अजमेर: अजमेर जिल्ह्यातील नसीराबाद तालुक्यातील लवेरा गावात एका दलित वराच्या बारातीमुळे पुन्हा एकदा वाद निर्माण झाला. या घटनेने सोशल मीडियावरही लोकांचे लक्ष वेधले आहे. येथे एका दलित कुटुंबाने आपल्या मुलीच्या लग्नासाठी पोलिस संरक्षणाची मागणी केली होती. कुटुंबीयांना भीती होती की, घोडीवरून वर येण्यावरून गावात वाद होऊ शकतो. या कारणास्तव पोलिस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी गावात चोख बंदोबस्त केला. या सुरक्षिततेच्या व्यवस्थेमुळे कोणत्याही वादाशिवाय घोडीवरून बारात निघाली आणि विवाह समारंभ शांततेत पार पडला.

सोशल मीडियावर उमटल्या तीव्र प्रतिक्रिया
ही घटना समोर येताच सोशल मीडियावरही लोकांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या. अनेकांनी 21 व्या शतकातही अशा प्रकारच्या घटनांवर तीव्र निंदा केली. एका यूजर एडवोकेट एम.एल. मरमत यांनी लिहिले, “माझा भारत या पद्धतीने विश्वगुरू बनेल का? देशात अजूनही दलित आणि आदिवासी शोषित आहेत. हद्द म्हणजे वराची वरात काढण्यासाठी वऱ्हाडी लोकांपेक्षा पोलिस अधिक होते.”
माहितीनुसार, या लग्नात 25 वऱ्हाडी , 30 घराती आणि तब्बल 75 पोलिस कर्मचारी उपस्थित होते, असा दावा काही लोकांनी केला आहे.
दलित दूल्हे की शादी….बाराती से ज्यादा पहुंचे पुलिस वाले, पर क्यों?
— Rajasthan First (@Rajasthanfirst_) January 22, 2025
अजमेर के श्रीनगर निवाली दलित समाज के विजय रैगर ने अपनी शादी की बारात घोड़ी पर बैठकर निकाली. शादी की पूरी रस्म के दौरान भारी संख्या में पुलिस तैनात रही.
बता दें कि 20 साल पहले घोड़े पर दलित युवक की बारात… pic.twitter.com/p0lsBb7k18
दलित कुटुंबाला नेमकी भीती कशाची होती?
अजमेर येथील लवेरा गावात यापूर्वीही दलित समाजातील एका वराला घोडीवरून जबरदस्तीने खाली उतरवण्यात आले होते.
या घटनेत मोठा वाद झाला होता.या पूर्वीच्या घटनेचा अनुभव पाहता कुटुंबाने पोलिस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे लेखी स्वरूपात विनंती पत्र दिले होते.
प्रार्थना पत्रात नेमके काय म्हटले होते?
नसीराबादजवळील लवेरा गावातील रहिवासी नारायण खोरवाल यांनी उपविभागीय अधिकारी (एसडीओ) देवीलाल यादव यांना पत्र लिहून संरक्षणाची विनंती केली होती. या पत्रात त्यांनी नमूद केले की, त्यांची मुलगी अरुणा हिचा विवाह श्रीनगरचे विजय या तरुणाशी 21 जानेवारीला होणार आहे. वरात काढताना वाद होण्याची शक्यता असल्याने सुरक्षा पुरवावी, अशी मागणी त्यांनी केली.

वरात सुरक्षितपणे पार पडली
श्रीनगरहून विजय यांची बारात लवेरा गावात पोहोचली. कडक सुरक्षा व्यवस्थेमुळे घोडीवरून कोणत्याही अडथळ्याविना वरात काढण्यात आली. विवाह समारंभ शांततेत पार पडला. या वेळी उपविभागीय अधिकारी देवीलाल यादव, तहसीलदार ममता यादव, अतिरिक्त एसपी डॉ. दीपक कुमार, डीएसपी जरनैल सिंह यांच्यासह जवळच्या अनेक पोलिस ठाण्यांचे पोलिस अधिकारी आणि कर्मचारी तैनात होते.

20 वर्षांपूर्वीची जखम पुन्हा उघडली
विवाह समारंभ संध्याकाळी शांततेत पार पडल्यावर सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.
गावातील काही मान्यवरांनी अधिकाऱ्यांना सांगितले की, त्यांच्या वतीने कोणत्याही प्रकारचा विरोध केला गेला नाही.
परंतु वधूचे वडील नारायण खोरवाल यांनी सांगितले की,
20 वर्षांपूर्वी त्यांच्या बहिणीच्या लग्नात वराने घोडीवर चढण्यावरून वाद झाला होता.
त्यावेळी या प्रकरणामुळे कुटुंबाला मोठ्या अपमानास सामोरे जावे लागले होते.
सध्या गावात शांतता वातावरण आहे. या घटनेने पुन्हा एकदा समाजातील विषमतेवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे.
Support Jaaglyabharat.com, – Your Small Contribution, A Big Step Towards Change!
जागल्याभारत अतिशय कमी रिसोर्स मध्ये काम करत आहे. दुसरीकडे बलाढ्य मेनस्ट्रिम मिडिया (प्रसार माध्यमे) जी सातत्याने फेक न्यूज चालवत असतात,आणि शोषित वंचित समाजाचे प्रश्न दाबत असतात.त्यामुळे आपल्या मिडियाला बळ दिले पाहिजे.
At Jaaglyabharat.com, we’re committed to bringing you accurate, insightful news that you can trust. By making a small contribution, you help us continue delivering high-quality content, expanding our reach, and staying independent. Every bit of support keeps the news accessible and empowers us to do more.
Thank you for standing with us!
आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on JAN 23,2024 | 13:48 PM
WebTitle – Dalit Groom’s Wedding in Ajmer Sparks Social Media Buzz: 7 Pheras Amid Security
#DalitGroom #AjmerWedding #SocialEquality #IndianSociety #DalitRights #PoliceProtection