सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांचा कार्यकाल २३ एप्रिल रोजी संपत असून, देशाच्या नवीन सरन्यायाधीश नियुक्तीची प्रक्रिया सुरू झाली आहे. केंद्र सरकारकडून सरन्यायाधीश पदासाठी नवीन नाव मागविण्यात आलं होतं. त्यानंतर सरन्यायाधाश बोबडे यांनी उत्तराधिकारी भारताचे नवे सर न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती एन.व्ही. रमण यांच्या नावाची केंद्राकडे शिफारस केली आहे.
कोण आहेत एन.व्ही. रमण ?
६४ वर्षीय न्यायमूर्ती एन.व्ही. रमण हे सध्या आंध्र प्रदेशात उच्च न्यायालयात क्रमांक 2 चे न्यायमूर्ती आहेत.त्यांनी १० फेब्रुवारी १९८३ पासून आपल्याला वकिलीला सुरूवात केली. न्यायमूर्ती रमण यांनी यांचं बी.एस्सी, बी.एल. शिक्षण झालेलं असून, संविधान आणि फौजदारी आणि आंतरराज्य नदी कायद्यांमध्ये त्यांनी स्पेशलायझेशन केलेलं आहे. सरन्यायाधाश बोबडे यांनी उत्तराधिकारी भारताचे नवे सर न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती एन.व्ही. रमण यांच्या नावाची केंद्राकडे शिफारस केली आहे.
न्यायमूर्ती एन.व्ही. रमण यांच्यावर नियुक्ती अगोदरच गंभीर आरोप
न्यायमूर्ती एन.व्ही. रमण यांच्यावर सरन्यायाधीश पदाची जबाबदारी येण्याअगोदरच ते वादात सापडले आहेत.आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. सर्वोच्च न्यायालयात तक्रार दाखल केली आहे.मात्र सर्वोच्च न्यायालयाने ही तक्रार फेटाळून लावली.
तक्रारीत काय म्हटले आहे?
आंध्रच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की न्यायमूर्ती एन. व्ही. रामणा राज्य सरकारविरोधात प्रतिकूल आदेश मंजूर करण्याच्या दृष्टीने राजकीयदृष्ट्या संवेदनशील प्रकरणांमध्ये आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांवर प्रभाव पाडत सरकार अस्थिर करत असल्याचा गंभीर आरोप आहे.
सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
अंतर्गत कामकाजाची प्रक्रिया अत्यंत गोपनीय असून ती जाहीर (पब्लिक) करता येत नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निवेदनात म्हटले आहे.
हिंदू स्त्रियांच्या मालमत्ता संदर्भात ; हिंदू कोड बिलाची पार्श्वभूमी भाग 2
पुरग्रस्त विद्यार्थ्यांना मदतीचा हात; शालेय वस्तूंचे वाटप
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published on March 24, 2021, 17:50 PM
WebTitle – Cji Bobde Recommends Justice Nv Ramana As His Successor 2021-03-24