बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस (Jacqueline Fernandez ) सध्या तिच्या चित्रपटांमुळे नाही तर ठग सुकेश चंद्रशेखरसोबतच्या कथित नात्यामुळे चर्चेत आहे. २०० कोटींच्या मनी लाँड्रिंगचा आरोप असलेल्या सुकेशने जॅकलीनला करोडोंच्या भेटवस्तू दिल्या आहेत. आता या प्रकरणाचा तपास करणार्या अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) (ED) जॅकलिनविरुद्धही आरोपपत्र दाखल करण्याची तयारी केली असून तिलाही या प्रकरणात आरोपी बनवले जाणार आहे. (Jacqueline Fernandez 200 crore money laundering case)
या प्रकरणात जॅकलिनचे नाव समोर आल्यानंतर ईडी ने जॅकलीन फर्नांडिस ची अनेकवेळा चौकशी केली आहे. यानंतर एजन्सीने सुकेशकडून जॅकलिनला मिळालेल्या भेटवस्तूही जप्त केल्या आहेत. जॅकलीन अनेकवेळा सुकेशला भेटली होती आणि ईडीच्या चौकशीत तिने हे कबूल केले.
चौकशीत काही गोष्टी समोर आल्या
कथित 200 कोटी रुपयांच्या सुकेश चंद्रशेकर यांच्यासोबतच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात बॉलीवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस विरुद्ध अंमलबजावणी संचालनालयाने ( ईडी ) दाखल केलेल्या दुसऱ्या पुरवणी आरोपपत्रातील काही प्रमुख मुद्यातील चर्चा.
या प्रकरणातील सत्य बाहेर आणण्यासाठी ईडीने गेल्या वर्षी चंद्रशेखर आणि जॅकलिनला एकत्र भेटले होते.
ईडीने आधी दोघांना स्वतःची ओळख करून देण्यास सांगितले, त्यावर चंद्रशेखर आणि जॅकलीनने त्यांची नावे सांगितली.
यानंतर ईडीने दुसरा प्रश्न विचारला की ते एकमेकांना कसे ओळखतात?
यावर, जॅकलीन म्हणाली की ते फेब्रुवारी 2021 पासून फोनवर बोलत आहेत मात्र गेल्या वर्षीच्या ऑगस्टनंतर ते एकमेकांशी बोललेले नाहीत.
जॅकलीन फर्नांडिस आणि चंद्रशेखर यांची जून २०२१ मध्ये चेन्नईमध्ये दोनदा भेट झाली होती, असे जॅकलीन फर्नांडिसने सांगितले. चंद्रशेखरनेही जॅकलीनने जे सांगितले ते बरोबर आहे याची पुष्टी केली.
यानंतर,चंद्रशेखरला ईडीने तिसरा विचारला की त्याने जॅकलीनशी आपली ओळख कशी करून दिली?
आपण शेखर असल्याचे जॅकलिनला सांगितले असल्याचे चंद्रशेखर यांनी सांगितले.
फर्नांडिस ने तिच्या उत्तरात असं म्हटलं की चंद्रशेखर यांनी सन टीव्हीचा मालक असल्याचा दावा करत
शेखर रत्न वेला अशी स्वतःची ओळख करून दिली होती.दिवंगत राजकारणी जयललिता यांचा पुतण्या असल्याचेही त्यांनी त्यावेळी सांगितलं होतं.
चौथा प्रश्न ईडीने विचारला की ते पहिल्यांदा कधी बोलले. यावर जॅकलिनने सांगितले की ते जानेवारी 2021 च्या शेवटच्या आठवड्यात बोलले होते. मात्र, चंद्रशेखर च्या उत्तरात हीच माहिती डिसेंबर 2020 मध्ये बोलल्याची आली.
त्यानंतर ईडीने चंद्रशेखर यांना विचारले की त्यांनी जॅकलिनची बहीण जेराल्डिन फर्नांडिससाठी बीएमडब्ल्यू कार खरेदी केली आहे का.
जॅकलीनने याचा इन्कार केला, तर चंद्रशेखरने मला आठवत नसल्याचे सांगितले.
भावासाठी $150,000 पाठवले
सहाव्या प्रश्नात ईडीने चंद्रशेखर यांना विचारले की, त्यांनी बहरीनमधील जॅकलिनच्या पालकांसाठी कार खरेदी केली होती का?
