मुंबई : कायम वादग्रस्त वक्तव्य करून चर्चेत राहणारी बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य करून चर्चेत आली आहे.यावेळी तीने भारताच्या स्वातंत्र्याबद्दल कथित अपमानजनक वादग्रस्त वक्तव्य करून देशासाठी शहीद झालेल्या शेकडो स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाचा अपमान केला आहे.यामुळे सोशल मिडियात त्याविरोधात प्रचंड संताप व्यक्त केला जात असून अनेकांनी तक्रार दाखल करण्याची मागणी केली आहे.आपच्या मुंबई प्रभारी प्रीती मेनन यांनी विधानाची दखल घेत 504, 505 व 124 A या कलमाखाली देशद्रोहाचा गुन्हा नोंदवण्याची मागणी मुबई पोलिसांकडे केली आहे.
काय म्हणाली कंगना राणावत ?
“ते स्वातंत्र्य नव्हतं तर भीक होती आणि जे स्वातंत्र्य मिळालं आहे, ते 2014 मध्ये मिळालं आहे,” असं वादग्रस्त वक्तव्य टाइम्स नाऊ या वृत्त वाहिनीतील कार्यक्रमात कंगना राननौत म्हटलं आहे. यावेळी टाइम्स नाऊ च्या संपादक नाविका कुमार या मुलाखत घेत होत्या,आश्चर्य म्हणजे नाविका कुमार यांनीही या वक्तव्यावर आक्षेप घेतला नाही. मात्र, त्यावर “तुम्हाला लोक भगवा समजतात” असं त्या म्हणाल्या.
कंगना रानौत चा व्हिडिओ – वेळ वाचण्यासाठी 26:00 मिनिटापासून पाहा
हे वक्तव्य केल्यानंतर कंगना स्वत: म्हणते की “माझ्यावर आता दहा तक्रारी दाखल होतील,
यावरून असे वाटते की तीने हे वक्तव्य जाणीवपूर्वक याचसाठी केलेलं आहे.
आपच्या मुंबई प्रभारी प्रीती मेनन यांनी विधानाची दखल घेत 504, 505 व 124 A
या कलमाखाली कंगना राणावत हिच्यावर देशद्रोहाचा गुन्हा नोंदवण्याची मागणी मुबई पोलिसांकडे केली आहे.
कंगना राणौतवर तिच्या देशद्रोही आणि प्रक्षोभक विधानांसाठी कलम 504, 505 आणि 124A अंतर्गत मुंबई पोलिसांकडे कारवाईची विनंती केली आहे.काही कृती दिसेल अशी आशा आहे. असं ट्विट प्रीती मेनन यांनी केले आहे.
या अगोदरही कंगनावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला आहे
हिंदू आणि मुस्लिम समाजात धार्मिक तेढ निर्माण करत असल्याचा आरोप लावून
तिच्या विरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश खुद्द कोर्टाने दिले होते.
कलम 124 अ, 153 अ, 295 अ, 34 या अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तसेच तिच्यासोबत तिची बहीण रंगोलीच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला होता.

कंगनावर गुन्हा दाखल दाखल करण्याची मागणी करणाऱ्या व्यक्तीने कोर्टासमोर पुरावे म्हणून कंगना रनौतचे सर्व ट्वीट्स आणि व्हिडीओ सादर केले होते. ज्यामध्ये तीने हिंदू आणि मुस्लिम समुदायत तेढ निर्माण करणाऱ्या गोष्टी केल्या होत्या. त्यानंतर कोर्टाने कलम 156 (3) अंतर्गत कंगना विरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश मुंबई पोलिसांना दिले होते.मात्र पुढे काय कारवाई झाली याबाबत माहिती मिळू शकली नाही.
समीर वानखेडे ला बॉलिवूडवर हल्ला करायला आवडतं – अनुराग कश्यप
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published by Team Jaaglya Bharat on NOV 11, 2021 20: 54 PM
WebTitle – Demand for filing of treason case against Kangana Ranaut