उत्तर प्रदेशमध्ये एकदा पुन्हा मानवतेची लाज निघाली आहे. कानपूरच्या नानामऊ घाटावर शनिवारी सकाळी गंगेत स्नान करण्यासाठी गेलेले आरोग्य विभागाचे डिप्टी डायरेक्टर अचानक गायब झाले. ते बुडत असताना, त्यांच्या मित्रांनी पाणबुडे (गोताखोरांकडून) मदत मागितली. मात्र, उपस्थित पाणबुड्यांनी त्यांना शोधून काढण्यासाठी त्यांच्या मित्रांकडून पैसे मागितले. मित्रांनी पाणबुड्यांना 10 हजार रुपये दिले. पैसे मिळाल्यावर पाणबुडे स्टीमर घेऊन गंगेत शोधासाठी उतरले, परंतु तोपर्यंत आरोग्य विभागाचे डिप्टी डायरेक्टर गंगेत गायब झाले होते. त्यांची ओळख पटल्यानंतर पोलीस विभागात खळबळ उडाली. पोलिस अधिकार्यांच्या म्हणण्यानुसार, पाणबुडे आणि SDRF टीम त्यांचा शोध घेत आहेत, परंतु अद्याप काही शोध लागलेला नाही. डिप्टी डायरेक्टर वाराणसीमध्ये तैनात होते आणि उन्नावचे रहिवासी होते.
वॉलेट अॅपच्या माध्यमातून त्यांना पैसे ट्रान्सफर करण्यात आले.. पण…
उन्नावच्या बेहटा मुजावर पोलीस ठाण्याच्या क्षेत्रातील कबीरपुर खंभौली गावातील 45 वर्षीय आदित्य वर्धन सिंह हे आरोग्य विभागात डिप्टी डायरेक्टर म्हणून कार्यरत आहेत आणि वाराणसीमध्ये तैनात आहेत. शनिवारी सकाळी ते आपल्या मित्रांसोबत, इंदिरा नगर लखनऊचे रहिवासी प्रदीप तिवारी आणि पतासिया बांगरमऊ उन्नावचे रहिवासी योगेश्वर मिश्रा यांच्यासह बिल्हौरच्या नानामऊ घाटावर गंगेत स्नान करण्यासाठी गेले होते. आदित्य वर्धन सिंह गंगेत उतरले, परंतु जोरदार प्रवाह आणि पाण्यातील भोवऱ्यामुळे ते बुडू लागले. त्यांच्या मित्रांचा आरोप आहे की, तेथे काही पाणबुडे (गोताखोर) उपस्थित होते. जेव्हा त्यांच्याकडे मदतीसाठी विनंती केली, तेव्हा त्यांनी आधी दहा हजार रुपयांची मागणी केली. वॉलेट अॅपच्या माध्यमातून त्यांना पैसे ट्रान्सफर करण्यात आले. त्यानंतर त्यांनी स्टीमरने शोध सुरू केला, परंतु तोपर्यंत उशिर झाला होता.आदित्य वर्धन सिंह गंगेच्या प्रवाहात गायब झाले होते.
चुलत भाऊ बिहारमध्ये सीनियर IAS अधिकारी आणि पत्नी जज
आदित्य वर्धन सिंह यांचे मित्र प्रदीप आणि योगेश्वर यांनी सांगितले की, त्यांची पत्नी शैलजा मिश्रा महाराष्ट्रात जज आहेत.
त्यांची 12 वर्षीय मुलगी आहे, जी आपल्या आईसोबत महाराष्ट्रात राहते.
आदित्य यांचे चुलत भाऊ अनुपम सिंह बिहार सरकारमध्ये वरिष्ठ IAS अधिकारी आहेत आणि नीतीश कुमार यांचे सचिव आहेत.
पोलिसांनी पैसे परत मिळवून दिले
आदित्य वर्धन सिंह यांचे मित्र प्रदीप यांनी सांगितले की, त्यांनी एका गोताखोराला दहा हजार रुपये ट्रान्सफर केले होते.
मात्र, दुपारनंतर ही माहिती पसरल्यावर, तेथे उपस्थित पोलिसांनी तत्काळ सक्रिय होऊन गोताखोरांकडून पैसे परत मिळवले.
डीसीपी वेस्ट राजेश कुमार सिंह यांनी सांगितले की, आदित्य वर्धन सिंह हे आरोग्य विभागात डिप्टी डायरेक्टर आहेत. ते गंगेत स्नान करण्यासाठी गेले होते. तेथे उपस्थित लोकांनी त्यांना पाण्याची खोली अधिक असल्याचे सांगितले होते, परंतु त्यांनी आणि त्यांच्या मित्रांनी पोहण्याचे कौशल्य असल्याचे सांगितले. एसडीआरएफ आणि गोताखोरांच्या टीमने प्रयत्न केले, परंतु ते अद्याप सापडले नाहीत. रविवारी सकाळपासून पुन्हा शोधमोहीम सुरू करण्यात येईल.
आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on AUG 31,2024 | 21:28 PM
WebTitle – Deputy Director of Health Department Aditya Vardhan Singh drowned while going for Ganga bath