मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आज एच एन रिलायन्स रूग्णालयात दाखल होणार आहेत.पाठीचं आणि मानेचं दुःखण डोकं वर काढत असल्यामुळे डॉक्टरांनी रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला.दाखल होण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या जनतेशी परिपत्रकाद्वारे संवाद साधला आहे.

“माझ्या बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो, जय महाराष्ट्र ! गेल्या सुमारे दोन वर्षांपासून आपण कोविडचा मुकाबला करतो आहोत. एकीकडे या विषाणूशी लढाई सुरू असतांना दुसरीकडं आपलं जीवनचक्र सुरू राहावं, राज्यातली विकास कामं सुरूच राहावीत म्हणून आम्ही सगळे कुठेही न थांबता सातत्यानं प्रयत्न करतोय. मान देखील वर करायला वेळ मिळत नव्हता, साहजिकच माझ्या मानेच्या दुखण्याकडे नाही म्हणलं तरी थोडंसं दुर्लक्ष झालं आणि मानेवर जो परिणाम व्हायचा तो झालाच ! पण या दुखण्यावर व्यवस्थित उपचार व्हावेत यादृष्टीनं डॉक्टरांनी सल्ला दिल्यावरून मी आज रुग्णालयात दाखल होणार असून दोन तीन दिवस तिथेच राहून योग्य ते उपचार घेणार आहे.
आपले आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत, त्यामुळं लवकरच तब्येत बरी होईल अशी खात्री आहे.
यानिमित्ताने एकच सांगायचं आहे. कोरोना लसींच्या बाबतीत आपण १० कोटींचा टप्पा ओलांडला असला तरी
आपल्याला सर्वांना लसींचे दोन डोस घेणे अतिशय महत्वाचे आहे.
आपल्या जीवनाला सुरक्षित ठेवण्यासाठी लगेचच जवळच्या केंद्रावर जाऊन लस घ्या एवढीच विनंती करतो “,
आपला नम्र….
उद्धव बाळासाहेब ठाकरे
काही दिवसांपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर घरगुती उपचार सुरू होते. त्यांच्या तब्येतीत सुधारणा देखील झाली मात्र पुन्हा एकदा मान आणि पाठ दुखीचा त्रास होऊ नये यासाठी डॉक्टरांनी रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला आहे.
राज्य माफियांच्या हाती,अनिल देशमुखांनी माफीचा साक्षिदार व्हावं-प्रकाश आंबेडकर
“जय भीम” फिल्म पाहिल्यानंतर अभिनेत्याने “पार्वती” साठी घर देण्याचे ठरवले
समीर वानखेडे ला बॉलिवूडवर हल्ला करायला आवडतं – अनुराग कश्यप
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published by Team Jaaglya Bharat on NOV 10, 2021 22:54 PM
WebTitle – Chief Minister Uddhav Thackeray will be admitted to the hospital today, he said your blessings are with me