मुंबई: सुप्रसिद्ध सिनेअभिनेता शाहरुख खान चा मुलगा आर्यन खान याला गोवण्यात आलेल्या ड्रग्ज-ऑन-क्रूझ प्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) चे स्वतंत्र साक्षीदार प्रभाकर साईल (३७) हे त्यांच्या चेंबूर उपनगरातील राहत्या घरी शुक्रवारी चार वाजण्याच्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने मरण पावले, पोलिसांनी शनिवारी ही माहिती दिली.साक्षीदाराचा मृत्यू झाल्याने सर्वत्र खळबळ उडालीय.
प्रभाकर साईल यांनी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले होते
एनसीबी कडून क्रूझवर जी रेड टाकण्यात आली त्यात पंच क्रमांक 1 म्हणून प्रभाकर साईल याचं नाव आहे.त्यांनी यावर जे खुलासे केले होते. त्यामुळे या प्रकरणाला वेगळीच कलाटणी मिळाली होती. प्रभाकर साईल यांच्या आरोपानुसार त्यांची या प्रकरणात पंच म्हणून सही घेतली होती.मात्र तो कागद ब्लँक म्हणजे कोरा होता.समीर साळेकर नावाचे समीर वानखडे यांचे एक सहकारी आहेत त्यांनी काही पेपर देऊन त्यावर सही करण्यास सांगितले,जेव्हा समीर वानखेडे आले तेव्हा तेही म्हणाले की “अरे फटाफट सही घ्या याची”.तेव्हा प्रभाकर म्हणाला “सर पेपर सर्व ब्लॅंक आहेत,” तर तेव्हा ते “दोघेही म्हणाले तू सही कर काही होत नाही” अशा एकूण नऊ ते दहा कोऱ्या पेपरवर पंच म्हणून सही घेण्यात आली होती.रेडच्या दिवशी किरण गोसावीने प्रभाकर साईल याना यलो गेटला बोलवलं होतं तिथं थोडं खाण्यापिण्याचं सामान घेतलं आणि क्रूझच्या गेटवर पोहोचलो,त्यावेळी त्यानी किरण गोसावीला फोनवर बोलताना ऐकलं.साईल ने गंभीर गौप्यस्फोट केलाय की, माझ्या जीवाला धोका होता म्हणून मी माझ्या परिचिताकडे सोलापूरला 10-12 दिवस राहिलो.
आर्यन खान प्रकरणात 18 कोटींची डील
हे प्रकरण दाबण्यासाठी 18 कोटींची डील झाल्याचा धक्कादायक खुलासा करणारा व्हिडीओ सोशल मिडियात व्हायरल झाला आहे.के.पी गोसावीचा बॉडीगार्ड प्रभाकर साईल याने हा व्हिडीओ व्हायरल करून प्रकरण दाबण्यासाठी 18 कोटींची डील झाली होती आणि त्यातले 8 कोटी वानखेडेंना दिले जाणार होते असा गंभीर आरोप केला आहे.
25 कोटीचा बॉन्ड टाकून 18 वर फायनल करायचं त्यातील 8 कोटी वानखेडे यांना
आणि बाकीचे 10 आमच्यात वाटणी होणार होती,असा धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे.
केपी गोसावीच्या सांगण्यावरून साईलने 50 लाख रुपये कलेक्ट केल्याचा खुलासा देखिल केला आहे
या 50 लाखांतले 38 लाख रुपये सॅम डीसोझाला दिल्याचा दावा देखील व्हिडिओमध्ये केला गेला आहे.
एवढंच नाही तर क्रुझवरील छापेमारीनंतर दोन शाहरुख खान ची मॅनेजर पूजा ददलानी, के पी गोसावी
आणि सॅम डीसोझा यांच्यात निळ्या रंगाच्या मर्सिडीज कारमध्ये 15 मिनिटं चर्चा झाल्याचा दावा प्रभाकरने केला आहे.
पण हे सर्व आरोप समीर वानखेडे यांनी फेटाळले आहेत. या प्रकरणी वानखेडे परिपत्रक जारी करणार आहेत.
प्रभाकर साईल आणि किरण गोसावी यांची त्याच वर्षी झाली भेट
प्रभाकर साईल हा बॉडीगार्डचं काम करत होता,मात्र अलिकडे तो बेरोजगार होता.
त्याच्या ओळखीच्या माणसाने किरण गोसावीचा नंबर दिला त्यांना बॉडीगार्डची गरज आहे,बोलून बघ.
प्रभाकरने 21 जुलै च्या रात्री फोन केला आणि 22 जुलै पासून तो कामावर रुजू झाला.
प्रभाकर साईल यांच्या मृत्यू चं नेमकं कारण काय?
आर्यन खान प्रकरणात प्रभाकर साईल यांच्या साक्षीने खळबळ उडाली होती.याप्रकरणाला कलाटणी मिळाली होती.नार्कोटिक्सचा साक्षीदारच उलटल्याने आणि त्याने तपास प्रमुख समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात होते.आता याच साक्षीदाराचा मृत्यू झाल्याने खळबळ उडालीय.
प्रभाकर साईल यांचा मृत्यू शुक्रवारी संध्याकाळी चार वाजता ह्रदयविकाराच्या झटक्याने राहत्या घरी झाला.हा मृत्यू नैसर्गिकरित्या झाला असल्याची माहिती प्रभाकर साईल यांचे वकील तुषार खंदारे यांनी जागल्याभारत शी बोलताना दिली.प्रभाकर साईल हे चेंबूर येथे भाड्याने राहत होते.मुंबईत त्यांचे स्वतःचे असे घर नाही.त्यांची आई अंधेरी परिसरात राहायला असून त्याच भागात त्यांच्या पार्थिवावर अंतिमसंस्कार केले जातील अशी माहिती मिळत आहे.
इतर वाचनीय लेख/अपडेट्स
द काश्मिर फाईल्स:भाजप देशाचे वातावरण बिघडवत आहे:शरद पवार
Bank frauds in india मागील सात वर्षात सर्वात मोठा घोटाळा
प्रधानमंत्री मोदी यांचे कौतुक केल्यानंतर राष्ट्रवादी च्या नेत्यांचा यु-टर्न
काश्मीर फाईल्स:तेव्हा कुणीही अश्रू देखील ढाळले नाहीत-उद्धव ठाकरे
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published by Team Jaaglya Bharat on APR 02, 2022 12:23 PM
WebTitle – Death of Aryan Khan case witness who accused Sameer Wankhede