चंद्रशेखर पुन्हा म्हणाले की मला आठवत नाही तर जॅकलीन म्हणाली की तिच्या कुटुंबातील सदस्यांसाठी कोणतीही कार खरेदी केली नाही.
ईडीने चंद्रशेखर यांना अमेरिकेतील गेराल्डिन फर्नांडिस यांच्या बँक खात्यात पैसे पाठवले का, अशी विचारणा केली.
चंद्रशेखरने पुन्हा सांगितले की मला आठवत नाही तर जॅकलिनने सांगितले की त्यांनी $150,000 पाठवले होते.
आठव्या प्रश्नात, ईडीने चंद्रशेखर यांना विचारले की त्यांनी ऑस्ट्रेलियातील जॅकलिनच्या भावाच्या बँक खात्यात किती पैसे पाठवले?
यावेळी देखील, चंद्रशेखर म्हणाले की त्यांना माहित नाही आणि काहीही आठवत नाही,
तर जॅकलिनने सांगितले की त्याने तिच्या भावाच्या खात्यावर 15 लाख रुपये पाठवले आहेत.
नवव्या प्रश्नात, ईडीने विचारले की कोणत्या मोबाइल अॅप्लिकेशन द्वारे दोघे एकमेकांशी कनेक्ट होते? यावर जॅकलीन म्हणाली की ते व्हॉट्सअॅपवर बोलत असत, चंद्रशेखर यांनी याबद्दल पुष्टी केली.
त्यानंतर ईडीने विचारले की त्यांच्यात महागड्या भेटवस्तूंची देवाणघेवाण झाली का?
याप्रश्नावर चंद्रशेखरने सांगितले की मला आठवत नाही, तर जॅकलिनने सांगितले की तिला गुच्ची, चॅनेल, सेंट लॉरेंट आणि डायरच्या (Gucci, Chanel, Saint Laurent and Dior) चार बॅग्ज मिळाल्या आहेत; लुई Vuitton आणि Louboutin दोन शूज; Gucci च्या दोन ड्रेस ; परफ्यूम; चार कॅट्स; एक मिनी कूपर; दोन डायमंडचे कानातले; आणि चंद्रशेकरकडून एक बहुरंगी हिऱ्याचे ब्रेसलेट अशा भेटवस्तू मिळाल्या होत्या.
पुढील प्रश्नात ईडीने चंद्रशेखर यांना विचारले की, त्यांनी जॅकलिनच्या वतीने अद्वैत कलाला १५ लाख रुपये दिले का? फर्नांडिस आणि चंद्रशेखर या दोघांनीही त्याला दुजोरा दिला.
जॅकलीनला आरोपी करणं चुकीचं – वकील
जॅकलिनच्या वकिलाने म्हटलंय की, “आम्हाला आतापर्यंत एकच माहिती मिळाली आहे की ईडीने तक्रार दाखल केली आहे. याची माहितीही आम्हाला प्रसारमाध्यमांद्वारे मिळाली आहे. आतापर्यंत ईडीकडून अधिकृत संवाद झालेला नाही. माझ्या क्लायंटला कोणतीही तक्रार प्रत मिळालेली नाही. मात्र, प्रसारमाध्यमांचे वृत्त खरे असेल, तर तिला या प्रकरणात आरोपी बनवले जात आहे, हे अत्यंत दुर्दैवी आहे.वकिलाने असंही म्हटलंय की, जॅकलीनने तपासादरम्यान एजन्सीला पूर्ण सहकार्य केले आहे आणि ती या प्रकरणातील आरोपी नसून पीडित आहे आणि तिच्याविरोधात मोठा कट रचला गेला आहे.
निवडणूक प्रचारात मोफत आश्वासनांची व्याख्या सर्वोच्च न्यायालय ठरवणार
‘अफजल’ बनून ‘विष्णू’ ने दिली मुकेश अंबानी ना जीवे मारण्याची धमकी
गुगल जाहिरातीसाठी क्षमस्व! साईट मेंटेनन्ससाठी त्या गरजेच्या आहेत,आशा आहे आपण समजून घ्याल.सहकार्य कराल.
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published by Team Jaaglya Bharat on AUG 18,2022, 13:59 PM
WebTitle – ED investigation in Jacqueline Fernandez 200 crore money laundering case