मुंबई: महाराष्ट्राच्या राजधानी मुंबईतील चेंबूरमधील एका दुकानात भीषण आग लागल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेत 7 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हा प्रकार चेंबूरच्या सिद्धार्थ कॉलनीत घडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे ग्राउंड प्लस 1चे बांधकाम होते, ज्यामध्ये लोक राहत होते. खाली दुकान होते आणि वर लोक राहत होते.

मुंबई : चेंबूरमधील दुकानात भीषण आग, 2 मुलांसह 7 जण जळून मृत्युमुखी
याबाबत अग्निशमन दलाने सांगितले की ही घटना आज सकाळी 5 वाजून 20 मिनिटांनी चेंबूरमधील सिद्धार्थ कॉलनीत घडली. असं सांगण्यात येत आहे की तीन मजली इमारतीच्या ग्राउंड फ्लोरचा वापर हा दुकानासाठी केला जात होता, तर वरचा मजला निवासी वापरासाठी होता.
प्राथमिक तपासात असे समजते की, आग ग्राउंड फ्लोरवरील दुकानात असलेल्या विजेच्या तारांमध्ये आणि अन्य उपकरणांमध्ये लागली आणि नंतर ती वरच्या मजल्यावर पसरली. या घटनेत 7 जण जखमी झाले. त्यांना तातडीने राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. आतापर्यंत 5 मृतांची ओळख पटली आहे – पारिस गुप्ता (7), मंजू प्रेम गुप्ता (30), अनीता गुप्ता (39), प्रेम गुप्ता (30) आणि नरेंद्र गुप्ता (10) अशी त्यांची नाव असून आग नेमकी कशामुळे लागली अद्याप समजू शकलेलं नाही.
याबाबत डीसीपी हेमराज सिंह राजपूत यांनी सांगितले, “सकाळी 6 वाजता आम्हाला माहिती मिळाली… या आगीत 7 जणांचा मृत्यू झाला आहे… आग कशी लागली याचे कारण शोधण्याचे काम सुरू आहे… आमची (पोलीस) आणि अग्निशमनची टीम या प्रकरणाची चौकशी करत आहे, त्यानंतरच नेमके कारण सांगता येईल…”
दुसऱ्या एका घटनेत मुंबईतील ‘भारत इंडस्ट्रियल इस्टेट’ येथे आगीची घटना
उल्लेखनीय आहे की, दुसऱ्या एका घटनेत मुंबईतील ‘भारत इंडस्ट्रियल इस्टेट’ इमारतीतही मागील शनिवारी रात्री भीषण आग लागली होती.
या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही, मात्र आग विझवण्यात यश आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मागील शनिवारी रात्री 10 वाजून 21 मिनिटांनी सेवरी परिसरातील पाच मजली ‘भारत इंडस्ट्रियल इस्टेट’ इमारतीत आग लागली.
ही ‘लेव्हल-2’ ची आग होती, ज्यात इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर असलेल्या दोन दुकाने जळून खाक झाली.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या, पाण्याचे टँकर, ॲम्ब्युलन्स आणि अन्य मदत घटनास्थळी पाठवण्यात आली.
या आगीवर शनिवारी रात्री 1 वाजून 57 मिनिटांनी नियंत्रण मिळवण्यात आले. येथे देखील आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
(एजन्सी इनपुटसह)
आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on OCT 06,2024 | 13:52 PM
WebTitle – Chembur Mumbai Fire: Tragic Blaze Claims 7 Lives, Including 2 Children