या बसमध्ये बिहारमधीलही काही लोक असल्याचे समजते.हे लोक कटरा येथे जात होते.
सावरकर जयंती साठी सावित्रीबाई फुले आणि अहिल्यादेवी होळकर यांचे पुतळे हटवले
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published by Team Jaaglya Bharat on 30, MAY 2023, 11:45 AM
WebTitle – Fatal accident of bus going to Vaishno Devi Darshan, 10 people died