गेल्या वर्षभरापासून कोरोनाने संपूर्ण जगभरात थैमान घातले आहे. या कोरोनामुळे अनेक लोकाना आपले प्राण गमवावे लागले आहेत.गरीब,सामान्य आणि प्रसिद्ध व्यक्तींना सुद्धा यामुळे प्राण गमवावे लागले आहेत.
आफ्रिका खंडातील देश असेलल्या इस्वाटिनीच्या पंतप्रधान एम्बरोसे डालामिनी यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. एम्बरोसे डालामिनी यांना महिनाभरापूर्वी कोरोनाची बाधा झाली होती. ५२ वर्षीय डलामिनी यांच्यावर दक्षिण आफ्रिकेतील एका रुग्णालयात उपचार सुरू होते.
इस्वाटिनीमध्ये राजेशाही शासनव्यवस्था आहे. रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार तेथील सरकारने रविवारी रात्री आपल्या पंतप्रधानांच्या मृत्यूची अधिकृत घोषणा केली आहे.
इस्वाटिनी हा आफ्रिका खंडातील छोटा देश आहे. हा देश दक्षिण आफ्रिकेने वेढलेला आहे. सुमारे १२ लाख लोकसंख्या असलेल्या या देशात आतापर्यंत सहा हजार ७६८ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला असून, १२७ जणांचा मृत्यू झाला आहे.
Video: कोरोनावर मात करण्यासाठी दोन पऱ्या ; धक्काबुक्की गर्दी
देशभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे.त्यातच काही लोक लोकांच्या भीती आणि अज्ञानाचा फायदा घेऊन लूटमार करत आहेत. फसवणूक करत आहेत.कुणी आपलं जडीबुटी प्रॉडक्ट विकत आहे.कुणी वेगवेगळ्या औषधांच्या नावाखाली लोकांना फसवत आहेत.कोरोनावर मात करण्यासाठी दोन पऱ्या प्रकट?
अशातच मध्यप्रदेशातील जुनगड येथे राजगड जिल्ह्यामध्ये कोरोनावर मात करण्यासंदर्भातील
एका अफवेमुळे शेकडो लोकांनी मंदिरात गर्दी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
कोरोनावर मात करण्यासाठी मंदिरात दोन पऱ्या आल्या असून
त्यांनी दिलेलं पाणी प्यायल्याने कोरोनाचा आजार होत नाही अशी अफवा पसरवली गेली.
त्यानंतर मुख्य जिल्हा कार्यालयापासून १५ किमी अंतरावर असणाऱ्या चाटूखेडामधील मंदिराबाहेर
शेकडोच्या संख्येने आजूबाजूच्या गावातील लोक जमा झाले.
कोरोना रुग्ण मृत्यू संख्या आकडेवारी लपविण्यात येत नाही
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)