आज संपूर्ण विश्वाला अहिंसा आणि शांती तसेच विज्ञानवादी दृष्टिकोण देणाऱ्या दुःख मुक्तीसाठी अष्टांगिक मार्ग सांगत मानवमुक्ती घडवून आणणाऱ्या जगातील सर्वप्रथम मानसोपचार तज्ञ सृष्टीचा अर्थ लावणारे प्रत्येक गोष्टीला कारण आहे हे सिद्ध करणारे प्रथम शास्त्रज्ञ तथागत भगवान बुद्ध यांची आज जयंती.आणि विशेष म्हणजे आजच्याच दिवशी त्यांचे निर्वाण झाले.हा अनोखा योग जगात केवळ भगवान बुद्धांच्या बाबतीत घडलेला आहे.
बुद्ध आत्मा व ईश्वर वा अदृश्य कृपा नाकारतो याचे कारण विश्व निर्मित नसून उक्रांत होत आहे.असे त्यांनी मानले आणि सांगितले.बिग बँग थिअरी आताची अगदी अलिकडची पण हजारो वर्षापूर्वी या थिअरीचा जन्म बुद्धांच्या विचारात झालेला दिसतो.
बुद्धांचा धम्म हा जीवनमार्ग आहे.त्यात ज्ञानाची व्याख्या भौतिक पातळीवरून केलेली असल्यामुळे
व ती व्यावहारीकतेला अधिक नजिकची असल्याने मानवी कृतीला त्यामुळे अधिक प्राधान्य प्राप्त होते.
जीवनाचे सार शिकविणाऱ्या अशा सम्यक सम्बुद्धास अनेक धर्म आकर्षित होत आपल्याकडे खेचून घेण्यास आतुर असतील यात काही अनैसर्गिक नाही.आणि असे होत आले आहे.त्यामुळे भगवान बुद्धांना हायजॅक करण्याचे प्रयत्न शेकडो वर्षापासून सुरू आहेत.त्यातून भगवान बुद्धांना विष्णूचा अवतार घोषित करून त्यांच्या मुळ विचारांना तिलांजली देत लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचे काम काही लोक करत असतात.
आज वैशाख पौर्णिमा आजच्या दिवशी सोशल मिडियात नेहमीप्रमाणे सण उत्सवांना जसे वातावरण असते तसे उत्साही वातावरण पाहायला मिळाले. अनेकांनी आज भगवान बुद्धांच्या विचार शिकवणुकीवर पोस्ट शेअर केल्या,मंगल शुभेच्छा दिल्या.अशातच काही खोडसाळ लोकांनी हिंदू तिथी पंचांग प्रमाणे आलेल्या बुद्ध पौर्णिमेस शुभेच्छा असा उल्लेख करत पोस्ट शेअर केल्या.
यावर लोकांमध्ये किती अज्ञान आणि गैरसमज आहे हे दिसून येते.वास्तविक आजची पौर्णिमा म्हणजे चंद्राचे पूर्णाकृती रूप हे कोणत्याही धर्माशी संबंधित नाही.आणि खरतर त्या अर्थाने बौद्ध धम्माशी सुद्धा संबंधित नाही. ही पूर्णपणे एक खलोगशास्त्रीय घटना आहे.गोष्ट आहे.याचा जगातील कोणत्याही धर्माशी अर्थाअर्थी संबंध नाही.
जेव्हा चंद्र पूर्णाकृती मध्ये आपल्याला दिसतो तेव्हा ती पौर्णिमा आणि जेव्हा चंद्र दिसत नाही ती अमावस्या
अशी ढोबळ समजूत आपणच आपल्याला समजण्यासाठी करून घेतली आहे.
आता या दोन्ही घटना कशा घडतात?
तर हे आपण शालेय जीवनात असताना म्हणजेच इयत्ता पाचवी च्या वर्गात शिकलेले असतो,चंद्राची कला या नावाने
चंद्राची कला नावाचा धडा आहे.आणि त्यामध्ये या खगोलशास्त्रीय घटना आपल्याला समजून सांगण्यात आलेल्या आहेत.
अमावस्या आणि पौर्णिमा या दोन्ही मध्ये 15 दिवसांचा कालावधी असतो.
अमावास्या’ ते ‘पौर्णिमा’ या काळामध्ये पृथ्वीवरून आपणास दररोज चंद्राचा अधिकाधिक भाग प्रकाशित होताना दिसतो.
त्या आकारमानाने वाढत जाणार्या आणि त्यानंतर पुढील १५ दिवसांत लहानलहान होत जाणार्या चंद्रकोरींना चंद्राच्या कला म्हणतात.
वरील फोटो मध्ये आपण चंद्राची बदलत जाणारी स्थिती पाहू शकतो.दर दिवशी चंद्र लहान होत जातो आणि पुन्हा मोठा होत जातो. पंधरा दिवसांनी चंद्र पूर्ण मोठा होतो तेव्हा पौर्णिमा असते.आणि जेव्हा पूर्णपणे दिसेनासा होतो तेव्हा अमावस्या असते.या आकार कमी जास्त (दिसण्याच्या) होण्याच्या प्रक्रियेला चंद्रकला असे म्हणतात हा प्रश्न परीक्षेत दोन मार्कांना येवू शकतो.येतोच.नीट पाठ करा.
वर सांगितल्याप्रमाणे पौर्णिमा आणि अमावस्या ही आपल्या सोयीसाठी आपण दिलेली नावे आहेत.इतर देशात यांना वेगळं नाव आहे.इंग्रजीत यास फूल मुन आणि न्यु मुन म्हटले जाते.यावरूनच पूर्वीच्या लोकांनी कालमापन पद्धती शोधली असावी,यावरूनच कॅलेंडर आणि 30 दिवसांचा महिना याचा अंदाज बांधला गेला असावा.कारण दर पंधरा दिवसांनी हे चित्र बदलताना दिसून येते.तसे पंधरवडा तसाच धरला जात आला आहे.पृथ्वीचे अक्षभ्रमण, चंद्राचे पृथ्वीभोवतील कक्षाभ्रमण आणि पृथ्वीचे सूर्याभोवतील कक्षाभ्रमण या तीन गोष्टींवरू अनुक्रमे दिवस, महिना व वर्ष यांचे सामान्यतः कालमापन होते.हिंदू पंचांग पद्धतीत सुद्धा सूर्य, पृथ्वी व चंद्र यांच्या गतीमुळे होणारी कालाची पाच अंगे मानली जातात.परंतु त्याचा आणि (इतर कोणत्याही) धर्माचा कोणताही संबंध नाही,नसतो.हे सगळं आपण आपल्यासोयीसाठी ठरवून घेतलं आहे.
ही प्रक्रिया जगत सगळीकडे होत असते.त्यामुळे हे आमच्या धर्मात आहे असं जगातील कोणताही शहाणा माणूस म्हणू शकत नाही.
अर्थात त्याने पाचवीच्या वर्गात जर विज्ञान हा विषय अभ्यासला असेल.
यावरून हे स्पष्ट आहे की बुद्ध पौर्णिमा आणि हिंदू तिथी पंचांग यांचा काहीही संबंध नाही.
-
टीम जागल्या भारत
हेही वाचा.. सिद्धार्थ गौतम यशोधरेला सोडून गेला होता का ?
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published on MAY 26, 2021 19: 54 PM
WebTitle – Does Buddha Pournima related to Hindu Tithi Panchanga? 2021-05-26