गोरखपूर : अलीकडेच न्यायालयाने सरकारला खडे बोल सुनावत रासुका हटवलेले डॉ. कफील खान ( dr.kafeel khan) यांच्यावर आता पोलिसांची आजन्म पाळत असणार.गोरखपूर पोलिसांनी हिस्ट्रीशिटर (history shitter) म्हणून यादी काढली आहे. त्यात डॉ. कफील खान यांचेही नाव समाविष्ट करण्यात आले आहे.त्यामुळे पोलिस आता त्यांच्यावर हिस्ट्री शिटर प्रमाणे पाळत ठेवतील आणि तसे ट्रीट करतील.गोरखपूरचे पोलिस एसपी यांनी दिलेल्या माहितीनुसार 1462 लोकांची नावे आतापर्यंत या यादीत समाविष्ट करण्यात आली असून ही यादी आणखी वाढण्याची शक्यता आहे.
डॉ.कफील यांना गोवण्यात आले
डॉ. कफील खान हे गोरखपूर मधील बाबाराघवदास मेडिकल कॉलेज मध्ये नोडल अधिकारी असताना ऑक्सीजन कांडची घटना घडली होती,आणि ऑक्सीजन अभावी 30 पेक्षा जास्त मुलांचे बळी गेले होते.या घटनेत डॉ. कफील यांना गोवण्यात आल्याचे बोलले जाते.त्यांना त्यात अटक झाली,तुरुंगात सुद्धा रवानगी झाली मात्र त्यांच्यावर गुन्हा सिद्ध होऊ शकला नाही.याउलट दुसरीकडे डॉ. कफील खान यांनी आपल्या खाजगी क्लिनिक मधून अतिरिक्त ऑक्सीजन मागवून अनेक लहान बाळांचे प्राण वाचवले होते.राजकीय आकसापोटी आणि प्रकरण दाबण्यासाठी त्यांना यात गोवण्यात आल्याचे बोलले जाते.2018 मध्ये त्यांना न्यायालयाने जामिनावर मुक्त केले.
कित्येक महीने जेलमध्ये
डॉ. कफील खान यांनी सीएए एनआरसीविरूद्धच्या देशव्यापी आंदोलनात भाग घेतला होता.यावेळी त्यांनी भडकाऊ भाषण केले असा आरोप ठेवण्यात आला.2 जानेवारीला यूपी एटीएसने त्याना मुंबईहून अटक केली होती आणि अलीगढ डीएमच्या अहवालावरून त्यांच्यावर एनएसएचा (रासुका) लावला गेला.त्यानंतर ते कित्येक महीने जेलमध्ये राहिले.तुरुंगातील वाईट दिवस,अव्यवस्था,घाणेरडे वातावरण,गैरसोय याबद्दल ते वेळोवेळी बोलत होते.
डॉ.कफिल खान यांना दिलासा
यानंतर हायकोर्टाच्या आदेशानंतर २ सप्टेंबर रोजी डॉ. काफिल खान यांची मथुरा येथील कारागृहातून सुटका करण्यात आली होती,
त्याविरोधात योगी सरकारने सर्वोच्च न्यायालयात सुटका न करण्यासाठी याचिका दाखल केली होती.
सर्वोच्च न्यायालयाने युपी सरकारला झटका देत योगी सरकारची याचिका फेटाळून लावत
डॉ. काफील खान यांच्याविरोधात राष्ट्रीय सुरक्षा अॅक्ट (एनएसए) हटवण्याच्या
इलाहाबाद हायकोर्टाच्या आदेशात हस्तक्षेपास नकार दिला. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयामुळे डॉ. कफिल खान यांना दिलासा मिळाला.
हिस्ट्री शिटर
मात्र आता पोलिसांनी पुन्हा त्यांचे नाव हिस्ट्री शिटर म्हणून समाविष्ट केले आहे.
यावर डॉ.खान यांनी चोख उत्तर देत म्हटले की माझी इच्छा आहे की पोलिसांनी माझ्यावर जरूर नजर ठेवावी.
परंतु फक्त कागदोपत्री नाही तर दोन पोलिसवाले माझ्या सोबत ठेवावेत.
जे माझ्यावर 24 तास नजर ठेवतील आणि माझ्यावर नेहमी होणाऱ्या खोट्या केसेस पासून मला सुटका मिळेल.
डॉ.कफील खान प्रकरण; युपी सरकारला सर्वोच्च न्यायालयाकडून झटका
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो.. @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)