सुप्रीम कोर्टाने उत्तर प्रदेशातील योगी सरकारला डॉ.कफील खान प्रकरणी झटका दिला आहे. कोर्टाने योगी सरकारची याचिका फेटाळून लावत डॉ. खान यांच्याविरोधात राष्ट्रीय सुरक्षा अॅक्ट (एनएसए) हटवण्याच्या इलाहाबाद हायकोर्टाच्या आदेशात हस्तक्षेपास नकार दिला. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयामुळे डॉ. काफिल खान यांना दिलासा मिळाला आहे.
इलाहाबाद हायकोर्टाने आपल्या आदेशात म्हटलं होतं की, ‘एनएसए’ अंतर्गत डॉ. खान यांना अटक करणे, त्यांच्या अटकेचा कालावधी वाढवणं हे बेकायदा आहे. हायकोर्टाच्या या आदेशानंतर २ सप्टेंबर रोजी डॉ.कफील खान यांची मथुरा येथील कारागृहातून सुटका करण्यात आली होती. मात्र, योगी सरकारने हायकोर्टाच्या या आदेशाविरोधात सुप्रीम कोर्टात अपिल केलं होतं. मात्र, सुप्रीम कोर्टानेही आता सरकारची याचिका फेटाळून लावली.
डॉ.कफील खान (dr.kafeel khan) यांनी ट्विट करून याबद्दल न्यायालयाचे आभार मानले असून आपला न्यायव्यवस्थेवर विश्वास असल्याचे म्हणले आहे.
डॉ. कफील खानवर आजन्म पोलिसांची पाळत ; कफील नी दिलं चोख उत्तर
गोरखपूर : अलीकडेच न्यायालयाने सरकारला खडे बोल सुनावत रासुका हटवलेले डॉ. कफील खान ( dr.kafeel khan) यांच्यावर आता पोलिसांची आजन्म पाळत असणार.
गोरखपूर पोलिसांनी हिस्ट्रीशिटर (history shitter) म्हणून यादी काढली आहे.
त्यात डॉ. कफील खान यांचेही नाव समाविष्ट करण्यात आले आहे.त्यामुळे पोलिस आता त्यांच्यावर हिस्ट्री शिटर प्रमाणे पाळत ठेवतील आणि तसे ट्रीट करतील.गोरखपूरचे पोलिस एसपी यांनी दिलेल्या माहितीनुसार 1462 लोकांची नावे आतापर्यंत या यादीत समाविष्ट करण्यात आली असून ही यादी आणखी वाढण्याची शक्यता आहे.
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो.. @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)