राजस्थान: राजस्थानातील लाजिरवाणी जातीय भेदभावाची कहाणी नुकत्याच काही राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या. यात महाराष्ट्राच्या देखील होत्या,आणि त्यामध्ये “बटेंगे तो कटेंगे” ही भाजपाकडून प्रचाराची टॅग लाइन खूपच वादग्रस्त ठरली, याला उत्तर म्हणून एक है तो सेफ है नारेही प्रचारात आले,पण भारतामध्ये समाजातील जातीय भेदभावाची दरी अद्याप मिटलेली नाही, आणि त्याचे एक ताजे उदाहरण राजस्थानच्या खैरथल-भिवाडी येथून समोर आले आहे. येथे दोन गावच्या पोलीस ठाण्यांच्या आणि CID टीमच्या मदतीनंतरच एका दलित वधू वर यांना घोड्यावरून वरात काढता आली.दलित वर लग्नाच्या वरातीत घोड्यावर बसून जात असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये वर पक्षासोबत पोलीस कर्मचारीही उपस्थित असल्याचे दिसते.हा व्हिडिओ अन बातमी आता मोठ्याप्रमाणात व्हायरल होत असून लोक सोशल मिडियात चर्चा करायला लागले आहेत.
खैरथल-भिवाडीतील लाहडोद गावात पहिल्यांदाच दलित वर घोड्यावर बसला
मिळालेल्या माहितीनुसार, लाहडोद गावातील आशीष (23 वर्षे) या दलित युवकाचे काल लग्न झाले. या गावातील कोणत्याही दलिताने आजपर्यंत लग्नात घोड्यावर बसण्याचे धाडस केले नव्हते. मात्र, आशीषने ही परंपरा मोडण्याचा निर्धार केला. आशीषच्या या निर्णयामुळे त्याच्या कुटुंबाला भीती वाटत होती. त्यामुळे त्यांनी पोलीस संरक्षणाची मदत घेतली.राजस्थानच्या खैरथल-भिवाडी मधिल दोन गावच्या पोलीस ठाण्यांच्या आणि CID टीमच्या मदतीनंतरच एका दलित वधू वर यांना घोड्यावरून वरात काढता आली.
बिघडलेल्या परिस्थितीमुळे पोलीस आणि CID सतर्क
जातीय भेदभावाच्या दडपशाहीमुळे आशीष आणि त्याचे कुटुंब या परंपरेला आव्हान देऊ इच्छित होते. मात्र, त्यांना भीती होती की गावातील काही विशिष्ट लोक याला विरोध करतील. परिणामी, त्यांनी कोटकासिम पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. यानंतर, कोटकासिम आणि किशनगडबास पोलीस ठाण्याचे अधिकारी जितेंद्र सिंग आणि भिवाडी CID इंचार्ज प्रीती राठोड यांनी मोठ्या पोलीस फौजेच्या मदतीने गावात सुरक्षा पुरवली. या कडेकोट सुरक्षेमुळे वधूवराची लग्नाची वरात शांततेत पार पडली.
समानतेसाठी घेतलेले महत्त्वाचे पाऊल
आशीषच्या कुटुंबाने सांगितले की, हा निर्णय केवळ त्यांच्यासाठी नाही, तर समाजात समानता आणि सन्मान प्रस्थापित करण्यासाठी होता. या प्रक्रियेत पोलीस सहकार्य खूपच महत्त्वाचे ठरले. पोलिस ठाण्याचे धिकारी नंदलाल जांगिड यांनी सांगितले की, दोन दिवसांपूर्वी तक्रार मिळाली होती. तक्रार मिळताच आम्ही तात्काळ कारवाई केली आणि वधूवराच्या लग्नाच्या वरात कोणत्याही अडथळ्याशिवाय पार पाडली जाईल याची खात्री केली.
बहिणीच्या लग्नात वधूवराला पायी यावे लागले होते
मिळालेल्या माहितीनुसार, या गावात पहिल्यांदाच हे दोघे वधूवर स्वत:च्या लग्नात घोड्यावर बसले होते. काही वर्षांपूर्वी आशीषच्या बहिणीच्या लग्नात, वधू वरास गावातील जात दांडग्या लोकांच्या भीतीमुळे गावात पायी यावे लागले होते. तेव्हापासून आशीषने ठरवले की, तो स्वतःच्या लग्नात घोड्यावर बसणार. मात्र, त्याला भीती होती की, त्यामुळे वाद निर्माण होऊ शकतो. यासाठी त्याने कोटकासिम पोलीस ठाण्याला सुरक्षेसाठी अर्ज दिला.
बदलाची हवा आणि जातीय अडथळ्यांचा शेवट
राजस्थानातील अनेक गावांमध्ये अद्याप दलितांना त्यांच्या अधिकारांपासून वंचित ठेवले जाते. मात्र, आता बदलाची सुरुवात दिसून येत आहे.
काही दिवसांपूर्वी बाडमेर आणि अजमेर येथेही अशी एक घटना घडली. बाडमेरमध्ये दलित मुलीचे लग्न ठाकूर कुटुंबाच्या अंगणात झाले होते.
अजमेरमध्येही राजपूत समाजाने स्वतःहून दलित वधूवराला घोड्यावर बसवून वरात काढून समाजासमोर एक आदर्श उदाहरण सादर केले.
मात्र,अजूनही काही ठिकाणी बुरसटलेल्या मानसिकतेचे लोक आहेत.त्यांचे भय असल्याने पोलिसांची मदत घ्यावी लागते.
हे चित्रं केव्हा बदलणार मित्रहो?
हे ही वाचा..दलित नवरदेव घोडी वर वरात; जातीयवाद्यांनी केली मारहाण
हेही वाचा भारताच्या दलित सैनिक च्या वरातीवर जातीयवाद्यांकडून दगडफेक
Support Jaaglyabharat.com
At Jaaglyabharat.com, we’re committed to bringing you accurate, insightful news that you can trust. By making a small contribution, you help us continue delivering high-quality content, expanding our reach, and staying independent. Every bit of support keeps the news accessible and empowers us to do more.
Thank you for standing with us!
आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on NOV 22,2024 | 21:55 PM
WebTitle – dalit-groom-horse-ride-row-rajasthan-police-protection