मोठा निर्णय! ब्राह्मण समाजासाठी आर्थिक विकास महामंडळाची स्थापना; मुख्यालय पुण्यात : आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत ब्राह्मण समाजासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा केली. या महामंडळामार्फत ब्राह्मण समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल युवक-युवतींना शैक्षणिक आणि व्यावसायिक उद्दिष्टांसाठी आर्थिक सहाय्य पुरवले जाईल. महामंडळासाठी ५० कोटींचे भागभांडवल उपलब्ध करून दिले जाईल, आणि याचे मुख्यालय पुण्यात असणार आहे.

कुणबी समाजाच्या तीन पोटजातींचा इतर मागासवर्ग यादीत समावेश
राज्य मागासवर्गीय आयोगाच्या शिफारशींनुसार तिलोरी कुणबी, तिल्लोरी कुणबी, ति. कुणबी या पोटजातींचा समावेश महाराष्ट्र शासनाच्या इतर मागासवर्ग यादीतील अनुक्रमांक ८३ वर करण्यात आला आहे. आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत यास मान्यता देण्यात आली. यामुळे या पोटजातींचा लेवा कुणबी, लेवा पाटील, लेवा पाटीदार, मराठा कुणबी, कुणबी मराठा यांच्यासोबत समावेश होईल.
राजपूत समाजासाठी वीर शिरोमणी महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळ
राजपूत समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी वीर शिरोमणी महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या महामंडळामार्फत युवक-युवतींना शैक्षणिक आणि व्यवसायासाठी आर्थिक सहाय्य दिले जाईल. महामंडळाला ५० कोटींचे भागभांडवल दिले जाईल, आणि याचे मुख्यालय छत्रपती संभाजीनगर येथे असणार आहे.
राज्यातील १४ आयटीआय संस्थांचे नामकरण
राज्यातील १४ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे नामकरण करण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अध्यक्षस्थानी होते. राज्यात सध्या ४१९ शासकीय आणि ५८५ खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था आहेत, यापैकी १४ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांची नावे बदलण्यात येणार आहेत.
नाव बदलाचे तपशील असे आहेत:
- औद्योगिक प्रशिक्षण संस्था बीडचे नाव कै. विनायकराव मेटे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था
- औद्योगिक प्रशिक्षण संस्था जामखेड, जि. अहमदनगरचे नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था
- औद्योगिक प्रशिक्षण संस्था मुंबई शहरचे नाव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था
- औद्योगिक प्रशिक्षण संस्था येवला, जि. नाशिकचे नाव महात्मा ज्योतिबा फुले शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था
- औद्योगिक प्रशिक्षण संस्था जव्हार, जि. पालघरचे नाव भगवान बिरसा मुंडा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था
- औद्योगिक प्रशिक्षण संस्था कोल्हापूरचे नाव राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था
- औद्योगिक प्रशिक्षण संस्था अमरावतीचे नाव संत गाडगेबाबा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था
- औद्योगिक प्रशिक्षण संस्था सांगलीचे नाव लोकशाहीर अण्णा भाऊ साठे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था
- औद्योगिक प्रशिक्षण संस्था जळगावचे नाव कवयित्री बहिणाबाई चौधरी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था
- औद्योगिक प्रशिक्षण संस्था आर्वी, जि. वर्धाचे नाव दत्तोपंतजी ठेंगडी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था
- औद्योगिक प्रशिक्षण संस्था बेलापूर, नवी मुंबईचे नाव दि. बा. पाटील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था
- औद्योगिक प्रशिक्षण संस्था कुर्लाचे नाव महाराणा प्रताप शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था
- औद्योगिक प्रशिक्षण संस्था भूम, जि. धाराशिवचे नाव आचार्य विद्यासागरजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था
- औद्योगिक प्रशिक्षण संस्था ठाणेचे नाव धर्मवीर आनंद दिघे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था असे होणार आहे.
राष्ट्रीय विधी विद्यापीठांसाठी वाढीव निधी
छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर येथील राष्ट्रीय विधी विद्यापीठांसाठी दरवर्षी देण्यात येणाऱ्या निधीत २ कोटी रुपयांची वाढ करण्यात आली आहे. आता प्रत्येक विद्यापीठाला ७ कोटी रुपयांचा निधी दिला जाईल. सन २०२४-२५ ते २०२७-२८ या कालावधीसाठी चार हप्त्यांत ही रक्कम वितरित केली जाईल. वाढती विद्यार्थी संख्या, देखभाल-दुरुस्ती आणि सुरक्षा खर्च लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी या विद्यापीठांना दरवर्षी ५ कोटी रुपये देण्यात येत होते.
आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on SEP 00,2024 | 20:13 PM
WebTitle – Establishment of Economic Development Corporation for Brahmin Community; Headquarters in Pune