बॉलीवूड सेलिब्रिटीला द्वेष करणाऱ्यांच्या रोषाला सामोरे जाण्याची पहिलीच वेळ नाही. याआधी शाहरुख खान आणि झहीर खान यांनाही दिवाळी साजरी केल्याने ट्रोल करण्यात आले आहे. दिवाळी साजरी केल्याने यावेळी ट्रोल्सनी फरहान अख्तर वर हल्ला केला.
फरहान अख्तर ने अलीकडेच दिवाळी निमित्त एक फोटो पोस्ट केला आहे ज्यामध्ये तो त्याची मैत्रीण शिबानी दांडेकर आणि त्याचा व्यवसाय भागीदार रितेश सिधवानी यांच्यासोबत धनतेरेस पूजा करताना दिसत आहे. त्याने कॅप्शनमध्ये “हॅपी दिवाळी” असे लिहिले आहे.
हिंदू सण साजरा केल्याबद्दल शिवीगाळ
अख्तरने हा फोटो पोस्ट केल्यानंतर काही लोकांनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली आणि हिंदू सण साजरा केल्याबद्दल शिवीगाळ केली.
कुटुंबाच्या अगदी जवळच्या एका स्त्रोतच्या म्हणण्यानुसार , “आम्ही सर्व देवांच्या एकतेवर विश्वास ठेवतो. फरहानचे वडील मुस्लिम आहेत. त्याची आई पारशी आहे आणि ती दरवर्षी दिवाळी साजरी करते. फरहानसाठी ईद साजरी करण्याइतकीच दिवाळी साजरी करणे स्वाभाविक आहे. यात हे ट्रोल्स कुठून मध्येच आले?” अख्तर कुटुंबाकडून कायदेशीर कारवाई केली जात असल्याचे या सूत्राने पुढे सांगितले.
“जावेद साब [जावेद अख्तर] यांना वाटते की ट्रॉलर्सच्या हातातले खेळणे बनण्यापेक्षा द्वेषाने भरलेल्या प्रतिक्रिया दुर्लक्षित करणे योग्य आहे. त्याच वेळी, त्याना असेही वाटते की द्वेष करणार्या आणि गैरवर्तन करणार्यांकडे लक्ष देणे म्हणजे हे त्यांना जे पाहिजे ते करत असल्यासारखे आहे. सामान्यतः कुटुंब ऑनलाइन गैरवर्तनाकडे दुर्लक्ष करत आले आहे. परंतु यावेळी द्वेषाची परिसीमा झाली आहे. आणि ते दुर्लक्षित करण्याइतपत नसून खूप जास्त आहे,” असं स्रोत पुढे म्हणतो.
द्वेष करणाऱ्यांची नावे शोधून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची वेळ आली आहे.
या प्रकरणी प्रतिक्रियेसाठी फरहान उपलब्ध होऊ शकले नाहीत.
त्यांची कायदेशीर टीमला ही परिस्थिती हाताळू द्यावी असा सल्ला देण्यात आला आहे.
धार्मिक स्वातंत्र्य:भारताला रेड लिस्ट मध्ये टाका,अमेरिकन संस्थेची शिफारश
राम मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या दलित कुटुंबावर प्राणघातक हल्ला
समीर वानखेडे ला बॉलिवूडवर हल्ला करायला आवडतं – अनुराग कश्यप
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published by Team Jaaglya Bharat on NOV 08, 2021 15:55 PM
WebTitle – Farhan Akhtar trolled for celebrating Diwali; Preparation for legal action